प्रकाशित:
प्रभावात: 1 मे 2018
Microsoft सेवा करार
आपली गुप्तताआपली गुप्तता1_YourPrivacy
सारांश

1. आपली गुप्तता. आपली गुप्तता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कृपया Microsoft गुप्तता विधान ("गुप्तता विधान") वाचा कारण ते आम्ही आपल्याकडून आणि आपल्या साधनांमधून जमा करतो त्या डेटाचे ("डेटा"), आम्ही आपला डेटा कसा वापरतो आणि आपल्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडे असलेले कायदेशीर आधार यांचे वर्णन करते. गुप्तता विधान Microsoft आपली सामग्री कशी वापरते याचेदेखील वर्णन करते, जो आपला इतरांसोबतचा संवाद असतो; सेवांमार्गे Microsoft ला आपण सादर केलेल्या पोस्ट किंवा अभिप्राय असतात आणि सेवांद्वारे आपण अपलोड, संचय किंवा शेअर करणार्‍या फाईली, फोटो, दस्तावेज, ऑडिओ, डिजिटल कामे, लाइव्हस्ट्रिम्स आणि व्हिडिओ असतात ("आपली सामग्री"). जेथे प्रक्रिया करणे संमतीवर आधारित आहे आणि कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, सेवा वापरून किंवा या अटींशी सहमत होऊन, आपण Microsoft ला गुप्तता विधानामध्ये वर्णन केल्याप्रमाणे आपली सामग्री आणि डेटा संकलित करण्यास, वापरण्यास आणि उघड करण्यास संमती देता. काही बाबतींमध्ये, गुप्तता विधानामधील संदर्भाप्रमाणे आपल्याला वेगळी सूचना आणि आपल्या संमतीची विनंती आम्ही प्रदान करू.

पूर्ण मजकूर
आपली सामग्रीआपली सामग्री2_yourContent
सारांश

2. आपली सामग्री. आमच्या अनेक सेवा आपल्याला आपली सामग्री संचयित किंवा सामायिक करु देतात किंवा इतरांकडून साहित्य प्राप्त करु देतात. आम्ही आपल्या सामग्रीच्या मालकीवर दावा करीत नाही. आपली सामग्री आपली राहते आणि आपण तिच्यासाठी जबाबदार असता.

 • a. जेव्हा आपण इतर व्यक्तींसोबत आपली सामग्री सामायिक करता तेंव्हा आपण हे समजता की ते, जागतिक स्तरावर, आपल्याला भरपाई दिल्याशिवाय आपली सामग्री वापरण्यास, जतन, रेकॉर्ड, पुनरुत्पादित, प्रक्षेपित, प्रदर्शित, शेअर आणि वितरित करण्यास (आणि HealthVault वर हटविण्यास) सक्षम असू शकतील. जर आपल्याला इतरांकडे ही क्षमता असणे नको असेल तर आपली सामग्री सामायिक करण्यासाठी या सेवा वापरु नका. आपण याचे प्रतिनिधीत्व करता आणि हमी देता की या अटींच्या कालावधीसाठी, या सेवांवर आणि द्वारे अपलोड, संचयित किंवा सामायिक केल्या गेलेल्या आपल्या सामग्रीसाठी सर्व आवश्यक अधिकार आपल्याकडे आहेत (आणि असतील) आणि आपल्या सामग्रीचा संग्रह, वापर आणि धारण कोणत्याही कायद्याचे किंवा इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन करणार नाही. Microsoft कडे आपल्या सामग्रीची मालकी नाही, ती आपली सामग्री नियंत्रित, सत्यापित करत नाही, आपल्या सामग्रीसाठी पैसे देत नाही, तिचा प्रचार करत नाही किंवा इतर प्रकारे आपल्या सामग्रीसाठी कोणतेही उत्तरदायित्व स्वीकारत नाही आणि तिला आपली सामग्री किंवा या सेवा वापरुन इतरजण अपलोड, संचयित किंवा सामाहिक करणारे साहित्य यांसाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही.
 • b. आपल्याला आणि इतरांना या सेवा पुरविणे, आपले आणि या सेवांचे संरक्षण करणे आणि Microsoft उत्पादने आणि सेवा सुधारणे यांसाठी आवश्यक मर्यादेपर्यंत आपण आपली सामग्री वापरण्यासाठी Microsoft ला जागतिक आणि रॉयल्टी-मुक्त बौद्धिक मालमत्ता परवाना देता, उदाहरणार्थ, या सेवांवरील आपल्या सामग्रीच्या संवाद साधनांमार्गे प्रती बनविणे, आपली सामग्री धारण, प्रसारित, पुनर्स्वरुपित, प्रदर्शित आणि वितरित करणे. जर आपण आपली सामग्री सेवेच्या अशा विभागांमध्ये प्रकाशित केली जेथे ती निर्बंधांशिवाय विस्तृतपणे ऑनलाइन उपलब्ध असेल तर आपली सामग्री सेवेचा प्रचार करणारी प्रदर्शने किंवा साहित्यांमध्ये दिसू शकेल. या सेवांपैकी काही जाहिरातीद्वारे समर्थित आहेत. Microsoft जाहिराती वैयक्तिकृत कशा करते यांची नियंत्रणे Microsoft खाते व्यवस्थापन वेबसाईटच्या सुरक्षा आणि गुप्तता या पृष्ठावर उपलब्ध आहेत. आम्ही आपण ईमेल, चॅट, व्हिडियो कॉल किंवा व्हॉईस कॉल यांमध्ये काय म्हणता हे किंवा आपले दस्तावेज, फोटो किंवा इतर वैयक्तिक फाईली आपल्याला जाहिरातींचे लक्ष्य करण्यासाठी वापरत नाही. गुप्तता विधानामध्ये आमची जाहिरात धोरणे तपशीलवार व्यापलेली आहेत.
पूर्ण मजकूर
आचारसंहिताआचारसंहिता3_codeOfConduct
सारांश

3. आचारसंहिता.

 • a. या अटींशी सहमत होऊन आपण याच्याशी सहमत होता की सेवा वापरताना आपण पुढील नियमांचे अनुसरण कराल:
  • i. काहीही बेकायदेशीर करु नका.
  • ii. लहान मुलांचे शोषण करणार्‍या, त्यांना इजा करणार्‍या किंवा इजा करण्याची धमकी देणार्‍या कोणत्याही क्रियाकलापामध्ये गुंतू नका.
  • iii. स्पॅम पाठवू नका. स्पॅम म्हणजे अनिच्छित किंवा अनाहूत घाऊक ईमेल, पोस्टिंग, संपर्क विनंत्या, SMS (मजकूर संदेश) किंवा त्वरीत संदेश.
  • iv. अयोग्य सामग्री किंवा साहित्य (उदाहरणार्थ, नग्नता, पाशवी वृत्ती, पोर्नोग्राफी, आक्षेपार्ह भाषा, ग्राफिक हिंसा किंवा गुन्हेगारी क्रियाकलाप यांचा समावेश असणारी) किंवा स्थानिक कायदे किंवा नियमनांचे पालन न करणारी आपली सामग्री किंवा साहित्य प्रदर्शित करू नका किंवा ते शेअर करण्यासाठी सेवा वापरू नका.
  • v. घोटाळेयुक्त, खोट्या किंवा दिशाभूल करणार्‍या (उदा., खोट्या बहाण्यांखाली पैसे मागणे, इतर कोणीतरी असल्याचे भासविणे, प्ले काऊंट वाढविण्यासाठी किंवा क्रमांक, गुणांकने किंवा टिप्पण्या प्रभावित करण्यासाठी सेवांशी छेडछाड करणे) किंवा अब्रुनुकसानीकारक किंवा बदनामीकारक असणार्‍या क्रियाकलापामध्ये गुंतू नका.
  • vi. सेवांकडील प्रवेश किंवा त्यांच्या उपलब्धतेवरील कोणत्याही निर्बंधांना बगल देण्याचा प्रयत्न करु नका.
  • vii. आपल्याला, सेवांना किंवा इतरांना हानीकारक असणार्‍या (उदा., व्हायरस प्रसारित करणे, पाठलाग करणे, दहशतवादी सामग्री पोस्ट करणे, द्वेषपूर्ण भाषण संवादित करणे किंवा इतरांविरोधात हिंसेचा पुरस्कार करणे) क्रियाकलापामध्ये गुंतू नका.
  • viii. इतरांच्या अधिकारांवर अतिक्रमण करु नका (उदा., स्वामित्वहक्क असलेले संगीत किंवा इतर साहित्य यांचे अनधिकृत सामायिकीकरण, Bing नकाशे किंवा छायाचित्रांची पुनर्विक्री किंवा इतर वितरण).
  • ix. इतरांच्या गुप्तता किंवा डेटा संरक्षण अधिकारांचे उल्लंघन करणार्‍या क्रियाकलापामध्ये गुंतू नका.
  • x. इतरांना हे नियम तोडण्यात मदत करु नका.
 • b. अंमलबजावणी. जर आपण या अटींचे उल्लंघन केले तर आम्ही, आमच्या एकट्याच्या विवेकबुद्धीने, आपल्याला सेवा पुरविणे थांबवू शकतो किंवा आपले Microsoft खाते बंद करु शकतो. या अटींची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही सेवांकडून किंवा सेवांकडे संवादाची डिलिव्हरी (जसे की ईमेल, फाईल शेअरिंग किंवा त्वरीत संदेश) अवरोधित करु शकतो किंवा आम्ही कोणत्याही कारणास्तव आपली सामग्री काढून टाकण्यास किंवा प्रकाशित करण्यास नकार देऊ शकतो. या अटींच्या कथित उल्लंघनाचा तपास करताना, समस्येचे निराकरण करण्यासाठी Microsoft आपल्या सामग्रीचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार आरक्षित ठेवते आणि आपण याद्वारे अशा पुनरावलोकनास प्राधिकृत करता. मात्र, आम्ही संपूर्ण सेवेचे पर्यवेक्षण करु शकत नाही आणि तसे करण्याचा प्रयत्न करत नाही.
 • c. Xbox सेवांमधील उपयोजन. ही आचारसंहिता Xbox Live, Windows Live, Windows Live साठी खेळ आणि Microsoft Studios खेळ, अनुप्रयोग, सेवा आणि Microsoft द्वारे पुरविलेल्या सामग्रीला कशी लागू होते याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. Xbox सेवांद्वारे आचारसंहितेच्या उल्लंघनाचा (विभाग 13(a)(i) मध्ये व्याख्यित) परिणाम म्हणून Xbox सेवांमध्ये सहभागावर बंदी येऊ शकते किंवा निलंबने होऊ शकतात, ज्यात खात्याशी संबंधित सामग्री परवाने, Xbox Gold सदस्यत्व वेळ आणि Microsoft खाते शिलकी गमावणे समाविष्ट आहे.
पूर्ण मजकूर
सेवा व पाठबळ वापरणेसेवा व पाठबळ वापरणे4_usingTheServicesSupport
सारांश

4. सेवा व पाठबळ वापरणे.

 • a. Microsoft खाते. या सेवांपैकी अनेकांकडे प्रवेश करण्यासाठी आपल्याला Microsoft खात्याची गरज लागेल. आपले Microsoft खाते आपल्याला Microsoft आणि काही Microsoft भागीदारांद्वारे पुरविली जाणारी उत्पादने, वेबसाईट आणि सेवांमध्ये साइन इन करु देते.
  • i. खाते तयार करणे. आपण ऑनलाईन साइन अप करुन Microsoft खाते तयार करु शकता. आपल्या Microsoft खात्यासाठी साइन अप करताना आपण कोणतीही खोटी, चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती न वापरण्यास सहमत होता. काही प्रकरणांमध्ये, तृतीय पक्षाने, जसे की आपला इंटरनेट सेवा प्रदाता, आपल्याला Microsoft खाते नियुक्त करुन दिलेले असू शकेल. जर आपल्याला तृतीय पक्षाकडून आपले Microsoft खाते प्राप्त झाले असेल तर तृतीय पक्षास आपल्या खात्यावर अतिरिक्त अधिकार असू शकतात, जसे की आपले Microsoft खात्याकडे प्रवेश करण्याची किंवा ते हटविण्याची क्षमता. कृपया तृतीय पक्षाने आपल्याला पुरविलेल्या कोणत्याही अतिरिक्त अटींचे पुनरावलोकन करा कारण या अतिरिक्त अटींच्या बाबतीत Microsoft कडे कोणतीही जबाबदारी नाही. जर आपण एखाद्या आस्थापनेच्या वतीने Microsoft खाते तयार केले, जसे की आपला व्यवसाय किंवा रोजगारदाता, तर आपण याचे प्रतिनिधीत्व करता की आपल्याकडे त्या आस्थापनेस या अटींशी बांधील करण्याचा कायदेशीर प्राधिकार आहे. आपण आपली Microsoft खाते अधिकारपत्रे दुसर्‍या वापरकर्त्यांना किंवा अस्तित्वांना हस्तांतरित करू शकत नाही. आपल्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी आपले खाते तपशील आणि संकेतशब्द गोपनीय ठेवा. आपल्या Microsoft खात्याच्या अंतर्गत घडणार्‍या सर्व क्रियाकलापासाठी आपण जबाबदार आहात.
  • ii. खाते वापर. आपले Microsoft खाते सक्रिय ठेवण्यासाठी आपण ते वापरणे अनिवार्य आहे. याचा अर्थ असा की आपण आपले Microsoft खाते आणि संबंधित सेवा सक्रिय ठेवण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीमध्ये किमान एकदा साइन इन केले पाहिजे, जर या सेवांच्या देय भागासाठीच्या ऑफरमध्ये इतर प्रकारे दिलेले नसेल तर. आपण या कालावधीदरम्यान साइन इन न केल्यास, आम्ही आपले Microsoft खाते निष्क्रिय आहे असे मानू आणि ते आपल्यासाठी बंद करु. बंद Microsoft खात्याच्या परिणामांसाठी कृपया विभाग 4(a)(iv)(2) पहा. आपण आपला Outlook.com इनबॉक्स आणि आपले OneDrive यांमध्ये एक वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एकदा साइन इन करणे (वेगवेगळे) अनिवार्य आहे, अन्यथा आम्ही आपला Outlook.com इनबॉक्स आणि आपले OneDrive आपल्यासाठी बंद करु. आपल्या Microsoft खात्याशी गेमरटॅग संबद्ध ठेवण्यासाठी आपण Xbox सेवांमध्ये पाच वर्षांच्या कालावधीमध्ये किमान एकदा साइन इन करणे आवश्यक आहे. जर आम्हाला वाजवी संशय आला की आपले Microsoft खाते तृतीय पक्षाद्वारे घोट्याळाने वापरले जात आहे (उदाहरणार्थ, खात्याशी तडजोड केल्याचा परिणाम म्हणून) तर आपण मालकीवर पुन्हा दावा करेपर्यंत Microsoft आपले खाते निलंबित करु शकते. तडजोडीच्या स्वरूपावर आधारित, आम्हाला आपल्या काही किंवा संपूर्ण सामग्रीकडे प्रवेशणे अक्षम करण्याची आवश्यकता असू शकते. आपल्याला आपल्या Microsoft खात्याकडे प्रवेशण्यात अडचण येत असल्यास कृपया या वेबसाईटला भेट द्या: https://go.microsoft.com/fwlink/?LinkId=238656.
  • iii. लहान मुले आणि खाती. सेवांचा वापर करुन आपण याचे प्रतिनिधीत्व करता की आपण जेथे राहता तेथे “प्रौढ” किंवा “कायदेशीर जबाबदारी”चे वय गाठलेले आहे किंवा आपल्याकडे या अटींशी बांधील होण्यास संमती असणारा वैध पालक किंवा कायदेशीर पालक आहे. आपण जेथे राहता तेथे आपण प्रौढ किंवा “कायदेशीर जबाबदारी”चे वय गाठलेले आहे किंवा नाही याविषयी आपल्याला माहिती नसल्यास किंवा आपल्याला हा विभाग समजत नसल्यास, आपण Microsoft खाते तयार करण्यापूर्वी कृपया आपले पालक किंवा कायदेशीर पालक यांना मदतीसाठी विचारा. जर आपण Microsoft खाते तयार करणार्‍या अल्पवयस्काचे पालक किंवा कायदेशीर पालक असाल, तर आपण आणि अल्पवयस्क या अटी स्वीकारता आणि Microsoft खाते किंवा सेवा यांच्या सर्व वापरासाठी, खरेदींच्या समावेशासह, अल्पवयस्काचे खाते आता उघडे असले किंवा नंतर तयार केले असले तरीही, जबाबदार आहात.
  • iv. आपले खाते बंद करणे.
   • 1. आपण कधीही आणि कोणत्याही कारणास्तव विशिष्ट सेवा रद्द करु शकता किंवा आपले Microsoft खाते बंद करु शकता. आपले Microsoft खाते बंद करण्यासाठी कृपया https://go.microsoft.com/fwlink/p/?linkid=618278 ला भेट द्या. जेव्हा आपण आम्हाला आपले Microsoft खाते बंद करण्यास सांगता तेव्हा आम्ही ते 60 दिवसांच्या निलंबित स्थितीमध्ये टाकू, यदाकदाचित आपण आपले मन बदलले तर. त्या 60 दिवसांच्या कालावधीनंतर आपले Microsoft खाते बंद केले जाईल. आपले Microsoft खाते बंद होते तेव्हा काय होते याच्या स्पष्टीकरणासाठी कृपया खालील विभाग 4(a)(iv)(2) पहा. त्या 60 दिवसांच्या कालावधीदरम्यान परत लॉगिंग करण्याने आपल्या Microsoft खात्याचे पुनर्सक्रियकरण केले जाईल.
   • 2. आपले Microsoft खाते बंद केले गेले असल्यास (आपल्याकडून किंवा आमच्याकडून), काही गोष्टी घडतात. प्रथम, सेवांकडे प्रवेश करण्यासाठी Microsoft खाते वापरण्याचा आपला अधिकार तात्काळ थांबतो. दुसरे, आम्ही आपल्या Microsoft खात्याशी संबंधित डेटा किंवा आपली सामग्री हटवू किंवा इतर प्रकारे आपल्याशी किंवा आपल्या Microsoft खात्याशी असंबंधित करू (आम्हाला कायद्याद्वारे ती ठेवण्याची, परत करण्याची, आपल्याकडे किंवा आपण मान्यता दिलेल्या तृतीय पक्षाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता नसल्यास). आपल्याकडे नियत बॅकअप योजना असली पाहिजे कारण एकदा आपले खाते बंद झाले की आपली सामग्री किंवा डेटा पुनर्संचयित करण्यास Microsoft सक्षम नसेल. तिसरे, आपण संपादन केलेल्या उत्पादनांकडील प्रवेश आपण गमावू शकता.
 • b. कार्यालयीन किंवा शालेय खाती. आपण काही Microsoft सेवांमध्ये आपल्या कार्यालयीन किंवा शालेय ईमेल पत्त्याद्वारे साइन इन करू शकता. आपण असे केल्यास, आपण सहमत होता की आपल्या ईमेल पत्त्याशी संबंधित डोमेनचा मालक आपले खाते नियंत्रित आणि प्रशासित करू शकतो आणि, आपल्या संवाद आणि फाईलींच्या सामग्रीसह, आपल्या डेटाकडे प्रवेश करू शकतो आणि त्यावर प्रक्रिया करू शकतो आणि खाते किंवा डेटाला धोका निर्माण झाल्यास Microsoft डोमेनच्या मालकाला सूचित करू शकते. आपण याशीही सहमत होता की आपला सेवांचा वापर Microsoft चे आपल्याशी किंवा आपल्या संस्थेशी असलेले करार यांच्या अधीन असू शकतो आणि या अटी लागू होऊ शकत नाहीत. आपल्याकडे जर आधीच Microsoft खाते असल्यास आणि या अटींनी व्यापलेल्या सेवांकडे प्रवेशण्यासाठी आपण कामाच्या ठिकाणचा किंवा शाळेचा ईमेल पत्ता वापरत असल्यास, आपल्याला अशा सेवांकडे प्रवेशणे सुरू ठेवण्यासाठी आपल्या Microsoft खात्याशी संबंधित ईमेल पत्ता अद्यतनित करण्यास सूचित केले जाऊ शकते.
 • c. अतिरिक्त साधनसामग्री/डेटा योजना. यांपैकी अनेक सेवा वापरण्यासाठी आपल्याला इंटरनेट जोडणी आणि/किंवा डेटा/सेल्युलर योजनेची गरज असेल. आपल्याला अतिरिक्त साधनसामग्रीची देखील गरज असू शकेल, जसे की हेडसेट, कॅमेरा किंवा मायक्रोफोन. या सेवा वापरण्यासाठी गरजेचे असणार्‍या सर्व जोडण्या, योजना आणि साधनसामग्री पुरविण्यासाठी आणि आपल्या जोडण्या, योजना आणि साधनसामग्रीच्या प्रदात्या(त्यां)द्वारे आकारलेल्या फी अदा करण्यासाठी आपण जबाबदार आहात. या फी आपण या सेवांसाठी आम्हाला अदा करणार्‍या कोणत्याही फींसोबत अतिरिक्त आहेत आणि आम्ही अशा फींसाठी आपल्याला प्रतिपूर्ती देणार नाही. आपल्या लागू होऊ शकणार्‍या अशा काही फी आहेत का हे ठरविण्यासाठी आपल्या प्रदात्या(त्यां)सोबत तपासा.
 • d. सेवा अधिसूचना. आपण वापरणार्‍या सेवेविषयी आम्हाला काही सांगायचे असेल, तेव्हा आम्ही आपल्याला सेवा अधिसूचना पाठवू. आपण आम्हाला आपला Microsoft खात्याशी संबंधित आपला ईमेल पत्ता किंवा फोन क्रमांक दिला असल्यास, आपला मोबाईल फोन क्रमांक नोंदवण्याआधी आपली ओळख सत्यापित करणे यासह, आम्ही आपल्याला ईमेल किंवा SMS (मजकूर संदेश) द्वारे सेवा अधिसूचना पाठवू शकतो. आम्ही आपल्याला सेवा अधिसूचना इतर मार्गाने देखील पाठवू शकतो (उदा. इन-प्रॉडक्ट संदेशा द्वारे). SMS मार्गे अधिसूचना प्राप्त करताना डेटा किंवा संदेशन दर लागू शकतील.
 • e. पाठबळ. काही सेवांसाठी support.microsoft.com येथे ग्राहक साहाय्य उपलब्ध आहे. अन्यथा निर्दिष्ट केले नसल्यास, काही सेवा, www.microsoft.com/support-service-agreement येथे उपलब्ध अटींच्या अधीन, वेगळे किंवा अतिरिक्त ग्राहक साहाय्य देऊ करू शकतात. वैशिष्ट्ये किंवा सेवांच्या पूर्वावलोकनासाठी किंवा बीटा आवृत्त्यांसाठी साहाय्य उपलब्ध नसू शकते. तृतीय पक्षांद्वारे पुरविलेले सॉफ्टवेअर किंवा सेवांशी या सेवा अनुरुप नसू शकतील आणि अनुरुपता आवश्यकतांशी स्वतःची ओळख करुन घेण्यासाठी आपण जबाबदार आहात.
 • f. आपल्या सेवा समाप्त करणे. आपल्या सेवा रद्द केल्या गेल्यास (आपल्याकडून किंवा आमच्याकडून), प्रथम आपला सेवांकडील प्रवेशाचा अधिकार तात्काळ थांबतो आणि सेवांशी संबंधित सॉफ्टवेअर वापरण्याचा आपला परवाना संपतो. दुसरे, आम्ही आपल्या सेवांशी संबंधित डेटा किंवा आपली सामग्री हटवू किंवा इतर प्रकारे आपल्याशी किंवा आपल्या Microsoft खात्याशी असंबंधित करू (आम्हाला कायद्याद्वारे ती ठेवण्याची, परत करण्याची, आपल्याकडे किंवा आपण मान्यता दिलेल्या तृतीय पक्षाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता नसल्यास). याचा परिणाम म्हणून आपण त्यापुढे कोणत्याही सेवांकडे (किंवा आपण त्या सेवांवर संचयित केलेल्या आपल्या सामग्रीकडे) प्रवेश करू शकणार नाही. आपल्याकडे नियमित बॅकअप योजना असावी. तिसरे, आपण संपादन केलेल्या उत्पादनांकडील प्रवेश आपण गमावू शकता. आपण आपले Microsoft खाते रद्द केले असल्यास आणि आपल्याकडे सेवांकडे प्रवेश करता येऊ शकणारे दुसरे खाते नसल्यास आपल्या सेवा तात्काळ रद्द केल्या जाऊ शकतात.
पूर्ण मजकूर
तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा वापरणेतृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा वापरणे5_usingThird-PartyAppsAndServices
सारांश

5. तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा वापरणे. या सेवा आपल्याला स्वतंत्र तृतीय पक्षांकडील (Microsoft नसणार्‍या कंपन्या किंवा लोक) उत्पादने, सेवा, वेबसाईट, लिंक, सामग्री, साहित्य, गेम, कौशल्ये, एकीकरणे, बॉट्स किंवा अनुप्रयोग संपादन करू देऊ शकतील किंवा त्यांकडे प्रवेश करू देऊ शकतील ("तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा"). आमच्या अनेक सेवा आपल्याला, विनंती केल्याने किंवा तृतीय पक्षाशी संवाद साधताना अ‍ॅप्स आणि सेवा शोधण्यात मदतदेखील करतात किंवा आपली सामग्री किंवा डेटा शेअर करू देतात, आणि आपण हे समजता की आपण आमच्या सेवांना आपल्याला तृतीय पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा पुरविण्यासाठी निर्देशित करत आहात. तृतीय पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा आपल्याला तृतीय पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा यांचे प्रकाशक, प्रदाता किंवा संचालक यांच्याकडे आपली सामग्री किंवा डेटा संचयितदेखील करु देऊ शकतील. तृतीय पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा आपण तृतीय पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा स्थापित करु शकण्यापूर्वी किंवा वापरु शकण्यापूर्वी आपल्याला गुप्तता धोरण सादर करु शकतील किंवा अतिरिक्त अटी स्वीकारणे आवश्यक करु शकतील. Office Store, Xbox Store किंवा Windows Store यांद्वारे संपादित केलेल्या अनुप्रयोगांसाठीच्या अतिरिक्त अटींसाठी विभाग 13(b) पहा. कोणतेही तृतीय पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा संपादन करण्यापूर्वी, वापरण्यापूर्वी, विनंती करण्यापूर्वी किंवा आपले Microsoft खाते कोणत्याही तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांशी लिंक करण्यापूर्वी आपण कोणत्याही अतिरिक्त अटी आणि गुप्तता धोरणांचे पुनरावलोकन करावे. कोणत्याही अतिरिक्त अटी या अटींमध्ये फेरबदल करत नाहीत. कोणत्याही तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा यांचा भाग म्हणून Microsoft आपल्याला कोणत्याही बौद्धिक मालमत्तेचा परवाना देत नाही. या तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवांच्या आपल्या वापरातून निर्माण होणार्‍या सर्व जोखमी आणि उत्तरदायित्व स्वीकारण्यास आपण सहमत होता आणि आपल्या त्यांच्या वापरातून निर्माण होणार्‍या कोणत्याही मुद्द्यांसाठी Microsoft जबाबदार नाही. आपल्याला किंवा इतरांना कोणत्याही तृतीय पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांपासून देऊ केलेल्या माहितीला किंवा सेवांना Microsoft जबाबदार किंवा उत्तरदायी नाही.

पूर्ण मजकूर
सेवा उपलब्धतासेवा उपलब्धता6_serviceAvailability
सारांश

6. सेवा उपलब्धता.

 • a. या सेवा, तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा किंवा सेवांद्वारे प्रदान केलेले साहित्य किंवा उत्पादने वेळोवेळी अनुपलब्ध असू शकतील, मर्यादित तत्त्वावर प्रदान केली जाऊ शकतील किंवा आपला प्रदेश किंवा उपकरणावर अवलंबून त्यांत फरक असू शकेल. जर आपण आपल्या Microsoft खात्याशी संबंधित स्थान बदलले तर आपल्या आधीच्या प्रदेशात आपल्याला उपलब्ध असणारे आणि आपण ज्यांच्यासाठी रक्कम अदा केली होती ते साहित्य किंवा अनुप्रयोग आपल्याला पुनर्संपादित करावे लागू शकतील. आपण ज्या देशातून साहित्य किंवा सेवांकडे प्रवेश करता त्या देशामध्ये बेकायदेशीर असणारे किंवा परवाना नसलेले साहित्य किंवा सेवा यांकडे प्रवेश न करण्यास किंवा त्यांचा वापर न करण्यास किंवा अशा साहित्य किंवा सेवांकडे प्रवेश करण्यासाठी किंवा त्यांचा वापर करण्यासाठी आपले स्थान किंवा ओळख न लपविण्यास किंवा त्यांचे गैरप्रतिनिधीत्व न करण्यास आपण सहमत होता.
 • b. सेवा चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो; मात्र सर्व ऑनलाईन सेवांना प्रासंगिक व्यत्यय आणि आउटेज यांचा त्रास होतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला होऊ शकणार्‍या कोणत्याही व्यत्यय किंवा हानीसाठी Microsoft उत्तरदायी नाही. आउटेजच्या प्रसंगात, आपण संचयित केलेली आपली सामग्री किंवा डेटा पुनर्संचयित करण्यास सक्षम नसू शकाल. आपण सेवांवर संचयित करत असलेल्या किंवा तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा वापरून संचयित करत असलेल्या आपल्या सामग्रीचा आणि डेटाचा आपण नियमितपणे बॅकअप घ्यावा अशी आम्ही शिफारस करतो.
पूर्ण मजकूर
सेवा किंवा सॉफ्टवेअरची अद्यतने आणि या अटींमधील बदलसेवा किंवा सॉफ्टवेअरची अद्यतने आणि या अटींमधील बदल7_updatesToTheServicesOrSoftwareAndChangesToTheseTerms
सारांश

7. सेवा किंवा सॉफ्टवेअरची अद्यतने आणि या अटींमधील बदल.

 • a. आम्ही या अटी कधीही बदलू शकतो आणि जेव्हा आम्ही असे करु तेव्हा आम्ही आपणास कळवू. बदल प्रभावात आल्यानंतर सेवा वापरणे याचा अर्थ आपण नवीन अटींशी सहमत आहात असा होतो. जर आपण नवीन अटींशी सहमत नसाल तर आपण सेवा वापरणे बंद केले पाहिजे, आपले Microsoft खाते बंद केले पाहिजे, आणि जर आपण पालक असाल तर आपल्या अल्पवयस्क पाल्यास त्याचे किंवा तिचे Microsoft खाते बंद करण्यास मदत केली पाहिजे.
 • b. काहीवेळा आपल्याला सेवा वापरणे सुरु ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर अदयतनांची गरज असेल. आम्ही स्वयंचलितपणे आपल्या सॉफ्टवेअरची आवृत्ती तपासू शकतो आणि सॉफ्टवेअर अद्यतने किंवा कॉन्फिगरेशन बदल डाउनलोड करू शकतो. आपल्याला सेवा वापरणे सुरु ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर अदयतनित करण्याची आवश्यकता देखील असू असेल. अशी अद्यतने या अटींच्या अधीन आहेत, जर अद्यतनांसोबत इतर अटी नसतील तर, तसे असल्यास त्या इतर अटी लागू होतील. कोणतीही अद्यतने उपलब्ध करुन देण्यासाठी Microsoft कर्तव्याखाली नाही आणि हमी देत नाही की आपण प्रणालीच्या ज्या आवृत्तीसाठी सॉफ्टवेअर, अ‍ॅप्स, सामग्री किंवा इतर उत्पादने खरेदी केल्या असतील किंवा परवाना घेतले असतील, त्यास आम्ही समर्थन देऊ. तृतीय पक्षांद्वारे पुरविलेल्या सॉफ्टवेअर किंवा सेवांशी अशी अद्यतने अनुरुप नसू शकतील. आपण कधीही सॉफ्टवेअर अस्थापित करुन भविष्यातील सॉफ्टवेअर अद्यतनांची आपली संमती मागे घेऊ शकता.
 • c. अतिरिक्तपणे, काही वेळा आम्हाला सेवेची वैशिष्ट्ये किंवा कार्ये काढून टाकण्याची किंवा बदलण्याची किंवा सेवा पुरविणे किंवा तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा यांकडे प्रवेश पुरविणे पूर्णपणे थांबविण्याची गरज भासू शकेल. लागू कायद्याने आवश्यक मर्यादेचा अपवाद वगळता, आधी खरेदी केलेले कोणतेही साहित्य, डिजिटल माल (विभाग 13(k) मध्ये व्याख्यित) किंवा अनुप्रयोग यांचे पुनर्डाउनलोड किंवा बदली पुरविण्याचे आमचे दायित्व नाही. आम्ही सेवा किंवा त्यांची वैशिष्ट्ये बीटा आवृत्तीमध्ये प्रदर्शित करु शकतो, जी अचूकपणे किंवा अंतिम आवृत्ती ज्याप्रकारे काम करु शकेल त्याप्रमाणे काम करु शकणार नाही.
 • d. त्यामुळे आपल्याला डिजिटल अधिकार व्यवस्थापनाने (DRM) संरक्षित साहित्य वापरता यावे, जसे की काही संगीत, खेळ, चित्रपट, पुस्तके आणि अधिक, यासाठी DRM सॉफ्टवेअर स्वयंचलितपणे ऑनलाईन अधिकार सर्व्हरशी संपर्क साधू शकेल आणि DRM अद्यतने स्थापित करु शकेल.
पूर्ण मजकूर
सॉफ्टवेअर परवानासॉफ्टवेअर परवाना8_softwareLicense
सारांश

8. सॉफ्टवेअर परवाना. वेगळ्या Microsoft परवाना करारासोबत नसल्यास (उदाहरणार्थ, आपण Windows सोबत समाविष्ट आणि त्याचा भाग असलेला Microsoft अनुप्रयोग वापरत असल्यास, Windows Operating System साठीच्या Microsoft सॉफ्टवेअर परवाना अटी असे सॉफ्टवेअर शासित करतात), सेवांचा भाग म्हणून आम्ही आपल्याला पुरवलेले कोणतेही सॉफ्टवेअर या अटींच्या अधीन आहे. Office Store, Windows Store आणि Xbox Store मधून संपादन केलेले अनुप्रयोग खालील विभाग 13(b)(i) च्या अधीन आहेत.

 • a. जर आपण या अटींचे पालन केले तर आम्ही आपल्याला सेवांच्या आपल्या वापराचा भाग म्हणून एकावेळी केवळ एकाच व्यक्तीने वापरण्यासाठी जागतिक स्तरावर सॉफ्टवेअरची प्रति उपकरण एक प्रत स्थापित करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार देतो. सेवांच्या आपल्या वैयक्तिक, अव्यावसायिक वापरासाठी, विशिष्ट साधनांसाठी असे सॉफ्टवेअर पूर्व-स्थापित केले जाऊ शकते. सेवांचा भाग असणार्‍या सॉफ्टवेअर किंवा वेबसाईटमध्ये तृतीय पक्ष कोड समाविष्ट असू शकेल. सॉफ्टवेअर किंवा वेबसाईटला जोडलेल्या किंवा त्यांकडून संदर्भ घेतलेल्या कोणत्याही तृतीय पक्ष स्क्रिप्ट किंवा कोडचा परवाना आपल्याला अशा कोडचे मालक असणार्‍या तृतीय पक्षांद्वारे दिलेला आहे आणि Microsoft द्वारे नाही. तृतीय पक्ष कोडसाठी सूचना, जर असल्यास, केवळ आपल्या माहितीसाठी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
 • b. सॉफ्टवेअरचा परवाना दिलेला आहे, ते विकलेले नाही आणि Microsoft द्वारे अभिप्रेरणेने, प्रतिबंधक कबुलीने किंवा इतर प्रकारे स्पष्टपणे न दिलेले सॉफ्टवेअरचे सर्व अधिकार Microsoft आरक्षित ठेवते. हा परवाना आपल्याला याचे कोणतेही अधिकार देत नाही आणि आपण हे करु शकणार नाही:
  • i. सॉफ्टवेअर किंवा सेवांमधील किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही तंत्रज्ञानात्मक संरक्षण उपायांना बगल देणे किंवा बायपास करणे;
  • ii. सेवांमध्ये समाविष्ट असलेले किंवा सेवांद्वारे प्रवेशक्षम असलेले कोणतेही सॉफ्टवेअर किंवा सेवांचा इतर पैलू यांचे भाग सुटे, असंकलित, डीक्रिप्ट, हॅक करणे, त्यांचे अनुकरण करणे, त्यांचा गैरवापर किंवा ऊर्ध्व अभियांत्रिकी करणे, लागू स्वामीत्वहक्क कायदा स्पष्टपणे तसे करण्याची परवानगी देत असेल त्याचा अपवाद वगळता आणि त्या मर्यादेपर्यंतच;
  • iii. विविध उपकरणांवर वापरण्यासाठी सॉफ्टवेअर किंवा सेवांचे भाग वेगवेगळे करणे;
  • iv. सॉफ्टवेअर किंवा सेवा प्रकाशित करणे, त्यांची प्रत बनविणे, त्यांना भाड्याने, लीजवर देणे, विकणे, त्यांची निर्यात, आयात, त्यांचे वितरण करणे किंवा त्यांना उधार देणे, जर Microsoft ने आपल्याला तसे करण्याचा स्पष्ट प्राधिकार दिलेला नसेल तर;
  • v. सॉफ्टवेअर, कोणतेही सॉफ्टवेअर परवाने किंवा सेवा वापरण्याचे किंवा सेवांकडे प्रवेशण्याचे कोणतेही अधिकार हस्तांतरित करणे;
  • vi. कोणत्याही अनधिकृत मार्गाने सेवांचा वापर जो इतर कोणाच्याही त्यांच्या वापरामध्ये हस्तक्षेप करेल किंवा कोणतीही सेवा, डेटा, खाते किंवा नेटवर्क यांकडे प्रवेश मिळवेल;
  • vii. अधिकृत तृतीय पक्ष अनुप्रयोगांद्वारे सेवांकडे प्रवेश सक्षम करेल किंवा कोणत्याही Microsoft-अधिकृत उपकरणामध्ये फेरबदल करेल (उदा., Xbox One, Xbox 360, Microsoft Surface, इ.).
पूर्ण मजकूर
अदागी अटीअदागी अटी9_paymentTerms
सारांश

9. अदागी अटी. जर आपण सेवा खरेदी करता तर या अदागी अटी आपल्या खरेदीस लागू होतात आणि आपण त्यांच्याशी सहमत होता.

 • a. शुल्क. जर सेवांच्या भागाशी शुल्क संबंधित असेल तर आपण ते शुल्क विनिर्दिष्ट केलेल्या चलनामध्ये अदा करण्यास सहमत होता. सेवांसाठी दिलेल्या किंमतीमध्ये सर्व लागू कर आणि चलन विनिमय समझोते अपवर्जित आहेत, जर इतर प्रकारे म्हटलेले नसेल तर. Skype देय उत्पादनांच्या सर्व किंमती लागू करांच्या समावेशासह आहेत, जर इतर प्रकारे म्हटले नसेल तर. असे कर किंवा इतर शुल्क अदा करण्यास आपण एकमेव जबाबदार आहात. आपल्या देयक माहितीशी संबंधित आपल्या निवासी पत्यावर आधारीत Skype कर मोजते. हा पत्ता अद्ययावत आणि अचूक असल्याच्या खात्रीसाठी आपण जबाबदार आहात. Skype उत्पादने वगळून, आपले Microsoft खाते नोंदविले गेले त्यावेळच्या आपल्या स्थानावर आधारीत कर मोजले जातात, जर स्थानिक कायद्यास मोजणीसाठी वेगळ्या आधाराची आवश्यकता नसेल तर. जर आम्हाला आपल्याकडून वेळेवर, पूर्ण अदागी प्राप्त झाली नाही तर आम्ही सेवा निलंबित किंवा रद्द करु शकतो. अदागी न केल्यामुळे सेवांचे निलंबन किंवा रद्दीकरण यांची परिणिती आपले खाते आणि त्याची सामग्री यांच्याकडे प्रवेश आणि त्यांचा वापर गमावणे यामध्ये होऊ शकते. आपल्या स्थानावर मुखवटा घालणार्‍या कॉर्पोरेट किंवा इतर खाजगी नेटवर्कमार्गे इंटरनेटशी जोडणे हे शुल्क आपल्या प्रत्यक्ष स्थानासाठी प्रदर्शित केलेल्या शुल्कापेक्षा वेगळे असण्यास कारणीभूत होऊ शकते. आपल्या स्थानावर अवलंबून, काही व्यवहारांना परदेशी चलन रूपांतरणाची किंवा दुसर्‍या देशात प्रक्रिया केली जाण्याची आवश्यकता असू शकते. आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास आपली बँक आपल्याला त्या सेवांसाठी अतिरिक्त शुल्क आकारू शकते. कृपया तपशीलांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
 • b. आपले देयक खाते. सेवेसाठी शुल्क अदा करण्यासाठी आपण त्या सेवेसाठी साइन अप कराल त्यावेळी आपल्याला अदागी पद्धत पुरविण्यास सांगितले जाईल. आपण आपली देयक माहिती आणि अदागी पद्धत Microsoft खाते व्यवस्थापन वेबसाईट येथून आणि आपल्या Skype देयक खात्यासाठी https://skype.com/go/myaccount येथे आपल्या खात्यात साइन इन करून प्रवेशू किंवा बदलू शकता. अतिरिक्तपणे, आपली जारीकर्ता बॅंक किंवा लागू अदागी नेटवर्क यांद्वारा पुरविलेल्या आपल्या निवडलेल्या अदागी पद्धतीविषयी कोणतीही अद्ययावत खाते माहिती वापरण्यास Microsoft ला परवानगी देण्यास आपण सहमत होता. आपण आपले खाते आणि इतर माहिती, आपला ईमेल पत्ता आणि अदागी पद्धतीच्या तपशीलांसह, त्वरित अद्यतनित करण्यास सहमत होता, जेणेकरून आम्ही आपले व्यवहार पूर्ण करू शकू आणि आपल्या व्यवहारांसंबंधात आवश्यक असेल तेव्हा आपल्याशी संपर्क साधू शकू. आपल्या देयक खात्यामध्ये केलेल्या बदलांचा आपल्या देयक खात्यातील आपल्या बदलांवर आम्ही वाजवीपणे कार्यवाही करु शकण्यापूर्वी आपल्या देयक खात्यामध्ये आम्ही सादर करणार्‍या शुल्कावर प्रभाव पडत नाही.
 • c. देयक. Microsoft ला अदागी पद्धत पुरवून, आपण: (i) प्रतिनिधित्व करता की आपण पुरवलेली भरणा पद्धत वापरण्यासाठी आपण अधिकृत आहात आणि आपण पुरवत असलेली कोणतीही भरणा माहिती सत्य आणि अचूक आहे; (ii) आपली भरणा पद्धत वापरून खरेदी केलेली कोणतीही उत्पादने, सेवा किंवा उपलब्ध सामग्री यांसाठी आपल्याकडून आकारणी करण्यासाठी Microsoft ला अधिकृत करता; आणि (iii) Microsoft ला या अटी प्रभावात असताना आपण साइन अप किंवा वापर करण्याचे निवडणार्‍या सेवांच्या कोणत्याही देय वैशिष्ट्यांसाठी आपल्याला शुल्क आकारणी करण्याचा प्राधिकार देता. आम्ही आपल्याला (a) आगाऊ; (b) खरेदीच्या वेळी; (c) खरेदीनंतर लगेच; किंवा (d) सदस्यत्व सेवांसाठी आवर्ती तत्त्वावर देयक आकारणी करु शकतो. तसेच, आम्ही आपल्याला आपण संमत केलेल्या रकमेपर्यंत शुल्क आकारणी करु शकतो आणि आवर्ती सदस्यत्व सेवांसाठी आकारल्या जाणार्‍या रकमेमधील कोणत्याही बदलाविषयी आम्ही आपल्याला आगाऊ सूचित करु. ज्या रकमा आधी प्रक्रियित केल्या गेलेल्या नाहीत त्यांसाठी आपल्या आधीच्या एकपेक्षा अधिक देयक कालावधींसाठी आम्ही आपल्याला एकाच वेळी देयक आकारणी करु शकतो.
 • d. आवर्ती अदागी. जेव्हा आपण सदस्यत्व तत्त्वावर सेवा खरेदी करता (उदा. मासिक, दर 3 महिन्यांनी किंवा वार्षिक), तेव्हा आपण याच्याशी सहमत होता की आपण आवर्ती अदागीस प्राधिकार देत आहात, आणि आपण सहमत झालेल्या आवर्ती कालावधींना आणि आपण निवडलेल्या पद्धतीद्वारे Microsoft ला अदागी केल्या जातील, जोपर्यंत त्या सेवेसाठीचे सदस्यत्व आपल्याद्वारे किंवा Microsoft द्वारे संपुष्टात आणले जात नाही तोपर्यंत. आवर्ती भरणा अधिकृत करून, आपण Microsoft ला अशा भरण्यावर इलेक्ट्रॉनिक डेबिट किंवा फंड ट्रान्सफर, किंवा आपल्या नियोजित खात्यामधील इलेक्ट्रॉनिक ड्राफ्ट (ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस किंवा त्यासारखा भरणासाठी), किंवा आपल्या नियोजित खात्यामधून आकारणी (क्रेडिट कार्ड आणि त्यासारखा भरणासाठी) म्हणून प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत करता (एकत्रितपणे, "इलेक्ट्रॉनिक भरणा"). सदस्यता शुल्काची देयक आकारणी किंवा आकारणी सामान्यपणे लागू सदस्यत्व कालावधीच्या आधी केली जाते. कोणताही भरणा आकारणीशिवाय परत गेल्यास किंवा कोणतेही क्रेडिट कार्ड किंवा त्यासारखा व्यवहार नाकारला गेल्यास किंवा अमान्य ठरल्यास, Microsoft किंवा तिचे सेवा प्रदाते लागू कायद्याने परवानगी दिल्यानुसार कोणतीही लागू परतावा वस्तू, नकार किंवा इतर शुल्क आकारण्याचा अधिकार राखून ठेवतात.
 • e. स्वयंचलित नुतनीकरण. जर स्वयंचलित नूतनीकरणांस लागू कायद्यांतर्गत परवानगी असेल, तर आपण निश्चित सेवा कालावधीच्या शेवटी सेवांचे स्वयंचलित नूतनीकरण निवडू शकता. नवीन सत्रासाठी कोणत्याही सेवांच्या नूतनीकरणाआधी आम्ही आपल्याला ईमेल द्वारा, किंवा इतर वाजवी रीतीने आठवण करून देऊ आणि विभाग 9(k) नुसार किंमतीतील कोणत्याही बदलांविषयी आपल्याला सूचित करू. आम्ही आपल्याला आपण स्वयंचलितपणे सेवांचे नूतनीकरण करणे निवडल्याची आठवण करून दिल्यावर आम्ही सद्य सेवा कालावधीच्या शेवटी आपल्या सेवांचे स्वयंचलितपणे नूतनीकरण करू शकतो आणि, आपण खाली वर्णन केल्याप्रमाणे सेवा रद्द करण्याचे निवडले नसल्यास, आपल्याला नूतनीकरण सत्राचे त्यावेळेचे सद्य शुल्क आकारू शकतो. आम्ही आपल्याला याचीही आठवण करुन देऊ की आम्ही आपल्या पसंतीच्या अदागी पद्धतीला सेवांच्या नुतनीकरणासाठी देयक आकारणी करु, ते नुतनीकरणाच्या दिनांकास फाईलवर असले किंवा नंतर पुरविलेले असले तरीही. आपण सेवा रद्द कशा करु शकाल याविषयीच्या सूचनादेखील आम्ही आपल्याला पुरवू. नुतनीकरणासाठी देयक आकारणी होणे टाळण्यासाठी आपल्याला नुतनीकरण दिनांकाआधी सेवा रद्द केल्या पाहिजेत.
 • f. ऑनलाईन विधान आणि त्रुटी. Microsoft आपल्याला Microsoft खाते व्यवस्थापन वेबसाईट वर ऑनलाईन देयक विधान पुरवेल जेथे आपण आपले विधान पाहू आणि मुद्रित करु शकता. Skype साठी, आपण आपल्या ऑनलाईन विधानाकडे www.skype.com येथील आपल्या खात्यामध्ये साइन इन करून प्रवेशू शकता. आम्ही केवळ हेच देयक विधान पुरवितो. जर आम्ही आपल्या देयकामध्ये चूक केली तर आपण ती चूक प्रथम आपल्या देयकावर दिसल्यापासून 90 दिवसांच्या आत आम्हाला सांगितली पाहिजे. आम्ही मग शुल्काचा त्वरीत तपास करु. आपण आम्हाला त्या वेळेत न सांगितल्यास, आपण चुकीच्या परिणामतः होणार्‍या सर्व उत्तरदायित्व आणि दाव्यांपासून आम्हाला मुक्त करता आणि, इतर प्रकारे कायद्याने आवश्यक नसल्यास, आम्हाला चूक दुरुस्त करण्याची किंवा परतावा देण्याची आवश्यकता असणार नाही. जर Microsoft ने देयकामध्ये चूक शोधली तर आम्ही ती चूक 90 दिवसांच्या आत दुरुस्त करु. हे धोरण लागू होऊ शकणार्‍या कोणत्याही स्थायी अधिकारांवर प्रभाव टाकत नाही.
 • g. परतावा धोरण. जर कायद्याने इतर प्रकारे पुरविले नसेल किंवा विशेष सेवा ऑफर नसेल तर सर्व खरेदी अंतिम आणि अ-परतावाक्षम आहेत. जर आपला विश्वास असेल की Microsoft ने आपल्याला चुकीने शुल्क आकारणी केली आहे तर आपण आमच्याशी अशा शुल्क आकारणीपासून 90 दिवसांच्या आत संपर्क साधला पाहिजे. इतर प्रकारे कायद्याने आवश्यक नसल्यास, 90 दिवसांपेक्षा जास्त जुन्या कोणत्याही शुल्कांसाठी परतावे दिले जाणार नाहीत. आम्ही आमच्या एकट्याच्या विवेकबुद्धीने परतावे किंवा क्रेडिट जारी करण्याचा अधिकार आरक्षित ठेवतो. जर आम्ही परतावा किंवा क्रेडिट जारी केले असेल तर आम्ही भविष्यामध्ये समान किंवा तत्सम परतावा जारी करण्याच्या कोणत्याही दायित्वाखाली नाही. हे परतावा धोरण लागू होऊ शकणार्‍या कोणत्याही स्थायी अधिकारांवर प्रभाव टाकत नाही. अधिक परतावा माहितीसाठी कृपया आमच्या मदत विषय येथे भेट द्या. आपण तैवान येथे राहत असल्यास, कृपया नोंद घ्या की तैवानचा ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याच्या संबंधित नियमनांनुसार, अभौतिक रूपाद्वारे आणि/किंवा ऑनलाईन सेवांद्वारे पुरविलेल्या डिजिटल सामग्रीविषयीच्या सर्व खरेद्या अंतिम आहेत आणि अशी सामग्री किंवा सेवा ऑनलाईन पुरविली असताना अ-परतावाक्षम आहेत. आपल्याला कोणत्याही कूलिंग ऑफ कालावधीचा किंवा कोणत्याही परताव्याचा अधिकार नाही.
 • h. सेवा रद्द करणे. आपण कधीही, कारणासह किंवा कारणाशिवाय सेवा रद्द करु शकता. सेवा रद्द करण्यासाठी आणि परताव्याची विनंती करण्यासाठी, आपल्याला तसे करण्याचा अधिकार असल्यास, Microsoft खाते व्यवस्थापन वेबसाईट येथे भेट द्या. Skype साठी कृपया येथे दिलेली माहिती वापरुन बाहेर पडण्याचा अर्ज पूर्ण करा. आपण सेवांचे वर्णन करणार्‍या ऑफरचा परत संदर्भ घ्यावा कारण (i) आपल्याला रद्दीकरणाच्या वेळी परतावा प्राप्त होऊ शकणार नाही; (ii) आपल्याला रद्दीकरण शुल्क अदा करण्याचे दायित्व असू शकेल; (iii) रद्दीकरणाच्या दिनांकापूर्वी सेवांसाठी आपल्या देयक खात्यामध्ये आकारलेले सर्व शुल्क अदा करण्याचे दायित्व आपल्याला असू शकेल; आणि (iv) आपण सेवा रद्द कराल तेव्हा आपल्या खात्याचा वापर आणि त्याकडे प्रवेश आपण गमावू शकाल; किंवा, आपण तैवान येथे राहत असल्यास, (v) रद्दीकरणाच्या वेळी मोजणी केलेला, आपण सेवेसाठी अदा केलेल्या न वापरलेल्या शुल्काच्या समान रकमेइतका परतावा आपल्याला मिळू शकेल. आम्ही आपल्या डेटावर वर विभाग 4 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रक्रिया करू. आपण रद्द केल्यास, आपल्या सद्य सेवा कालावधीच्या शेवटी, किंवा आम्ही आपल्या खात्यावर नियत काळाने देयक आकारत असल्यास, आपण रद्द केले त्या कालावधीच्या शेवटी आपला सेवांकडील प्रवेश संपतो.
 • i. चाचणी कालावधी ऑफर. जर आपण कोणत्याही चाचणी कालावधी ऑफरमध्ये भाग घेत असाल तर आपण नवीन शुल्क लागणे टाळण्यासाठी चाचणी कालावधीच्या शेवटी चाचणी सेवा रद्द केली(ल्या) पाहिजे(त), जर आम्ही आपल्या इतर प्रकारे सूचित केले नसेल तर. जर आपण चाचणी कालावधीच्या शेवटी चाचणी सेवा रद्द केली(ल्या) नाहीत तर आम्ही आपल्या सेवे(वां)साठी शुल्क आकारु शकतो.
 • j. प्रचारात्मक ऑफर. वेळोवेळी, Microsoft चाचणी कालावधीसाठी सेवा मोफत प्रदान करु शकेल. आपण ऑफरच्या अटींचा गैरवापर करत आहात असे Microsoft ने (त्यांच्या वाजवी विवेकबुद्धीने) ठरविल्याच्या प्रसंगात आपल्याला अशा सेवांसाठी शुल्क आकारण्याचा (सामान्य दराने) अधिकार Microsoft आरक्षित ठेवते.
 • k. किंमतीतील बदल. आम्ही कधीही सेवांच्या किंमतीमध्ये बदल करु शकतो आणि जर आपली आवर्ती खरेदी असेल, तर किंमती बदलण्यापूर्वी आपल्याला ईमेलद्वारे, किंवा इतर वाजवी रीतीने, किमान 15 दिवस आधी आम्ही सूचित करु. जर आपण किंमतीतील बदलाशी सहमत नसाल तर आपण किंमतीतील बदल प्रभावात येण्यापूर्वी सेवा रद्द केल्या पाहिजेत आणि वापरणे थांबविले पाहिजे. जर आपल्या सेवा ऑफरसाठी निश्चीत मुदत आणि किंमत असेल तर ती किंमत निश्चीत मुदतीसाठी प्रभावात राहील.
 • l. आपल्याला अदागी. जर आम्ही आपल्याला अदागी देणे असू तर आम्हाला ती अदागी आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कोणतीही माहिती वक्तशीरपणे आणि अचूकपणे आम्हाला पुरविण्यास आपण सहमत होता. या अदागीच्या परिणामतः आपल्याला लागणारे कोणतेही कर आणि शुल्क यांच्यासाठी आपण जबाबदार आहात. कोणत्याही अदागीसाठीच्या आपल्या अधिकारावर आम्ही लावणार्‍या इतर शर्तींचेदेखील आपल्याला पालन करावे लागेल. आपल्याला चूकीने अदागी प्राप्त झाल्यास आम्ही अदागी उर्ध्व करु किंवा आम्हाला त्याची परतणी आवश्यक असेल. असे करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये आम्हाला सहकार्य करण्यास आपण सहमत होता. मागील कोणत्याही अतिअदागीसाठी समयोजित करण्यासाठी सूचना दिल्याशिवाय आम्ही आपली अदागी कमीदेखील करु शकू.
 • m. भेटकार्डे. भेटकार्डांचा वापर आणि रीडेम्पशन (Skype भेटकार्डांव्यतिरिक्त) यांचे शासन Microsoft भेटकार्ड अटी आणि शर्ती यांद्वारे केले जाते. Skype भेटकार्डांविषयी माहिती Skype च्या मदत पृष्ठावर उपलब्ध आहे.
 • n. बॅंक खाते अदागी पध्दत. अदागी पध्दत म्ह्णून वापरण्यासाठी आपल्या Microsoft खात्याबरोबर आपण पात्र बॅंक खाते नोंदवू शकता. थेट डेबिट नोंदणी करण्यास सक्षम असलेल्या वित्तीय संस्थेतच्या आयोजित खात्यांमध्ये पात्र बॅंक खाती समाविष्ट आहेत (उदा., ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस नोंदीला युनायटेड स्टेट-आधारित वित्तीय संस्था समर्थन करते ("ACH") Single Euro Payments Area ला युरोपियन वित्तिय संस्था ("SEPA") किंवा "iDEAL" ला नेदरलॅन्डमध्ये समर्थन करते). आपल्या Microsoft खात्यामध्ये आपले बॅंक खाते अदागी पध्दत म्ह्णून जोडतेवेळी आपण ज्या अटींना मान्यता दिली (उदा. SEPA च्या केसमध्ये "जनादेश") ती देखील लागू आहेत. आपण प्रतिनिधत्व आणि आश्वासन देता की आपले नोंदणीकृत बॅंक खाते आपल्या नावावर आहे किंवा आपण नोंदणी करण्यास अधिकृत आहात आणि हे बॅंक खाते अदागी पध्दत म्ह्णून वापरू शकता. आपली अदागी पध्दत म्ह्णून आपण बॅंक खात्याची नोंदणी किंवा निवड केल्याने आपण आपल्या खरेदी किंवा सदस्यता शुल्कच्या एकूण रक्कमेसाठी (आपल्या सदस्यत्व सेवेच्या अटींनुसार) आपल्या बॅंक खात्यामधून एक किंवा अधिक डेबिट करण्याची Microsoft ला (किंवा त्याच्या एजंटला) सुरवात करण्यासाठी अधिकृत करता (आणि, जर आवश्यक असल्यास, त्रुटी दुरूस्त करण्यासाठी, परतावा जारी करण्यासाठी किंवा तत्सम उद्देशासाठी आपल्या बॅंक खात्यामधून एक किंवा अधिक डेबिट करणे सुरवात करू शकतात), आणि असे डेबिट कापून घेणे किंवा असे क्रेडिट स्वीकारायची आपल्या बॅंक खात्यावर असलेल्या वित्तीय संस्थेला अधिकृत करता. आपण हे समजता की आपल्या Microsoft खात्यामधून आपल्या बॅंक खात्याची माहिती आपण काढेपर्यंत ही अधिकृतता पूर्ण प्रभावीपणे प्रभावी राहील. आपल्याला चुकीने शुल्क आकारणी केली आहे असे आपल्याला वाटल्यास आपण शक्यतो लवकरात लवकर विभाग 4(e) मध्ये रूपरेषित केल्याप्रमाणे ग्राहक पाठबळशी संपर्क साधा. आपल्या देशातील लागू कायदे, आपल्या बॅंक खात्यामधून होणारे कोणतेही घोटाळे, चुकीचे किंवा अनधिकृत व्यवाहारापासून आपले दायित्व देखील मर्यादित करू शकतात. आपल्या अदागी पध्दतीने आपण बॅंक खात्याची नोंदणी किंवा निवड केल्याने, आपण ह्या अटी वाचल्या आहेत, समजल्या आहेत आणि त्याच्याशी सहमत असण्याची आपण नोंद घेता.
पूर्ण मजकूर
कंत्राट करणारे आस्थापन, कायद्याची निवड व वाद सोडविण्यासाठीचे स्थानकंत्राट करणारे आस्थापन, कायद्याची निवड व वाद सोडविण्यासाठीचे स्थान10_11_contractingEntityChoiceOfLaw
सारांश

10. कंत्राट करणारे आस्थापन, कायद्याची निवड व वाद सोडविण्यासाठीचे स्थान. मोफत आणि सशुल्क उपभोक्ता Skype ब्रँडच्या सेवांच्या आपल्या वापरासाठी, आपण "Microsoft" सोबत कंत्राट करत आहात आणि या अटींतील "Microsoft" च्या सर्व संदर्भांचा अर्थ आहे, Skype Communications S.à.r.l, 23 – 29 Rives de Clausen, L-2165 Luxembourg. Skype ब्रॅंडच्या मोफत किंवा देय ग्राहक सेवांसाठी, लक्झेमबर्ग कायदा या अटींच्या अन्वयार्थाचे शासन करतो आणि त्यांच्या भंगासाठी दावा करतो, कायदे तत्त्वांच्या संघर्षाच्या अपरोक्ष. आपण जेथे राहता त्या प्रातांचे किंवा देशाचे कायदे इतर सर्व दाव्यांचे शासन करतात (ग्राहक संरक्षण, अन्याय्य स्पर्धा आणि अपकृत्य दावे यांच्या समावेशासह). जर Skype खाते बनवून किंवा Skype वापरुन आपण या अटी स्वीकारल्या तर आपण आणि आम्ही या अटी किंवा ग्राहक Skype ब्रॅंडच्या सेवा यांच्याशी संबंधित किंवा यांतून निर्माण होणार्‍या सर्व संघर्षांसाठी लक्झेमबर्ग न्यायालयांचे अपवर्जक अधिकारक्षेत्र आणि स्थळ यांस अरद्दबातलक्षमपणे सहमत होतो. इतर सर्व सेवांसाठी, जर Microsoft खाते बनवून किंवा इतर कोणत्याही सेवा वापरुन आपण या अटी स्वीकारल्या तर आपण ज्या आस्थापनासोबत कंत्राट करत आहात ते, शासन करणारा कायदा आणि संघर्ष सोडविण्यासाठीचे स्थळ खाली आहेत:

 • a. कॅनडा. जर आपण कॅनडामध्ये राहत असाल (किंवा जर व्यवसाय असल्यास, आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण कॅनडा असेल) तर आपण Microsoft Corporation, One Microsoft Way, Redmond, WA 98052, U.S.A यांच्यासोबत कंत्राट करत आहात. आपण जेथे राहता त्या प्रांताचे (किंवा जर व्यवसाय असल्यास, आपल्या व्यवसायाच्या प्रमुख ठिकाणाचे) कायदे या अटींचा अन्वयार्थ, त्यांच्या भंगाचे दावे आणि इतर सर्व दावे यांचे (ग्राहक संरक्षण, अन्याय्य स्पर्धा आणि अपकृत्य दावे यांच्या समावेशासह) शासन करतात, कायदे तत्त्वांच्या संघर्षाच्या अपरोक्ष. आपण आणि आम्ही या अटी किंवा सेवा यांच्याशी संबंधित किंवा यांतून निर्माण होणार्‍या सर्व संघर्षांसाठी ओंटारिओतील न्यायालयांचे अपवर्जक अधिकारक्षेत्र आणि स्थळ यांस अरद्दबातलक्षमपणे संमती देतो.
 • b. संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांच्या बाहेरील उत्तर किंवा दक्षिण अमेरिका. जर आपण संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांच्या बाहेरील उत्तर किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये राहत असाल (किंवा जर व्यवसाय असल्यास, आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांच्या बाहेरील उत्तर किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये असेल) तर आपण Microsoft Corporation, One Microsoft Way, Redmond, WA 98052, U.S.A. यांच्यासोबत कंत्राट करत आहात. वॉशिंग्टन राज्याचे कायदे या अटींचा अन्वयार्थ आणि त्यांच्या भंगाचे दावे यांचे शासन करतात, कायद्याच्या पसंतीच्या तत्त्वांच्या संघर्षाच्या अपरोक्ष. आम्ही आपल्या सेवा ज्या देशाकडे निर्देशित करतो त्या देशाचे कायदे इतर सर्व दाव्यांचे शासन करतात (ग्राहक संरक्षण, अन्याय्य स्पर्धा आणि अपकृत्य दावे यांच्या समावेशासह).
 • c. मध्यपूर्व किंवा आफ्रिका. जर आपण मध्यपूर्व किंवा आफ्रिकेमध्ये राहत असाल (किंवा जर व्यवसाय असल्यास, आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण मध्यपूर्व किंवा आफ्रिका असेल) आणि आपण सेवांचे मोफत भाग (जसे की Bing आणि MSN) वापरत असाल तर आपण Microsoft Corporation, One Microsoft Way, Redmond, WA 98052, U.S.A. सोबत कंत्राट करत आहात. जर आपण सेवांचा भाग वापरण्यासाठी पैसे दिलेले असतील तर आपण Microsoft Ireland Operations Limited, One Microsoft Place, South County Business Park, Leopardstown, Dublin 18, Ireland सोबत कंत्राट करत आहात. मोफत आणि देय ग्राहक सेवांसाठी, आयर्लंडचे कायदे या अटींच्या अन्वयार्थाचे शासन करतात आणि त्यांच्या भंगासाठी दावा करतात, कायद्यांच्या तत्त्वांच्या संघर्षाच्या अपरोक्ष. आम्ही आपल्या सेवा ज्या देशाकडे निर्देशित करतो त्या देशाचे कायदे इतर सर्व दाव्यांचे शासन करतात (ग्राहक संरक्षण, अन्याय्य स्पर्धा आणि अपकृत्य दावे यांच्या समावेशासह). आपण आणि आम्ही या अटी किंवा सेवा यांच्याशी संबंधित किंवा यांतून निर्माण होणार्‍या सर्व संघर्षांसाठी आयर्लंडच्या न्यायालयांचे अपवर्जक अधिकारक्षेत्र आणि स्थळ यांस अरद्दबातलक्षमपणे सहमत होतो.
 • d. आशिया किंवा दक्षिण प्रशांत, आपल्या देशाचा खाली विशेषत्वाने नामोल्लेख नसल्यास. आपण आशियामध्ये (चीन, जपान, कोरियन प्रजासत्ताक किंवा तैवान वगळता) किंवा दक्षिण पॅसिफिकमध्ये राहत असल्यास (किंवा, व्यवसाय असल्यास, तेथे आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण असल्यास) आणि आपण सेवांचे मोफत भाग (जसे की Bing आणि MSN) वापरत असल्यास, आपण Microsoft Corporation, One Microsoft Way, Redmond, WA 98052, U.S.A. यांच्यासोबत कंत्राट करत आहात. आपण सेवांचा भाग वापरण्यासाठी पैसे दिले असल्यास किंवा सिंगापूर किंवा हाँगकाँगमध्ये मोफत Outlook.com सेवा वापरत असल्यास, आपण Microsoft Regional Sales Corp., नेवाडा राज्य, U.S.A. यांच्या कायद्यांअंतर्गत संघटित केलेली कॉर्पोरेशन, जिच्या शाखा सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये आहेत, जिचे व्यवसायाचे प्रमुख ठिकाण 438B Alexandra Road, #04-09/12, Block B, Alexandra Technopark, Singapore, 119968 हे आहे, यांच्यासोबत कंत्राट करत आहात; आपण ऑस्ट्रेलियामध्ये राहत असल्यास (किंवा, व्यवसाय असल्यास, तेथे आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण असल्यास), आपण Microsoft Pty Ltd, 1 Epping Road, North Ryde, NSW 2113, Australia यांच्यासोबत कंत्राट करत आहात आणि आपण न्यूझिलंडमध्ये राहत असल्यास (किंवा, व्यवसाय असल्यास, तेथे आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण असल्यास), आपण Microsoft New Zealand Limited, Level 5, 22 Viaduct Harbour Avenue, PO Box 8070 Symonds Street, Auckland, 1150 New Zealand यांच्यासोबत कंत्राट करत आहात. मोफत आणि सशुल्क सेवांसाठी, वॉशिंग्टन राज्याचा कायदा या अटींच्या अन्वयार्थाचे आणि त्यांच्या उल्लंघनाचे दावे शासित करतो, कायदे तत्त्वांच्या संघर्षाच्या अपरोक्ष. आम्ही आपल्या सेवा ज्या देशाकडे निर्देशित करतो त्या देशाचे कायदे इतर सर्व दाव्यांचे शासन करतात (ग्राहक संरक्षण, अन्याय्य स्पर्धा आणि अपकृत्य दावे यांच्या समावेशासह). या अटी किंवा Skype व्यतिरिक्त सेवांच्या संबंधात किंवा त्यांच्यातून निर्माण होणारा कोणताही वाद, सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (SIAC) लवाद नियमांनुसार, ज्याचे नियम या कलमामधील संदर्भाद्वारे बनविल्याचे मानले जातात, सिंगापूरमधील लवादाकडे नेला जाईल आणि त्यांच्याद्वारे अंतिमतः सोडविला जाईल. न्यायाधिकरण SIAC च्या अध्यक्षाद्वारे नियुक्त केल्या जाणार्‍या एका लवादाने बनलेले असेल. लवादाची भाषा इंग्रजी असेल. लवादाचा निर्णय अंतिम, बंधनकारक आणि अखंडनीय असेल आणि तो कोणत्याही देश किंवा प्रदेशामधील निवाड्यासाठी आधार म्हणून वापरला जाऊ शकेल.
 • e. जपान. जर आपण जपानमध्ये राहत असाल (किंवा जर व्यवसाय असल्यास, आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण जपान असेल) आणि आपण सेवांचे मोफत भाग (जसे की Bing आणि MSN) वापरत असाल तर आपण Microsoft Corporation, One Microsoft Way, Redmond, WA 98052, U.S.A. सोबत कंत्राट करत आहात. जर आपण सेवांचा भाग वापरण्यासाठी पैसे दिलेले असतील तर आपण Japan Co., Ltd (MSKK), Shinagawa Grand Central Tower, 2-16-3 Konan Minato-ku, Tokyo 108-0075 सोबत कंत्राट करत आहात. मोफत आणि देय ग्राहक सेवांसाठी, जपानचे कायदे या अटींचे आणि त्यांच्याशी संबंधित किंवा त्यातून निर्माण होणार्‍या कोणत्याही प्रकरणाचे किंवा सेवांचे शासन करतात. आपण आणि आम्ही या अटी किंवा सेवा यांच्याशी संबंधित किंवा यांतून निर्माण होणार्‍या सर्व संघर्षांसाठी टोकियो जिल्हा न्यायालयाचे अपवर्जक मूळ अधिकारक्षेत्र आणि स्थळ यांस अरद्दबातलक्षमपणे सहमत होतो.
 • f. कोरियन प्रजासत्ताक. जर आपण कोरियन प्रजासत्ताकामध्ये राहत असाल (किंवा जर व्यवसाय असल्यास, आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण कोरियन प्रजासत्ताक असेल) आणि आपण सेवांचे मोफत भाग (जसे की Bing आणि MSN) वापरत असाल तर आपण Microsoft Corporation, One Microsoft Way, Redmond, WA 98052, U.S.A. सोबत कंत्राट करत आहात. जर आपण सेवांचा भाग वापरण्यासाठी पैसे दिलेले असतील तर आपण Microsoft Korea, Inc., 11th Floor, Tower A, K-Twin Tower, Jongro 1 gil 50, Jongro-gu, Seoul, Republic of Korea, 110-150 सोबत कंत्राट करत आहात. मोफत आणि देय ग्राहक सेवांसाठी, कोरियन प्रजासत्ताकाचे कायदे या अटींचे आणि त्यांच्याशी संबंधित किंवा त्यातून निर्माण होणार्‍या कोणत्याही प्रकरणाचे किंवा सेवांचे शासन करतात. आपण आणि आम्ही या अटी किंवा सेवा यांच्याशी संबंधित किंवा यांतून निर्माण होणार्‍या सर्व संघर्षांसाठी सेऊल मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाचे अपवर्जक मूळ अधिकारक्षेत्र आणि स्थळ यांस अरद्दबातलक्षमपणे सहमत होतो.
 • g. तैवान. जर आपण तैवानमध्ये राहत असाल (किंवा जर व्यवसाय असल्यास, आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण तैवान असेल) आणि आपण सेवांचे मोफत भाग (जसे की Bing आणि MSN) वापरत असाल तर आपण Microsoft Corporation, One Microsoft Way, Redmond, WA 98052, U.S.A. सोबत कंत्राट करत आहात. जर आपण सेवांचा भाग वापरण्यासाठी पैसे दिलेले असतील तर आपण Microsoft Taiwan Corp., 18F, No. 68, Sec. 5, Zhongxiao E. Rd., Xinyi District, Taipei 11065, Taiwan सोबत कंत्राट करत आहात. मोफत आणि देय सेवांसाठी, तैवानचे कायदे या अटींचे आणि त्यांच्याशी संबंधित किंवा त्यातून निर्माण होणार्‍या कोणत्याही प्रकरणाचे किंवा सेवांचे शासन करतात. Microsoft Taiwan Corp. विषयी अधिक माहितीसाठी, कृपया आर्थिक व्यवहार मंत्रालय R.O.C. द्वारे पुरविलेली वेबसाईट पहा. आपण आणि आम्ही या अटी किंवा सेवा यांच्याशी संबंधित किंवा यांतून निर्माण होणार्‍या सर्व वादांवर तैवानच्या कायद्यांनी परवानगी दिलेल्या महत्तम मर्यादेपर्यंत अधिकारक्षेत्र असणारे प्रथम सुनावणीचे न्यायालय म्हणून तैपेई जिल्हा न्यायालयास अरद्दबातलक्षमपणे नियुक्त करतो.

या अटी असूनही आपल्या स्थानिक ग्राहक कायद्यांना दुसर्‍या मंचामध्ये वाद सोडविण्याचा अधिकार आपल्याला देण्यासाठी किंवा त्यांचे शासन करण्यासाठी काही स्थानिक कायद्यांची आवश्यकता असू शकेल. असे असल्यास, विभाग 10 मधील कायद्याची पसंती आणि मंचाची प्राविधाने आपल्या स्थानिक ग्राहक कायद्यांनी परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत लागू होतील.

पूर्ण मजकूर
वॉरंट्यावॉरंट्या12_Warranties
सारांश

11. वॉरंट्या.

 • a. MICROSOFT आणि आमचे सहयोगी, पुनर्विक्रेते, वितरक आणि विक्रेते, सेवांच्या आपल्या वापराशी संबंधित कोणत्याही वॉरंट्या, स्पष्ट किंवा अभिप्रेत, हमी किंवा शर्ती देत नाही. आपण हे समजता की या सेवांचा वापर आपल्या स्वतःच्या जोखमीवर आहे आणि आम्ही या सेवा “जसे आहे तसे” तत्वावर “सर्व दोषांसह” आणि “जसे उपलब्ध तसे” आहे पुरवितो. सेवांची अचूकता किंवा वक्तशीरपणा यांची Microsoft हमी देत नाही. आपल्याला आपल्या स्थानिक कायद्यांतर्गत काही अधिकार असू शकतात. या अटींमधील कशाचाही त्या अधिकारांना प्रभावित करण्याचा हेतू नाही, जर ते लागू असतील तर. आपण याची पोच देता की संगणक आणि दूरसंचार प्रणाली दोष-मुक्त नाहीत आणि डाउनटाईमचे प्रासंगिक कालावधी घडतात. आम्ही याची हमी देत नाही की या सेवा अखंडितपणे, वेळेवर, सुरक्षित किंवा त्रुटी-मुक्त असतील किंवा सामग्री गहाळ होणार नाही किंवा संगणक नेटवर्कला कोणत्याही जोडणीची किंवा त्यामधून प्रसारणाचीदेखील आम्ही हमी देत नाही.
 • b. आपल्या स्थानिक कायद्यांतर्गत परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, व्यापारक्षमता, समाधानकारक गुणवत्ता, एखाद्या विशिष्ट हेतूसाठी तंदुरुस्ती, कामगाराप्रमाणे प्रयत्न आणि अ-उल्लंघन यांसाठीच्या कोणत्याही अभिप्रेत वॉरंट्या आम्ही अपवर्जित करतो.
 • c. ऑस्ट्रेलियामध्ये राहणार्‍या ग्राहकांसाठी: आमचा माल ऑस्टेलियन ग्राहक कायद्यांतर्गत अपवर्जित केल्या न जाऊ शकणार्‍या हमींसह येतो. मोठ्या अपयशासाठी आपल्याला बदलीचा किंवा परताव्याचा आणि इतर कोणत्याही वाजवीपणे अंदाजित हानी किंवा नुकसानासाठी नुकसानभरपाईचा हक्क आहे. जर माल स्वीकारार्ह गुणवत्तेचा नसेल आणि अपयश हे मोठे अपयश नसेल तर माल दुरुस्त किंवा बदली करुन मिळण्याचा हक्कदेखील आपल्याला आहे.
 • d. न्यूझीलंडमध्ये राहणार्‍या ग्राहकांसाठी, न्यूझीलंड ग्राहक हमी कायद्यांतर्गत आपल्याला स्थायी अधिकार असू शकतील आणि या अटींमधील कशाचाही त्या अधिकारांना प्रभावित करण्याचा हेतू नाही.
पूर्ण मजकूर
उत्तरदायित्वाची मर्यादाउत्तरदायित्वाची मर्यादा13_limitationOfLiability
सारांश

12. उत्तरदायित्वाची मर्यादा.

 • a. आपल्याकडे नुकसानाची पुनर्प्राप्ती (या अटींच्या भंगाच्या समावेशासह) करण्यासाठी, लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, कोणताही आधार असल्यास आपण यास सहमत होता की आपला अनन्य तोडगा Microsoft किंवा कोणतेही सहयोगी, पुनर्विक्रेते, वितरक, तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा प्रदाते आणि विक्रेते यांच्याकडून भंग झालेल्या महिन्यादरम्यानच्या आपल्या सेवा शुल्काच्या समान रकमेपर्यंत थेट नुकसानाची (किंवा जर सेवा मोफत असतील तर USD$10.00 पर्यंत) पुनर्प्राप्ती करणे हा आहे.
 • b. कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, आपण कोणतीही (i) परिणामस्वरूप हानी किंवा नुकसान; (ii) प्रत्यक्ष किंवा अंदाजित नफा (थेट किंवा अप्रत्यक्षरित्या); (iii) प्रत्यक्ष किंवा अंदाजित उत्पन्न (थेट किंवा अप्रत्यक्षरित्या); (iv) कंत्राट किंवा व्यवसाय गमावणे किंवा अ-वैयक्तिक क्षमतेमध्ये सेवांच्या आपल्या वापरातून निर्माण होणारी हानी किंवा नुकसान; (v) विशेष, अप्रत्यक्ष, प्रसंगात्मक किंवा दंडात्मक हानी किंवा नुकसान; आणि (vi) कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, वरील 12(a) विभागामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वरच्या मर्यादांच्या अतिरिक्त थेट हानी किंवा नुकसान यांसाठी पुनर्प्राप्ती करू शकत नाही. जर हा तोडगा आपल्याला त्याच्या अत्यावश्यक हेतूच्या कोणत्याही हानी किंवा अपयशाच्या पूर्ण नुकसानभरपाईची पुनर्प्राप्ती करुन देत नसेल तर किंवा जर आम्हाला नुकसानाच्या शक्यतेविषयी माहिती होती किंवा असायला हवी होती तर या मर्यादा आणि अपवर्जने लागू होतात. कायद्याने परवानगी दिलेल्या महत्तम मर्यादेपर्यंत, या मर्यादा आणि अपवर्जने या अटी, या सेवा किंवा या सेवांशी संबंधित सॉफ्टवेअरशी संबंधित कशासही किंवा कोणत्याही दाव्यास लागू होतात.
 • c. Microsoft च्या वाजवी नियंत्रणापलीकडील परिस्थितींमुळे (जसे की कामगार वाद, दैवी कृत्य, युद्ध किंवा दहशतवादी क्रियाकलाप, द्वेषपूर्ण नुकसान, अपघात किंवा कोणत्याही लागू कायदा किंवा सरकारी आदेशाचे पालन) अपयश किंवा विलंब झाला असण्याच्या मर्यादेपर्यंत, या अटींअंतर्गत त्यांची कर्तव्ये बजाविण्यामधील कोणत्याही अपयशासाठी किंवा विलंबासाठी Microsoft जबाबदार किंवा उत्तरदायी नाही. यांपैकी कोणत्याही प्रसंगांचा प्रभाव कमीत कमी करण्याचा आणि प्रभावित न झालेली कर्तव्ये बजाविण्याचा Microsoft प्रयत्न करेल.
पूर्ण मजकूर
सेवा-विनिर्दिष्ट अटीसेवा-विनिर्दिष्ट अटी14_service-SpecificTerms
सारांश

13. सेवा-विनिर्दिष्ट अटी. विभाग 13 च्या आधीच्या आणि नंतरच्या सर्व अटी सामान्यतः सर्व सेवांना लागू होतात. या विभागामध्ये सेवा-विनिर्दिष्ट अटी आहेत ज्या सामान्य अटींसोबत अतिरिक्त आहेत. सर्वसाधारण अटींशी कोणतेही संघर्ष असल्यास या सेवा-विनिर्दिष्ट अटी शासन करतात.

पूर्ण मजकूर
Xbox Live आणि Microsoft Studios खेळ आणि अनुप्रयोगXbox Live आणि Microsoft Studios खेळ आणि अनुप्रयोग14a_XboxLive
सारांश
 • a. Xbox Live आणि Microsoft Studios खेळ आणि अनुप्रयोग.
  • i. वैयक्तिक अव्यावसायिक वापर. Xbox Live, Windows Live साठी खेळ आणि Microsoft द्वारा पुरविलेले Microsoft Studios खेळ, अनुप्रयोग, सेवा आणि सामग्री (सामुहिकपणे, "Xbox सेवा") केवळ आपल्या वैयक्तिक आणि अव्यावसायिक वापरासाठी आहेत.
  • ii. Xbox सेवा. आपण Xbox Live साठी साइन अप करता आणि/किंवा Xbox सेवा मिळवता तेव्हा, आपला गेम प्ले, क्रियाकलाप आणि गेम आणि Xbox सेवांचा वापर यांविषयीच्या माहितीचा माग ठेवला जाईल आणि ती Microsoft आणि तृतीय पक्ष गेम विकासकांना त्यांचे गेम संचालित करता यावेत आणि सेवा Xbox सेवा वितरित करता याव्यात म्हणून संबंधित तृतीय पक्ष गेम विकासकांसोबत शेअर केली जाईल. आपण आपले Microsoft Xbox सेवा खाते आपल्या बिगर-Microsoft सेवेवरील खात्याशी लिंक करणे निवडल्यास (उदाहरणार्थ, तृतीय पक्षीय ॲप्स आणि सेवांचा बिगर-Microsoft प्रकाशक) आपण याशी सहमत होता की: (a) Microsoft गुप्तता विधानामध्ये म्हटल्याप्रमाणे Microsoft त्या बिगर-Microsoft पक्षासोबत मर्यादित खाते माहिती (गेमरटॅग, गेमरस्कोर, खेळ गुणसंख्या, खेळ इतिहास आणि मित्रसूची यांच्या मर्यादेशिवाय समावेशासह) सामायिक करू शकेल, आणि (b) जर आपल्या Xbox गुप्तता सेटिंग्जनी परवानगी दिली असल्यास, आपण बिगर-Microsoft पक्षासोबतच्या आपल्या खात्यामध्ये साइन इन असाल तेव्हा त्या बिगर-Microsoft पक्षाला खेळांतर्गत संवादातील आपल्या सामग्रीकडेदेखील प्रवेश असू शकेल. तसेच, आपल्या Xbox गुप्तता सेटिंग्जनी परवानगी दिली असल्यास, Microsoft आपण अनुमती दिलेल्या लोकांसाठी संवादांमध्ये आपले नाव, गेमरटॅग, गेमरपिक, घोषवाक्य, अवतार, गेमक्लिप्स आणि आपण खेळलेले गेम प्रकाशित करू शकते.
  • iii. आपली सामग्री. Xbox सेवा समुदाय उभारण्याचा भाग म्हणून आपण Microsoft, त्यांचे सहयोगी आणि उपपरवानाधारक यांना आपली सामग्री किंवा आपले नाव, गेमरटॅग, घोषवाक्य किंवा कोणत्याही Xbox सेवेसाठी आपण पोस्ट केलेला अवतार वापरण्याचा, त्यात फेरबदल करण्याचा, वितरित, प्रक्षेपित, सामायिक करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मुक्त आणि जागतिक अधिकार देता.
  • iv. खेळ व्यवस्थापक. काही खेळ खेळ व्यवस्थापक आणि यजमान वापरु शकतात. खेळ व्यवस्थापक आणि यजमान Microsoft चे प्राधिकृत प्रवक्ते नाहीत. त्यांची मते Microsoft च्या मतांना प्रतिबिंबीत करतीलच असे नाही.
  • v. Xbox वर लहान मुले. जर आपण Xbox Live वापरणारे अवयस्क असाल तर आपल्या पालकांचे आपल्या खात्याच्या अनेक अनुषंगांवर नियंत्रण असू शकते आणि त्यांना आपल्या Xbox Live च्या वापराविषयी अहवाल प्राप्त होऊ शकेल.
  • vi. खेळाचे चलन किंवा आभासी माल. सेवांमध्ये आभासी, खेळाच्या चलनाचा (जसे की सोने, नाणी किंवा गुण) समावेश असू शकतो जे, जर आपण जेथे राहता तेथे “प्रौढ” वय गाठलेले असेल तर, Microsoft कडून प्रत्यक्ष आर्थिक साधने वापरुन खरेदी करता येऊ शकते. सेवांमध्ये आभासी, डिजिटल आयटम किंवा मालाचादेखील समावेश असू शकतो जे Microsoft कडून प्रत्यक्ष आर्थिक साधने वापरुन किंवा खेळाचे चलन वापरुन खरेदी करता येऊ शकते. खेळाचे चलन आणि आभासी माल कधीही Microsoft किंवा इतर कोणत्याही पक्षाकडील प्रत्यक्ष आर्थिक साधने, माल किंवा आर्थिक मूल्य असणार्‍या इतर आयटम यांसाठी रीडिम केला जाऊ शकणार नाही. केवळ या सेवांमध्येच खेळाचे चलन आणि आभासी माल वापरण्याच्या मर्यादित, वैयक्तिक, रद्दबातलक्षम, अहस्तांतरणीय, उपपरवाना-अक्षम परवान्याव्यतिरिक्त, या सेवांमध्ये दिसणार्‍या किंवा त्यांतून उगम पावणार्‍या असे कोणतेही खेळाचे चलन किंवा आभासी माल किंवा या सेवांमध्ये संचयित केलेले किंवा या सेवांच्या वापराशी संबंधित असलेले इतर कोणतेही गुणधर्म यांमध्ये किंवा यांचा आपल्याला कोणताही अधिकार किंवा हक्क नाही. Microsoft कधीही त्यांच्या एकट्याच्या विवेकबुद्धीमध्ये योग्य वाटेल त्याप्रमाणे खेळाचे चलन आणि/किंवा आभासी माल यांचे नियमन, नियंत्रण, फेरबदल आणि/किंवा निर्मूलन करु शकेल.
  • vii. सॉफ्टवेअर अद्यतने. Xbox सेवांशी कनेक्ट केल्या जाऊ शकणार्‍या कोणत्याही साधनासाठी, आम्ही Xbox कॉन्सोल सॉफ्टवेअर किंवा Xbox अ‍ॅप सॉफ्टवेअरची आपली आवृत्ती स्वयंचलितपणे तपासू शकतो आणि Xbox कॉन्सोल किंवा Xbox अ‍ॅप सॉफ्टवेअर अद्यतने किंवा कॉन्फिगरेशन बदल डाउनलोड करू शकतो, आपल्याला Xbox सेवांकडे प्रवेश करण्यापासून, अनधिकृत Xbox खेळ किंवा Xbox अ‍ॅप्स वापरण्यापासून किंवा Xbox कॉन्सोलद्वारे अनधिकृत हार्डवेअर परिघीय उपकरणे वापरण्यापासून प्रतिबंधित करणार्‍या अद्यतने किंवा कॉन्फिगरेशन बदलांच्या समावेशासह.
  • viii. गेमरटॅग मुदतबाह्यता. आपण Xbox सेवांमध्ये पाच वर्षांच्या कालावधीमध्ये किमान एकदा साइन इन केले पाहिजे, अन्यथा आपल्या खात्याशी संबंधित असलेल्या गेमरटॅगकडे प्रवेश आपण गमावू शकाल आणि तो गेमरटॅग इतरांद्वारे वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल.
  • ix. Arena. Arena हे Xbox सेवा आहे ज्याद्वारे Microsoft किंवा तृतीय पक्ष आपल्याला स्पर्धात्मक व्हिडिओ खेळ स्पर्धेमध्ये भाग घेण्याची किंवा तयार करण्याची क्षमता देऊ करू शकतात, काहीवेळा बक्षीसासाठी ("Contest"). Arena चा आपला वापर ह्या अटींच्या अधीन आहेत, आणि आपल्याला साइन अप करताना स्पर्धा आयोजकानी आवश्यक केलेले अधिक स्पर्धा अटी, अटी आणि नियमे स्वीकारणे आवश्यक होऊ शकतील ("Contest Terms"). पात्रता नियमे लागू होऊ शकतील, आणि अधिकारक्षेत्रानुसार बदलू शकतात. जिथे कायद्याने प्रतिबंधित किंवा मर्यादित आहेत तिथे स्पर्धा निरर्थक आहेत. ह्या अटींचे किंवा स्पर्धा अटींचे (आचार संहितासह) उल्लंघनाचा परिणाम दंडामध्ये होऊ शकतो किंवा स्पर्धेमधून अपात्रत करण्यात येऊ शकते. आपण जर स्पर्धा तयार केल्या, आपल्याला कोणत्याही स्पर्धा अटींची गरज लागणार नाही, ज्या अटींना Microsoft (त्यांच्या संपूर्ण विवेकबुध्दीनुसार) विसंगत ठरवू शकते. कोणतीही स्पर्धा कोणत्याही वेळी रद्द करण्याचा अधिकार Microsoft आरक्षित ठेवते.
  • x. सॉफ्टवेअरची फसवणूक आणि छेडछाडी. Xbox सेवांशी जोडल्या जाऊ शकणार्‍या कोणत्याही साधनासाठी, आचारसंहितेचे किंवा ह्या अटींचे उल्लंघन करणारे, फसवणूक आणि छेडछाडीला सक्षम करणारे अनधिकृत हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरसाठी आपल्या साधनाला आम्ही स्वयंचलितपणे तपासू शकतो आणि Xbox अ‍ॅप सॉफ्टवेअर अद्यतने किंवा कॉन्फिगरेशन बदल डाउनलोड करू शकतो, ह्यासह आपल्याला Xbox सेवांकडे प्रवेश करण्यापासून, किंवा फसवणूक आणि छेडछाडीला सक्षम करण्यार्‍या अनधिकृत हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरला वापरण्यापासून प्रतिबंधित करणारे.
  • xi. मिक्सर.
   • 1. मिक्सर खाती आणि Microsoft खाती. आपण जर का मिक्सर सेवा मिक्सर खात्याबरोबर वापरली, तर आपला वापर https://mixer.com/about/tos इथे उपलब्ध मिक्सर सेवा अटी द्वारे संरक्षित आहे. आपण जर मिक्सर सेवा Microsoft खात्याबरोबर वापरली, तर आपला वापर देखील ह्या अटी द्वारे संरक्षित राहील. ह्या अटी जिथे संघर्ष असेल तिथे लागू होतील.
   • 2. मिक्सरवरील आपली सामग्री. "मिक्सरवरील आपली सामग्री" म्हणजे मिक्सर सेवावर आपण किंवा आपल्या वतीने कोणीतरी तयार केलीली सर्व सामग्री, लाइव आणि रेकॉर्ड केलेल्या स्ट्रिम्स (आणि त्यात असणारी कोणतीही सामग्री, जशी ऑडिओव्हिज्युअल सामग्री); ब्रॅण्डचे नाव, ट्रेडमार्क, सेवा मार्क, ट्रेड नावे, लोगो, किंवा उपत्तीचा संकेत; आपली प्रतिक्रिया, इमोटिकॉन्स, आणि मिक्सर चॅनलवरील क्रियाकलाप (बॉट-व्युत्पन्न सामग्री समावेश असलेली); आणि संबंधित सर्व मेटडेटा समावेश असणारे परंतु मर्यादित नाही. कोणीही, Microsoft आणि वापरकर्त्यासह मिक्सरवरील आपली सामग्री पाहू, बाळगू शकतात, पुनरुत्पादित, फेरबदल वितरित करू शकतात, सार्वजनिकपणे आणि डिजिटल रूपात सादर करू शकतात आणि कोणत्याही स्वरुपात, स्वरूपनात, मिडिया किंवा आताच्या महितीच्या किंवा नंतर विकसित झालेल्या चॅनल्स द्वारे डिसप्ले, भाषांतरित, रूपांतरित करू शकतात आणि अन्य प्रकारे त्याचा गैरवापर करू शकतात.
   • 3. मिक्सरला लागू केलेली आचारसंहिता. मिक्सरला Microsoft ची आचारसंहिता कशी लागू होते ह्याची अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
   • 4. मिक्सर सेवा वापरणे.
    • a. किमान वय. मिक्सर सेवेचा वापर करून, आपण कमीत कमी 13 वर्षे वयाचे आहात याचे प्रतिनिधत्व करता, आणि जर आपण जेथे राहता तेथे प्रौढ वयाखालील असाल, आपला वापर पालक किंवा कायदेशीर पालकांकडून पर्यवेक्षण केला जाईल.
    • b. अनामिक आणि विना-अनामिक वापर. आपल्याला फक्त सामग्री पाहायची असेल तर आपण मिक्सर अनामिकपणे वापरू शकता. नाहीतर आपल्याला खाते तयार करावे लागेल, साइन-इन करावे लागेल आणि इतर वापरकर्त्यांना आपल्या मिक्सर नावाने ओळखले जाल.
    • c. विना-अनामिक वापरासाठी खाती. मिक्सर सेवेच्या विना-अनामिक वापरासाठी आपण Microsoft खाते आणि/किंवा मिक्सर खाते तयार करू शकता. ऑनलाईन साइन अप करून आपण मिक्सर खाते तयार करू शकता. आपले मिक्सर खाते सक्रिय ठेवण्यासाठी आपण ते वापरणे अनिवार्य आहे. आपल्या Microsoft खात्याशी मिक्सर उपनाव संबंधित ठेवण्यासाठी आपण मिक्सर सेवेमध्ये 5 वर्षांच्या कालावधीमध्ये किमान एकदा साइन इन केले पाहिजे.
   • 5. सेवा अधिसूचना. मिक्सर सेवेविषयी काही महत्त्वाचे सांगायचे असेल, तेंव्हा आम्ही आपल्याला आपल्या मिक्सर खात्याशी आणि/किंवा Microsoft खात्याशी संबंधित ईमेलवर सेवा अधिसूचना पाठवू.
   • 6. पाठबळ. मिक्सर सेवेसाठी ग्राहक पाठबळ mixer.com/contact येथे उपलब्ध आहे.
पूर्ण मजकूर
दुकानदुकान14b_Store
सारांश
 • b. दुकान. “Store” म्हणजे एक सेवा जी आपल्याला अनुप्रयोग (“अनुप्रयोग” संज्ञेमध्ये खेळ समाविष्ट आहेत) आणि इतर डिजिटल सामग्री ब्राऊज, डाउनलोड, खरेदी करु देते आणि त्यांचे गुणांकन आणि पुनरावलोकन करु देते. या अटी Office Store, Windows Store आणि Xbox Store यांचा वापर व्यापतात. "Office Store" म्हणजे Office उत्पादने आणि Office, Office 365, SharePoint, Exchange, Access आणि Project (2013 आवृत्त्या किंवा नंतरच्या) साठी अ‍ॅप्ससाठी दुकान. "Windows Store" म्हणजे फोन, PC आणि टॅबलेट यांसारख्या Windows उपकरणांसाठी दुकान किंवा Windows Store म्हणून ब्रॅंड केलेला इतर कोणताही अनुभव. "Xbox Store" म्हणजे Xbox One आणि Xbox 360 कॉन्सोलसाठी दुकान, किंवा Xbox Store म्हणून ब्रॅंड केलेला इतर कोणताही अनुभव.
  • i. परवाना अटी. आम्ही संबंधित दुकानामध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक अनुप्रयोगाच्या प्रकाशकाची ओळख देऊ. अनुप्रयोगासोबत वेगळ्या परवाना अटी पुरवलेल्या नसल्यास, या अटींच्या शेवटी असणार्‍या मानक अनुप्रयोग परवाना अटी (""SALT"") या Windows Store किंवा Xbox Store मधून आपण डाउनलोड करत असलेल्या अनुप्रयोगाच्या आपल्या वापरास लागू होणार्‍या परवाना अटी मांडणारा आपण आणि अनुप्रयोग प्रकाशक यांच्यामधील करार आहे. स्पष्टतेसाठी, या अटी Microsoft सेवांनी पुरवलेल्या सेवा आणि त्यांचा वापर व्यापतात. Store मधून संपादन केलेल्या कोणत्याही तृतीय-पक्ष ॲप्स आणि सेवांनादेखील या अटींचा विभाग 5 लागू होतो. Office Store द्वारे डाउनलोड केलेल्या अनुप्रयोगांचे SALT द्वारा शासन केले जात नाही आणि त्यांना लागू होणार्‍या वेगळ्या परवाना अटी आहेत.
  • ii. अद्यतने. Microsoft स्वयंचलितपणे आपल्या अनुप्रयोगांसाठी अद्यतने तपासेल आणि ती डाउनलोड करेल, आपण संबंधित दुकानामध्ये साइन इन नसलात तरीही. जर दुकान अनुप्रयोगांसाठी स्वयंचलित अद्यतने प्राप्त करण्यास आपले प्राधान्य नसेल तर आपण आपल्या दुकान किंवा प्रणाली सेटिंग्ज बदलू शकता. मात्र, काही Office दुकान अनुप्रयोग जे पूर्णतः किंवा अंशतः ऑनलाईन होस्ट केलेले आहेत ते अनुप्रयोग विकासकाद्वारे कधीही अद्यतनित केले जाऊ शकतील आणि ते अद्यतनित करण्यासाठी आपली परवानगी आवश्यक नसू शकेल.
  • iii. गुणांकने आणि पुनरावलोकने. जर आपण दुकानातील अनुप्रयोगास किंवा इतर डिजिटल मालास गुणांकन दिले किंवा त्याचे पुनरावलोकन केले, तर आपल्याला अनुप्रयोगाच्या किंवा डिजिटल मालाच्या प्रकाशकाकडील सामग्री असणारा ईमेल Microsoft कडून प्राप्त होऊ शकेल. असा कोणताही ईमेल Microsoft कडून येतो; आम्ही आपला ईमेल पत्ता दुकानाद्वारे आपण संपादित करणार्‍या अनुप्रयोगांच्या किंवा डिजिटल मालांच्या कोणत्याही प्रकाशकांशी सामायिक करत नाही.
  • iv. सुरक्षा इशारा. संभाव्य इजा, अस्वस्थता किंवा डोळ्यांवरील ताण टाळण्यासाठी आपण खेळांच्या किंवा इतर अनुप्रयोगांच्या वापरापासून नियत विराम घ्यावा, विशेषतः आपल्याला वापरामुळे कोणतीही वेदना किंवा थकवा जाणवत असल्यास. आपल्याला अस्वस्थता जाणवल्यास विराम घ्या. मळमळ वाटणे, गतीमुळे गरगरणे, भोवळ, हरवलेपण, डोकेदुखी, थकवा, डोळ्यांवरील ताण, डोळ्यांचा कोरडेपणा यांचा अस्वस्थतेत समावेश असू शकतो. अनुप्रयोग वापरणे आपले लक्ष विचलित करू शकते आणि आपल्याला भवतालापासून विलग करू शकते. अडखळण्याच्या धोकादायक जागा, ठेंगणी छते, ज्यांची हानी होऊ शकेल अशा नाजुक किंवा मौल्यवान वस्तू टाळा. अनुप्रयोगांमध्ये दिसू शकणार्‍या चमकत्या प्रकाश किंवा आकृतीबंधांसारख्या काही दृश्य प्रतिमांना अनावृत्त झाल्यावर खूप कमी टक्केवारीत लोकांना फेफर्‍यांचा अनुभव येऊ शकतो. अगदी फेफर्‍यांचा इतिहास नसलेल्या लोकांनाही निदान न केलेली स्थिती असू शकते ज्यामुळे हे फेफरे येऊ शकतात. लक्षणांमध्ये डोके हलके होणे, दृष्टीबदल, डोळे फडफडणे, हातपायास झटके येणे किंवा हलणे, स्थितीभान हरपणे, गोंधळणे, शुद्ध हरपणे किंवा आचके यांचा समावेश असू शकेल. आपल्याला यांपैकी कोणतीही लक्शणे अनुभवास आल्यास ताबडतोब वापर थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आपल्याला कधीही फेफर्‍यांशी जोडलेल्या लक्षणांचा त्रास झालेला असल्यास अनुप्रयोग वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षणांच्या चिन्हांसाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या अनुप्रयोगाच्या वापराचे पर्यवेक्षण करावे.
पूर्ण मजकूर
Microsoft Family वैशिष्ट्येMicrosoft Family वैशिष्ट्ये14c_MicrosoftFamily
सारांश
 • c. Microsoft Family वैशिष्ट्ये. कोणती वर्तणूक, वेबसाईट, ॲप्स, खेळ, भौतिक स्थाने आणि खर्च आपल्या कुटुंबासाठी योग्य आहे याबद्दलच्या सामायिक मतैक्यावर आधारित न्यास उभारण्यासाठी पालक आणि मुले Microsoft Family वैशिष्ट्ये वापरू शकतात. पालक https://account.microsoft.com/family येथे जाऊन (किंवा त्यांच्या Windows किंवा Xbox कॉन्सोलवरील सूचनांचे अनुसरण करून) आणि मुले किंवा इतर पालकांना सामील होण्यास आमंत्रित करून कुटुंब तयार करू शकतात. कुटुंब सदस्यांना अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे कृपया जेंव्हा आपण कुटुंब तयार करण्यास किंवा त्यात सामील होण्यास सहमत होता आणि जेंव्हा आपण डिजिटल माल खरेदी करता तेंव्हा पुरविलेल्या माहितीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा. कुटुंब तयार करून किंवा त्यात सामील होऊन, आपण सहमत आहात की आपण कुटुंब त्याच्या हेतूनुसार वापराल आणि दुसर्‍या व्यक्तीच्या माहितीकडे बेकायदेशीरपणे प्रवेश मिळविण्यासाठी अनधिकृतपणे त्याचा वापर करणार नाही.
पूर्ण मजकूर
समूह संदेशनसमूह संदेशन14d_GroupMessaging
सारांश
 • d. समूह संदेशन. विविध Microsoft सेवा आपल्याला इतरांना आवाज किंवा SMS ("संदेश") द्वारे संदेश पाठवू देतात आणि/किंवा Microsoft आणि Microsoft-नियंत्रित सहयोग्यांना असे संदेश आपल्याला आणि आपल्या वतीने एक किंवा अधिक इतर वापरकर्त्यांना पाठवू देतात. आपण Microsoft आणि Microsoft-नियंत्रित सहयोग्यांना असे संदेश आपल्याला किंवा इतरांना पाठवण्याच्या सूचना देता, तेव्हा आपण याचे प्रतिनिधित्व करता आणि आम्हाला हमी देता की आपण आणि आपण आम्हाला Microsoft किंवा Microsoft-नियंत्रित सहयोग्यांकडून जिला संदेश पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी प्रत्येक व्यक्ती असे संदेश आणि इतर संबंधित प्रशासकीय मजकूर संदेश प्राप्त करण्यास संमती देते. "प्रशासकीय मजकूर संदेश" हे, "स्वागत संदेश" किंवा संदेश प्राप्त करणे कसे थांबवावे याविषयीच्या सूचना यांच्या समावेशासह पण त्यापुरतेच मर्यादित नाही, विशिष्ट Microsoft सेवेकडील नियत व्यावहारिक संदेश आहेत. आपण किंवा यापुढे असे संदेश प्राप्त करू इच्छित नसणारे समूह सदस्य Microsoft किंवा Microsoft-नियंत्रित सहयोग्यांपासून पुढील संदेश प्राप्त करणे पुरविलेल्या सूचनांचे अनुसरण करून कधीही बाहेर पडू शकतात. आपल्याला यापुढे असे संदेश प्राप्त करू किंवा समूहात सहभागी होऊ इच्छित नसल्यास, आपण सहमत होता की आपण लागू कार्यक्रम किंवा सेवेने पुरविलेल्या सूचनांद्वारे बाहेर पडाल. एखादा समूह सदस्य यापुढे असे संदेश प्राप्त करू इच्छित नाही किंवा समूहात सहभागी होऊ इच्छित नाही असे वाटण्याचे आपल्याकडे कारण असल्यास, आपण त्यांना समूहातून काढून टाकण्यास सहमत होता. आपण याचेदेखील प्रतिनिधित्व करता आणि हमी देता की आपण आणि जिला संदेश पाठवण्याबाबत आपण आम्हाला सूचना दिल्या आहेत अशी प्रत्येक व्यक्ती हे समजते की प्रत्येक समूह सदस्य त्याच्या किंवा तिच्या मोबाईल वाहकाने मूल्यांकित केलेल्या कोणत्याही संदेश शुल्काच्या खर्चाला, US-आधारित क्रमांकावरून प्रक्षेपित केलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय संदेश शुल्कांसह, जबाबदार आहे.
पूर्ण मजकूर
Skype आणि GroupMeSkype आणि GroupMe14e_Skype
सारांश
 • e. Skype आणि GroupMe.
  • i. आपात्कालीन सेवांकडे प्रवेश नाही. पारंपारिक दूरध्वनी सेवा आणि Skype यांच्यामध्ये महत्त्वाचे फरक आहेत. Skype ला कोणत्याही लागू स्थानिक किंवा राष्ट्रीय नियम, नियमने किंवा कायद्यांतर्गत आपात्कालीन सेवांकडे प्रवेश प्रदान करण्याची आवश्यकता नाही. Skype चे सॉफ्टवेअर आणि उत्पादने यांचा कोणत्याही प्रकारची इस्पितळे, कायदे अंमलबजावणी संस्था, वैद्यकिय निगा युनिटे किंवा वापरकर्त्यास आपात्कालीन सेवा कर्मचारी किंवा सार्वजनिक सुरक्षा उत्तरबिंदू यांच्याशी जोडणार्‍या कोणत्याही प्रकारच्या सेवा ("आपात्कालीन सेवा") यांना समर्थन देण्याचा किंवा वाहण्याचा हेतू नाही. (i) आपात्कालीन सेवांकडे प्रवेश देऊ करणार्‍या पारंपरिक बिनतारी (मोबाईल) किंवा स्थिर लाइन टेलिफोन सेवांची खरेदी करण्याची जबाबदारी आपली आहे आणि (ii) Skype आपल्या प्राथमिक टेलिफोन सेवेची जागा घेत नाही.
  • ii. API किंवा प्रक्षेपण. जर आपल्याला कोणत्याही प्रक्षेपणाच्या संबंधात Skype वापरायचे असेल तर आपल्याला https://www.skype.com/go/legal.broadcast येथील "प्रक्षेपण TOS" चे पालन करणे अनिवार्य आहे. जर आपण Skype द्वारा अनावृत्त किंवा उपलब्ध केला गेलेला कोणताही अनुप्रयोग प्रोग्राम इंटरफेस ("API") वापरायचा असेल तर आपल्याला लागू परवाना अटींचे पालन करणे अनिवार्य आहे, ज्या www.skype.com/go/legal येथे उपलब्ध आहेत.
  • iii. न्याय्य वापर धोरणे. न्याय्य वापर धोरणे आपल्या Skype च्या वापरास लागू होऊ शकतील. कृपया या धोरणांचे पुनरावलोकन करा जी घोटाळे आणि गैरवापरापासून संरक्षण करण्यासाठी संरचित केलेली आहेत आणि आपण करण्यास सक्षम असलेले कॉल किंवा संदेश यांचा प्रकार, कालावधी किंवा आकार यांच्यावर मर्यादा घालू शकतील. ही धोरणे या अटींमध्ये संदर्भाद्वारे अंतर्भूत केली गेली आहेत. आपल्याला ही धोरणे https://www.skype.com/go/terms.fairusage/ येथे सापडू शकतील.
  • iv. मॅपिंग. Skype मध्ये असे वैशिष्ट्य आहे जे आपल्याला मॅपिंग सेवा वापरुन स्वतःची माहिती नकाशाला देऊ किंवा स्वतःला नकाशावर आलेखित करु देते. त्या वैशिष्ट्यांचा वापर करून आपण या अटी आणि https://www.google.com/intl/en_ALL/help/terms_maps.html येथे उपलब्ध असणार्‍या किंवा आपल्या देशात उपलब्ध असणार्‍या अशा Google Maps अटींशी सहमत होता.
  • v. सरकारी वापरकर्ते. जर आपण U.S. सरकार किंवा U.S. सरकारच्या संस्थेच्या वतीने व्यवसाय खाते किंवा Skype Manager वापरु इच्छिता तर त्या वापरास या अटी लागू होत नाहीत. लागू अटी किंवा अधिक माहितीसाठी, कृपया usgovusers@skype.net शी संपर्क साधा.
  • vi. वैयक्तिक/अव्यावसायिक वापर. Skype चा वापर आपल्या वैयक्तिक/अव्यावसायिक वापरासाठी आहे. आपल्याला Skype कामाच्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या व्यवसाय संवादासाठी वापरण्यास परवानगी आहे.
  • vii. Skype Number/Skype To Go. जर Skype आपल्याला Skype Number किंवा Skype To Go देते तर आपण याशी सहमत होता की आपल्याकडे त्या क्रमांकाची मालकी नाही किंवा आपल्याला तो क्रमांक कायम राखण्याचा अधिकार नाही. काही देशांमध्ये आपल्याला Skype ऐवजी Skype भागीदाराद्वारे क्रमांक उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो आणि आपल्याला अशा भागीदारासोबत वेगळा करार करावा लागू शकेल.
  • viii. Skype Manager. “Skype Manager Admin खाते” हे व्यवसाय आस्थापन म्हणून नाही, तर आपल्या Skype Manager समूहाचा व्यक्तिगत प्रशासक म्हणून काम करताना आपल्याद्वारे तयार आणि व्यवस्थापित केले जाते. आपले वैयक्तिक Microsoft खाते आपण Skype Manager समूहाशी लिंक करू शकता ("जोडलेले खाते"). आपण आपल्या Skype Manager समूहामध्ये अतिरिक्त प्रशासक नेमू शकता, त्यांच्या या अटींच्या स्वीकृतीच्या अधीन राहून. आपण जोडलेल्या खात्यास Skype Number वाटून दिल्यास आपल्या जोडलेल्या खात्याच्या वापरकर्त्यांचे निवास किंवा स्थान यांच्याशी संबंधित कोणत्याही आवश्यकतांचे पालन करण्यासाठी आपण जबाबदार आहात. आपण जोडलेले खाते Skype Manager समूहापासून अनलिंक करण्याचे निवडल्यास, कोणतीही वाटून दिलेली सदस्यत्वे, Skype Credit किंवा Skype Numbers पुनर्संचयित करता येणार नाहीत आणि आपली सामग्री किंवा अनलिंक केलेल्या खात्याशी संबंधित साहित्य यापुढे आपल्याला प्रवेशक्षम असणार नाही. आपल्या जोडलेल्या खात्याच्या वापरकर्त्यांच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीवर सर्व लागू डेटा संरक्षण कायद्यांनुसार प्रक्रिया करण्यास आपण सहमत होता.
  • ix. Skype शुल्क. Skype देय उत्पादनांच्या सर्व किंमती लागू करांच्या समावेशासह आहेत, जर इतर प्रकारे म्हटले नसेल तर. सदस्यत्वाच्या बाहेरील फोनना कॉल करण्यासाठी देय शुल्कांमध्ये जोडणी फी (प्रति कॉल एकदा आकारली जाते) आणि www.skype.com/go/allrates मध्ये सेट केल्याप्रमाणे प्रति मिनिट दर यांचा समावेश असतो. कॉल शुल्क आपल्या Skype Credit शिलकीमधून वजा केले जाईल. Skype www.skype.com/go/allratesयेथे बदल पोस्ट करुन आपल्याला सूचना दिल्याशिवाय कोणत्याही क्षणी त्यांचे कॉलिंग दर बदलू शकतात. नवीन दरांच्या प्रकाशनानंतरच्या आपल्या पुढील कॉलला नवीन दर लागू होतील. कृपया आपण कॉल करण्यापूर्वी नवीनतम दर तपासा. अपूर्णांक कॉल मिनिटे आणि अपूर्णांक शुल्क पुढील पूर्ण एककास पूर्णांकित केले जातील. काही देशांमध्ये Skype देय उत्पादने Skype च्या स्थानिक भागीदाराद्वारे पुरविलेली आहेत आणि अशा व्यवहारांना त्या भागीदाराच्या अटी लागू होतील.
  • x. Skype Credit. आपण सर्व Skype देय उत्पादने खरेदी करण्यासाठी आपली Skype Credit शिल्लक वापरु शकाल याची Skype हमी देत नाही. जर आपण आपले Skype Credit 180 दिवसांच्या कालावधीसाठी वापरले नाही, तर Skype आपले Skype Credit निष्क्रिय स्थितीमध्ये टाकेल. आपण https://www.skype.com/go/store.reactivate.credit येथील पुनर्सक्रियता लिंकचे अनुसरण करुन Skype Credit पुनर्सक्रिय करु शकता. आपण जपानमध्ये स्थित असाल आणि आपण Skype वेबसाईटवरून Skype Credit खरेदी केले असेल, मागील दोन वाक्ये आपल्याला लागू होत नाही आणि आपले Skype Credit आपल्या खरेदीच्या तारखेपासून 180 दिवसांमध्ये निष्क्रिय होईल. एकदा आपले क्रेडिट निष्क्रिय झाल्यास, आपण ते यापुढे पुनर्सक्रिय करू किंवा वापरू शकत नाही. आपण जेव्हा Skype Credit खरेदी करता तेव्हा योग्य चौकटीमध्ये खूण करुन आपण स्वयं-रीचार्ज सक्षम करु शकता. जर सक्षम केलेले असेल, तर जेव्हा प्रत्येक वेळी आपल्या Skype खात्याची शिल्लक वेळोवेळी Skype द्वारा सेट केलेल्या अधःसीमेच्या खाली जाते तेव्हा आपली Skype Credit शिल्लक समान रकमेने आणि आपल्या पसंतीच्या अदागी पद्धतीने रीचार्ज केली जाते. जर आपण क्रेडिट कार्ड, PayPal किंवा Moneybookers (Skrill) यांच्याव्यतिरिक्त इतर अदागी पद्धतीने सदस्यत्व खरेदी केले असेल आणि आपण स्वयं-रीचार्ज सक्षम केलेला असेल तर आपली Skype Credit शिल्लक आपले पुढील आवर्ती सदस्यत्व खरेदी करण्यास आवश्यक रकमेने रीचार्ज केले जाईल. आपण आपल्या Skype खात्याच्या पोर्टलमध्ये आपल्या सेटिंग्जकडे प्रवेश करुन आणि त्या बदलून कोणत्याही वेळी स्वयं-रीचार्ज अक्षम करु शकता.
  • xi. आंतरराष्ट्रीय संदेश शुल्क. GroupMe सध्या तयार केलेल्या प्रत्येक समूहासाठी US-आधारित क्रमांक वापरते. GroupMe क्रमांकाला पाठवलेला किंवा त्यापासून प्राप्त झालेला प्रत्येक मजकूर संदेश संयुक्त संस्थाने येथे पाठवलेला किंवा त्यांपासून प्राप्त झालेला आंतरराष्ट्रीय मजकूर संदेश म्हणून गणला जाईल. कृपया संबंधित आंतरराष्ट्रीय दरांसाठी आपल्या प्रदात्यासोबत तपासा.
  • xii. पैसे पाठवणे आणि मिळवणे. पाठवणे आणि मिळवणे वैशिष्ट्य वापरून (उपलब्ध असल्यास), आपण याची पोच देता की Skype अदागी सेवा आणि हस्तांतरणे प्रभाव पुरवण्यासाठी तृतीय पक्षाचा वापर करते. Skype अदागी सेवा किंवा हस्तांतरणे प्रभाव पुरवत नाही आणि पैसा सेवा व्यवसाय नाही. Skype वर पैसे पाठवणे आणि मिळवणे केवळ 18 वर्ष आणि त्या अधिक वयाच्या वापरकर्त्यासाठी उपलब्ध असू शकेल ( किंवा तृतीय पक्षाच्या अटींनुसार अन्यथा) आणि ज्यांनी नोंदणी केली आहे आणि तृतीय पक्ष प्रदात्याबरोबर खात्यासाठी मान्यता मिळवली आहे. पैसे पाठवायचे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, आपल्याला तृतीय पक्षाच्या अटी आणि शर्तींला साइन अप करण्याची आवश्यकता असू शकेल आणि सेवा पुरवण्याच्या हेतूसाठी ह्या तृतीय पक्षां बरोबर डेटा शेअर करण्याची परवानगी पुरवण्याची आवश्यकता असू शकेल. जर Skype ला सूचना मिळाली की आपले पैसे पाठवायचे वैशिष्ट्य तृतीय पक्षाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन करते, Skype ला आपल्या खात्या विरोधात कारवाई करावी लागेल, जसे की खाते रद्द करणे किंवा निलंबित करणे. Skype किंवा Microsoft, तृतीय पक्षाने पुरवलेल्या अदागी सेवांसाठी किंवा तृतीय पक्षाच्या अटी आणि शर्तीनुसार घेतलेल्या कोणत्याही कारवाईसाठी जबाबदार राहणार नाहीत. पैसे पाठवणे आणि मिळवणे वैशिष्ट्य उपलब्ध असणार किंवा उपलब्धतेसाठी चालू राहणार ह्याची Skype कोणतीही हमी, प्रतिनिधित्वे किंवा वॉरंटी देत नाही.
पूर्ण मजकूर
Bing आणि MSNBing आणि MSN14f_BingandMSN
सारांश
 • f. Bing आणि MSN.
  • i. Bing आणि MSN साहित्य. Bing आणि MSN वर उपलब्ध असलेले, Microsoft बॉट्स, अनुप्रयोग आणि प्रोग्राममधून मिळवलेल्यांसह, लेख, मजकूर, फोटो, नकाशे, व्हिडियो, व्हिडियो प्लेयर आणि तृतीय-पक्ष साहित्य केवळ आपल्या अव्यावसायिक, वैयक्तिक वापरासाठी आहे. या साहित्याच्या इतर वापरास, डाउनलोड करणे, प्रती करणे किंवा पुनर्वितरण करणे किंवा आपले स्वतःचे उत्पादन बनवण्यासाठी ह्या साहित्याच्या किंवा उत्पादनाचा वापर करणे यांच्या समावेशासह, केवळ Microsoft किंवा अधिकारधारकांद्वारे विशेषत्वाने प्राधिकृत केलेल्या किंवा लागू कॉपीराईट कायद्याने दिलेल्या परवानगीच्या मर्यादेपर्यंतच परवानगी आहे. परवाना अटींखाली Microsoft द्वारे अभिप्रेरणेने, प्रतिबंधक कबुलीने किंवा इतर प्रकारे स्पष्टपणे न दिलेले साहित्याचे सर्व अधिकार Microsoft आणि इतर अधिकारधारक आरक्षित ठेवतात.
  • ii. Bing Maps. आमच्या वेगळ्या लेखी संमतीशिवाय सरकारी वापरासाठी संयुक्त संस्थाने, कॅनडा, मेक्सिको, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया किंवा जपान यांची विहंगप्रतिमा आपण वापरु शकणार नाही.
  • iii. Bing Places आणि Bing Manufacturer Center. आपण आपला डेटा किंवा आपली सामग्री Bing Places किंवा Bing Manufacturer Center ला पुरवता तेव्हा आपण Microsoft ला सेवेचा भाग म्हणून ते वापरण्याचा, पुनरुत्पादित, जतन, फेरबदल, एकीकृत, प्रचारित, प्रक्षेपित, प्रदर्शित किंवा वितरित करण्याचा आणि तृतीय पक्षांना त्या अधिकारांचा उप-परवाना देण्याचा जागतिक आणि रॉयल्टी-मुक्त बौद्धिक मालमत्ता परवाना देता.
पूर्ण मजकूर
CortanaCortana14g_Cortana
सारांश
 • g. Cortana.
  • i. वैयक्तिक अव्यावसायिक वापर. Cortana ही Microsoft ची वैयक्तिक सहाय्यक सेवा आहे. Cortana द्वारे पुरवलेले वैशिष्ट्ये, सेवा, सामग्री आणि तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा (सामुहिकपणे "Cortana सेवा") केवळ आपल्या वैयक्तिक आणि अव्यावसायिक वापरासाठी आहेत.
  • ii. कार्यक्षमता आणि सामग्री. Cortana वैशिष्ट्याची श्रेणी पुरवते, ज्यातील काही वैयक्तीकृत आहेत. Cortana सेवा इतर Microsoft सेवांनी पुरवलेल्या सेवा, माहिती किंवा कार्यक्षमतेमध्ये तृतीय पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांमध्ये आपल्याला प्रवेश करू देऊ शकतात. Cortana सेवांमधून प्रवेश केलेल्या लागू Microsoft सेवांच्या आपल्या वापराला विभाग 13 च्या सेवा-विनिर्दिष्ट अटीदेखील लागू होतात. Cortana केवळ आपल्या नियोजन हेतूंस्तवच माहिती पुरविते आणि या माहितीचे पुनरावलोकन करताना आणि तिच्यावर विसंबताना आपण आपली स्वतंत्र न्यायबुद्धी वापरावी. Cortana ने पुरवलेल्या वैयक्तिक अनुभवांची विश्वसनीयता, उपलब्धता किंवा वक्तशीरपणा यांची Microsoft हमी देत नाही. Cortana संवाद व्यवस्थापन वैशिष्ट्यामुळे आपल्याला संवाद किंवा अधिसूचना मिळवण्यास, पुनरावलोकन करण्यास किंवा पाठवण्यास विलंब किंवा प्रतिबंध झाल्यास Microsoft जबाबदार नाही.
  • iii. तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवा. Cortana सेवांच्या डिलिव्हरीचा भाग म्हणून, आपली विनंती पूर्ण करण्यासाठी Cortana तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांबरोबर माहिती अदलाबदल करू शकतात, जसेकी आपले पिनकोड आणि क्वेरी आणि तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांचे परत प्रतिसाद. खाते लिंकिंग द्वारे, वापरकर्त्यांनी त्या तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांबरोबर थेट स्थापित केलेले खात्याची प्राधान्ये आणि सेटिंग्जचा वापर करून Cortana वापरकर्त्यांनी तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांद्वारे खरेदी करण्यासाठी सक्षम करू शकेल. वापरकर्ते कोणत्याही क्षणी खाते लिंकिंग डिस्कनेक्ट करू शकतात. आपल्या तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांचा वापर या अटींनी व्यापलेल्या कलम 5 खाली संरक्षित आहे. तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांचे प्रकाशक त्यांच्या तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि सेवांची कार्यक्षमता किंवा वैशिष्ट्ये किंवा Cortana सेवांसोबतचे एकत्रीकरण बदलू शकतात किंवा थांबवू शकतात. उत्पादकाने पुरवलेल्या सॉफ्टवेअरसाठी किंवा फर्मवेअरसाठी Microsoft जबाबदार किंवा उत्तरदायी नाही.
  • iv. Cortana-सक्षम साधने. Cortana-सक्षम साधने ही Cortana सेवांशी अनुरूप असलेल्या Cortana सेवा किंवा उत्पादने किंवा साधने यांकडे प्रवेश करणे सक्षम केलेली उत्पादने किंवा साधने आहेत. Cortana-सक्षम साधनांमध्ये तृतीय-पक्ष साधने किंवा उत्पादने समाविष्ट आहेत, जी Microsoft च्या मालकीची, उत्पादन केलेली, किंवा विकसित केलेली नसतील. Microsoft ह्या तृतीय-पक्ष साधनंसाठी किंवा उत्पादनांसाठी जबाबदार किंवा कायद्याने बांधलेले नाही.
  • v. सॉफ्टवेअर अद्यतने. Cortana सेवांशी जोडणार्‍या कोणत्याही साधनांसाठी, Cortana सेवा सॉफ्टवेअर अद्यावत ठेवण्यासाठी, आम्ही स्वयंचलितपणे Cortana सेवांच्या सॉफ्टवेअरची आपली आवृत्ती आणि सॉफ्टवेअर अद्यतन डाउनलोड किंवा कॉन्फिगरेशन बदल किंवा Cortana सक्षम साधनांचे कोणत्याही उत्पादकांची गरज तपासू शकतो.
पूर्ण मजकूर
Outlook.comOutlook.com14h_Outlook_com
सारांश
 • h. Outlook.com. Outlook.com (किंवा @msn, @hotmail, or @live) ईमेल पत्ता जो आपण आपले Microsoft खाते तयार करण्यासाठी वापरता तो जोपर्यंत आपला Outlook.com इनबॉक्स किंवा Microsoft सक्रिय आहे तोपर्यंत आपल्यास अनन्य असेल. आपला Outlook.com इनबॉक्स किंवा Microsoft खाते आपल्याद्वारे किंवा या अटींच्या अनुरोधाने Microsoft द्वारे बंद केल्या जाण्याच्या प्रसंगात, ईमेल पत्ता किंवा वापरकर्तानाव आमच्या प्रणालीमध्ये पुनर्चक्रित केले जाऊ शकेल आणि दुसर्‍या वापरकर्त्यास नियुक्त केले जाऊ शकेल.
पूर्ण मजकूर
Office सेवाOffice सेवा14i_officeBasedServices
सारांश
 • i. Office सेवा. आपल्याकडे Microsoft सोबतच्या वेगळ्या करारांतर्गत व्यावसायिक वापर अधिकार नसल्यास, Office 365 Home, Office 365 Personal, Office 365 University, Office Online, Sway, OneNote.com आणि इतर कोणतेही Office 365 सदस्यत्व किंवा Office ब्रँडच्या सेवा आपल्या वैयक्तिक, अव्यावसायिक वापरासाठी आहेत.
पूर्ण मजकूर
Microsoft आरोग्य सेवाMicrosoft आरोग्य सेवा14j_MicrosoftHealthServices
सारांश
 • j. Microsoft आरोग्य सेवा.
  • i. HealthVault. HealthVault चा हेतू आपण आपली वैयक्तिक आरोग्य-संबंधित माहिती आणि इतर व्यक्तींविषयीची (जसे की आपले कुटुंब) माहिती त्यांच्या संमतीने संचियत करावी हा आहे. HealthVault खाती आरोग्यनिगा प्रदात्यांद्वारे वापरासाठी किंवा कोणत्याही इतर व्यावसायिक किंवा बिगरवैयक्तिक हेतूसाठी नाहीत. आपल्या खात्यातील माहिती नेहमीच अचूक किंवा अद्ययावत नसू शकेल आणि ती कोणत्याही आरोग्यनिगा प्रदात्याद्वारे केवळ माहितीत्मक म्हणूनच पाहिली जावी. HealthVault सेवा आरोग्यनिगा प्रदात्यांसाठी किंवा इतर वैद्यकिय किंवा प्रकरण व्यवस्थापन हेतूंसाठी नोंदी ठेवत नाही. उदाहरणार्थ, HealthVault नोंदी U.S. नियमनांतर्गत व्याख्यित केल्यानुसार नियुक्त नोंद संच नाहीत. जर आरोग्यनिगा प्रदाता HealthVault कडून उपलब्ध केला गेलेला कोणताही डेटा त्यांच्या नोंदींमध्ये समाविष्ट करण्याचे ठरवितो तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रणालीमध्ये प्रत जतन करावी. जर आपल्या खात्यामध्ये नोंदीचा सहताबेदार असेल (कारण आपल्यापैकी एकाने दुसर्‍याला आमंत्रित केले म्हणून) तर आपण याची पोच देता की त्या नोंदीवर सहताबेदाराचे पूर्ण नियंत्रण असते आणि तो त्या नोंदीकडील आपला प्रवेश रद्द करु शकतो, इतर व्यक्तींचा प्रवेश व्यवस्थापित करु शकतो आणि ती नोंद कधी आणि कशी वापरली गेली याच्या समावेशासह नोंदीचा डेटा पाहू शकतो. बिगर-Microsoft अधिकारपत्रांना (जसे की Facebook आणि OpenID) Microsoft समर्थन देत नाही, म्हणून HealthVault ग्राहक पाठबळ त्यांच्या साइन-इन समस्यांमध्ये मदत करण्यात समर्थ नसेल. जर आपण आपली साइन-इन अधिकारपत्रे गमावली किंवा आपण जेथे आपली अधिकारपत्रे मिळविली ते खाते बंद झाले तर आपण आपल्या संचयित डेटाची पुनर्प्राप्ती करण्यास सक्षम नसाल. प्रवेश चालू राखण्यात मदत करण्यासाठी आपण आपल्या HealthVault खात्यासोबत एकापेक्षा अधिक साइन-इन अधिकारपत्रे वापरावित असे आम्ही सुचवितो. Microsoft आपण वापरु शकणार्‍या बिगर-Microsoft अधिकारपत्रांचा पुरस्कार किंवा नियंत्रण करीत नाही आणि त्यांचे संचालन, समर्थन किंवा सुरक्षा यांसाठी जबाबदार नाही.
  • ii. Microsoft Band. Microsoft Band साधन आणि अनुप्रयोग ही वैद्यकीय साधने नाहीत आणि ती केवळ तंदुरुस्ती आणि निरोगीपणा या हेतूंसाठी उद्देशित आहेत. त्यांची रचना किंवा उद्देश रोग किंवा इतर आजाराच्या निदानासाठी वापर करणे किंवा रोगमुक्तता, उपशमन, उपचार किंवा रोगाचा प्रतिबंध यांसाठी नाही. Microsoft Band कडून आपल्याला मिळालेल्या माहितीवर आधारित आपण घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला Microsoft जबाबदार नाही.
पूर्ण मजकूर
डिजिटल मालडिजिटल माल14k_DigitalGoods
सारांश
 • k. डिजिटल माल. Microsoft Groove, Microsoft Movies & TV, दुकान आणि इतर संबंधित आणि भविष्यातील सेवांद्वारे Microsoft संगीत, प्रतिमा, व्हिडियो, मजकूर पुस्तके, खेळ किंवा इतर साहित्य ("डिजिटल माल") जे आपल्याला डिजिटल रूपामध्ये मिळू शकेल ते मिळविण्यास, ऐकण्यास, पाहण्यास आणि/किंवा वाचण्यास (जसे प्रकरण असेल तसे) सक्षम करू शकेल. डिजिटल मालाचा वापर केवळ आपल्या वैयक्तिक, अव्यावसायिक मनोरंजनात्मक वापरासाठी आहे. डिजिटल मालाच्या कोणत्याही प्रती पुनर्वितरित, प्रक्षेपित, सार्वजनिकपणे सादर किंवा सार्वजनिकपणे प्रदर्शित किंवा स्थानांतरित न करण्यास आपण सहमत होता. डिजिटल माल Microsoft किंवा तृतीय पक्षांच्या मालकीचा असू शकतो. सर्व परिस्थितींमध्ये आपण हे समजता आणि याची पोच देता की डिजिटल मालाशी संबंधित आपले अधिकार या अटी, स्वामित्वहक्क कायदा आणि https://go.microsoft.com/fwlink/p/?LinkId=723143 येथे स्थित वापर नियम यांच्याद्वारे मर्यादित आहेत. आपण याच्याशी सहमत होता की आपण कोणत्याही सेवेतून मिळविलेल्या कोणत्याही डिजिटल मालामध्ये कोणत्याही कारणास्तव फेरबदल करणार नाही, डिजिटल मालाची मालकी किंवा स्रोत लपविण्याच्या किंवा बदलण्याच्या हेतूच्या समावेशासह. Microsoft आणि/किंवा डिजिटल मालाचे मालक वेळोवेळी नोटिशीशिवाय सेवेतून डिजिटल माल काढून टाकू शकतील.
पूर्ण मजकूर
OneDriveOneDrive14l_OneDrive
सारांश
 • l. OneDrive.
  • i. संचय वाटप. आपल्या OneDrive साठी मोफत किंवा देय सदस्यत्व सेवेच्या अटींअंतर्गत आपल्या OneDrive खात्यात आपल्याला पुरविलेल्या सामग्रीपेक्षा अधिक सामग्री संचयित असल्यास आणि आपण अतिरिक्त साग्री काढून टाकून किंवा अधिक संचय असलेल्या नवीन सदस्यत्व योजनेवर हलवून आपले खाते दुरुस्त करण्याच्या Microsoft कडून प्राप्त सूचनेला प्रतिसाद न दिल्यास आम्ही आपले खाते बंद करण्याचा आणि हटविण्याचा किंवा OneDrive वरील सामग्रीकडे प्रवेश अक्षम करण्याचा अधिकार राखून ठेवतो.
  • ii. सेवा कामगिरी. आपली साधनसामग्री, इंटरनेट जोडणी आणि Microsoft चे त्यांच्या सेवेची कामगिरी आणि अखंडत्व राखण्याचे प्रयत्न अशा घटकांवर अवलंबून, आपण कधीकधी OneDrive वरील सामग्री अपलोड किंवा समक्रमित करण्यात विलंब अनुभवू शकता.
पूर्ण मजकूर
Microsoft बक्षिसेMicrosoft बक्षिसे14m_MicrosoftRewards
सारांश
 • m. Microsoft Rewards.
  • i. कार्यक्रम. Microsoft बक्षिसे ("कार्यक्रम") आपल्याला शोध, अधिग्रहणे, Microsoft Edge सोबत सक्रियपणे घालवलेला वेळ आणि Microsoft कडील इतर ऑफर्स यांसारख्या क्रियाकलापांसाठी रिडीम करता येणारे पॉइंट मिळवण्यास सक्षम करतो. बाजारानुसार ऑफर्स वेगळ्या असू शकतात. शोध म्हणजे एखाद्या वैयक्तिक वापरकर्त्याने व्यक्तिचलितपणे मजकूर प्रविष्ट करून अशा वापरकर्त्याच्या स्वतःच्या संशोधन उद्देशांसाठी Bing शोध परिणाम मिळवण्याच्या सद्भावनायुक्त उद्देशाने केलेली आणि ज्यामध्ये बॉट, मॅक्रो किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या स्वयंचलित किंवा फसव्या मार्गांनी प्रविष्ट केलेल्या क्वेरीचा समावेश नाही अशी कृती ("शोध"). अधिग्रहण म्हणजे माल खरेदी करण्याची प्रक्रिया किंवा Microsoft कडील डिजिटल सामग्रीसाठी, मोफत किंवा सशुल्क, परवाना डाउनलोड करणे आणि संपादन करणे ("अधिग्रहण"). Microsoft कडून केलेल्या प्रत्येक खरेदीसाठी बक्षीस पॉइंट दिले जात नाहीत. Microsoft Edge सोबत सक्रियपणे ब्राउझ करणे म्हणजे आपल्या साधनाच्या स्क्रीनवर ब्राउझर दृष्टीपथात ठेवणे (उदा., उघडा असणे आणि Microsoft Edge चे चिन्ह टास्क बारमध्ये हायलाइट केलेले असणे, जे अ‍ॅप सध्या वापरात आहे असे निर्देशित करते, अशा प्रकारे वापरला जाणे) आणि वेबसाइट पाहण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी, ईमेल तपासण्यासाठी किंवा ज्यासाठी ब्राउझर वापरला जातो अशा इतर कामांसाठी ब्राउझरचा वापर करणे. Microsoft Edge वापरून पॉइंट मिळवण्यासाठी, ब्राउझरचे डिफॉल्ट शोध इंजिन म्हणून Bing सेट करणे आणि आपल्या सेटिंग्जमध्ये टेलिमेट्री सक्षम करणे आवश्यक आहे. Microsoft वेळोवेळी पॉइंट मिळवण्याच्या अतिरिक्त संधी देऊ शकते आणि पॉइंट मिळवून देणारी प्रत्येक ऑफर कायमस्वरूपी उपलब्ध नसेल. आपण मिळवलेले पॉइंट रिडीम पृष्ठामध्ये वस्तूंसाठी ("Rewards") रिडीम केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी support.microsoft.com येथे बक्षिसे विभाग पहा ("वारंवार विचारले जाणारे प्रश्न").
   • 1. कार्यक्रमाच्या आवश्यकता. आपल्याकडे वैध खाते असणे गरजेचे आहे आणि आपल्या साधनाने किमान प्रणाली आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न मध्ये सूचीबद्ध केलेल्या बाजारांच्या क्षेत्रांत निवास करणार्‍या वापरकर्त्यांसाठी कार्यक्रम खुला आहे. एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक ईमेल पत्ते असले तरीही व्यक्तींकडे एकापेक्षा अधिक कार्यक्रम खाती असू शकत नाहीत आणि कुटुंबांना सहा खात्यांची मर्यादा आहे. हा कार्यक्रम केवळ आपल्या वैयक्तिक आणि अव्यावसायिक वापरासाठी आहे.
   • 2. पॉइंट. आपले पॉइंट रिडेम्प्शन केंद्रात सूचीबद्ध केलेल्या एखाद्या ना-नफा संस्थेला देणगी म्हणून देणे वगळता, आपण पॉइंट हस्तांतरित करू शकत नाही. पॉइंट आपली वैयक्तिक मालमत्ता नाही आणि आपण त्यांच्या मोबदल्यात कोणतीही रोख रक्कम किंवा पैसे मिळवू शकत नाही. पॉइंट आपल्याला प्रचारात्मक तत्त्वावर बक्षीस दिले जातात. आपण पॉइंट खरेदी करू शकत नाही. Microsoft पॉइंटची किंवा बक्षिसांची संख्या प्रति व्यक्ती, प्रति कुटुंब किंवा निश्चित कालावधीसाठी (उदा., एक दिवस) मर्यादित करू शकते. आपण कार्यक्रमामध्ये प्रति कॅलेंडर वर्षात 550,000 पेक्षा अधिक पॉइंट रिडीम करू शकत नाही. कार्यक्रमामध्ये मिळवलेले पॉइंट Microsoft किंवा तृतीय पक्षांनी देऊ केलेल्या इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये वैध नाहीत आणि ते त्यांच्यासोबत एकत्रित करून वापरले जाऊ शकत नाहीत. आपण 18 महिन्यांत कोणतेही पॉइंट न मिळवल्यास किंवा रिडीम न केल्यास रिडीम न केलेल्या पॉइंटची मुदत संपते.
   • 3. बक्षिसे. आपण आपले पॉइंट रिडेम्प्शन केंद्रास भेट देऊन रिडीम करू शकता किंवा सूचीबद्ध केलेल्या ना-नफा संस्थेला देणगी म्हणून पॉइंट देऊ शकता. विशिष्ट उपलब्ध बक्षिसांची संख्या मर्यादित असू शकते आणि ती बक्षिसे प्रथम आगमन, प्रथम संधी या तत्त्वावर वितरित केली जातील. आपल्याला आपला पोस्टाचा पत्ता आणि टेलिफोन क्रमांक (VOIP किंवा टोल-फ्री क्रमांक वगळता) यांसारखी अतिरिक्त माहिती पुरवावी लागू शकते आणि पॉइंट किंवा बक्षिसे रिडीम करण्यासाठी आपल्याला फसवणूक प्रतिबंध कोड प्रविष्ट करण्यास किंवा अतिरिक्त कायदेशीर दस्तावेजांवर स्वाक्षरी करण्यासदेखील सांगितले जाऊ शकते. आपण एकदा बक्षिसाची ऑर्डर दिल्यावर, उत्पादने सदोष नसल्यास किंवा लागू कायद्यानुसार आवश्यक नसल्यास आपण ती रद्द करू शकत नाही किंवा पॉइंटच्या परताव्यासाठी परत करू शकत नाही. आपण साठा संपलेल्या किंवा Microsoft ने स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार निर्धारित केल्यानुसार इतर कारणांमुळे अनुपलब्ध असलेल्या बक्षिसाची ऑर्डर दिल्यास, आम्ही त्याऐवजी तुलनीय मूल्याचे बक्षिस देऊ किंवा आपले पॉइंट परत करू. रिडेम्प्शन केंद्रात देऊ केलेली बक्षिसे Microsoft अद्यतनित करू शकते किंवा विशिष्ट बक्षिसे देऊ करणे थांबवू शकते. काही बक्षिसांसाठी वय पात्रतेच्या आवश्यकता असू शकतात. अशा कोणत्याही आवश्यकता संबंधित ऑफरमध्ये समाविष्ट केल्या जातील. आपण सर्व फेडरल, राज्य आणि स्थानिक करांसाठी आणि बक्षीस स्वीकारण्यासाठी आणि वापरण्यासाठी लागणार्‍या इतर खर्चासाठी जबाबदार आहात. आपण आपले बक्षीस ऑर्डर करताना पुरवलेल्या ईमेल पत्त्यावर ईमेलने बक्षिसे पाठवली जातील, म्हणून आपला ईमेल पत्ता अद्ययावत ठेवा. वितरित करता न येण्यासारखी बक्षिसे पुन्हा जारी केली जाणार नाहीत आणि म्हणून ती गमावली जातात. बक्षिसे पुनर्विक्रीसाठी नाहीत.
   • 4. कार्यक्रमामधील आपला सहभाग रद्द करणे. आपण 18 महिन्यांच्या कालावधीत किमान एकदा लॉग इन न केल्यास आपले कार्यक्रम खाते रद्द केले जाईल. त्यासोबतच, विशिष्ट वापरकर्ता कार्यक्रमाशी छेडछाड करत असल्यास, त्याचा गैरवापर करत असल्यास किंवा त्याच्याशी फसवणूक करत असल्यास किंवा या अटींचे उल्लंघन करत असल्यास कार्यक्रम खाते रद्द करण्याचा अधिकार Microsoft राखून ठेवते. कार्यक्रम रद्द केला गेल्यावर (आपल्याकडून किंवा आमच्याकडून) किंवा कार्यक्रम निलंबित केला गेल्यास, आपल्याकडे आपले पॉइंट रिडीम करण्यासाठी 90 दिवस असतील; अन्यथा, ते पॉइंट गमावले जातील. रद्द करण्याच्या टप्प्यावर, आपला कार्यक्रम वापरण्याचा आणि भविष्यात पॉइंट गोळा करण्याचा अधिकार समाप्त होतो.
   • 5. इतर शर्ती. आपण कार्यक्रमाच्या कोणत्याही पैलूशी छेडछाड करत आहात किंवा त्याचा गैरवापर करत आहात किंवा या अटींचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही क्रियाकलापात सामील आहात असे Microsoft ला वाटल्यास, Microsoft आपल्याला अपात्र ठरवण्याचा; आपला कार्यक्रमाकडील किंवा आपल्या बक्षीस खात्याकडील प्रवेश अक्षम करण्याचा; आणि/किंवा पॉइंट, बक्षिसे आणि धर्मादाय देणग्या रोखण्याचा अधिकार राखून ठेवते.
पूर्ण मजकूर
संकीर्णसंकीर्ण16_17_18_miscellaneous
सारांश

14. संकीर्ण. हा विभाग आणि विभाग 1, 9 (या अटींच्या समाप्तीपूर्वी लागलेल्या रकमेसाठी), 10, 11, 12, 15, 17 आणि या अटी समाप्त झाल्यानंतर आपल्या अटींनी लागू होणारे विभाग या अटींच्या कोणत्याही समाप्तीनंतर किंवा त्या रद्द झाल्यानंतरही कायम राहतील. लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, आम्ही कोणत्याही वेळी आपल्याला सूचना दिल्याशिवाय संपूर्णपणे किंवा अंशतः, या अटींची नियुक्ती करू शकतो, या अटींतर्गत आमच्या कर्तव्यांची उपकंत्राटे देऊ शकतो किंवा या अटींतर्गत आमच्या अधिकारांचे उपपरवाने देऊ शकतो. आपण या अटींची नियुक्ती करु शकत नाही किंवा या सेवा वापरण्याचे कोणतेही अधिकार हस्तांतरित करु शकत नाही. या सेवांच्या आपल्या वापरासाठी आपण आणि Microsoft मधील हा संपूर्ण करार आहे. या सेवांच्या आपल्या वापराविषयीच्या आपण आणि Microsoft मधील कोणत्याही पूर्व करारांची जागा हा करार घेतो. या अटींमध्ये प्रवेश करताना आपण या अटींमध्ये स्पष्टपणे म्हटल्याव्यतिरिक्त इतर कोणतेही विधान, प्रतिनिधीत्व, वॉरंटी, सामंजस्य, उपक्रम, वचन किंवा खात्री यांच्यावर विसंबून राहिलेले नाहीत. या अटींचे सर्व भाग संबंधित कायद्याने परवानगी दिलेल्या महत्तम मर्यादेपर्यंत लागू होतात. जर न्यायालय किंवा लवादाने आम्ही या अटींमध्ये लिहिल्याप्रमाणे एखाद्या भागाची अंमलबजावणी करु शकत नाही असे म्हटल्यास आम्ही त्या अटींच्या जागी संबंधित कायद्यांतर्गत अंमलबजावणीक्षम मर्यादेपर्यंत त्यांसारख्या अटी बदली करु, परंतु या अटींचा उर्वरीत भाग बदलणार नाही. या अटी केवळ आपल्या आणि आमच्या फायद्यासाठी आहेत. या अटी इतर कोणत्याही व्यक्तीच्या फायद्यासाठी नाहीत, Microsoft चे उत्तराधिकारी आणि कायदेशीर वारस यांचा अपवाद वगळता. विभाग मथळे केवळ संदर्भासाठी आहेत आणि त्यांचा कोणताही कायदेशीर प्रभाव नाही.

15. दावे एक वर्षाच्या आत दाखल करणे अनिवार्य आहे. या अटी किंवा या सेवांशी संबंधित कोणताही दावा न्यायालयामध्ये (किंवा लवादामध्ये, जर विभाग 10(d) लागू होत असेल तर) आपण पहिल्यांदा दावा दाखल करु शकणार्‍या दिनांकापासून एक वर्षाच्या आत दाखल करणे अनिवार्य आहे, जर आपल्या स्थानिक कायद्यास दावे दाखल करण्यास अधिक वेळेची आवश्यकता नसेल तर. जर तो त्या वेळेमध्ये दाखल केला गेला नाही तर त्यास कायमस्वरुपी मज्जाव केला जाईल.

16. निर्यात कायदे. सॉफ्टवेअर आणि/किंवा सेवांना लागू होणार्‍या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय निर्यात कायदे आणि नियमने, ज्यामध्ये गंतव्यस्थाने, अंतिम वापरकर्ते आणि अंतिम वापर यांवरील निर्बंधांचा समावेश आहे, यांचे पालन करणे अनिवार्य आहे. भौगोलिक आणि निर्यात निर्बंधाविषयी अधिक माहितीसाठी https://go.microsoft.com/fwlink/?linkid=868968 आणि https://www.microsoft.com/exporting ला भेट द्या.

17. अधिकारांचे आरक्षण आणि अभिप्राय. स्पष्टपणे प्रदान केल्याशिवाय ह्या अटींनुसार, Microsoft आपल्याला परवाना देत नाही किंवा पेटंट, कृती- ज्ञान, कॉपीराइट, व्यापार-गुपिते, ट्रेडमार्क किंवा मालकीची इतर बौद्धिक मालमत्ता किंवा Microsoft नी नियंत्रित केलेले किंवा कोणताही संबंधित समूहसह, कोणत्याही नावाला, व्यापारड्रेसला, लोगोला किंवा समकक्षाला मर्यादित नसलेल्या अंतर्गत इतर कोणत्याही प्रकाराचे अधिकार देत नाही. आपण Microsoft ला नवीन उत्पादने, तंत्रज्ञाने, प्रचार, उत्पादनांची नावे, उत्पादन अभिप्राय आणि उत्पादन सुधारणा यांसाठी, कोणत्याही मर्यादेशिवाय कल्पनांसह, कोणतीही कल्पना, प्रस्ताव, सूचना किंवा अभिप्राय (""अभिप्राय"") दिल्यास, आपण Microsoft ला, आपल्याला शुल्क, रॉयल्टी किंवा इतर कोणत्याही दायित्वाशिवाय, व्युत्पन्न कार्ये तयार करण्याचा, तयार केलेले असण्याचा, निर्माण करण्याचा, आपला अभिप्राय कोणत्याही मार्गाने आणि कोणत्याही उद्देशाने वापरण्याचा, शेअर करण्याचा आणि त्याचे व्यापारीकरण करण्याचा अधिकार देता. आपण अभिप्राय देणार नाही जे परवान्याचा आधीन आहे ज्याला Microsoft ला आपल्या सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान किंवा दस्तावेजीकरणला तृतीय पक्षांना परवाना आवश्यक आहे कारण Microsoft आपला अभिप्राय त्यांच्यात सामील करतो.

पूर्ण मजकूर
सूचनासूचनाNOTICES
सारांश

बौद्धिक मालमत्ता अतिक्रमणाचे दावे करण्यासाठी सूचना आणि प्रक्रिया. Microsoft तृतीय पक्षांच्या बौद्धिक मालमत्ता अधिकारांचा आदर करते. जर आपण बौद्धिक मालमत्ता अतिक्रमणाची सूचना पाठवू इच्छिता, स्वामित्वहक्काच्या अतिक्रमणाच्या दाव्यांच्या समावेशासह, तर कृपया अतिक्रमणाच्या सूचना सादर करण्याच्या आमच्या प्रक्रिया वापरा. केवळ या प्रक्रियेशी संबंधित असणार्‍या चौकशींना प्रतिसाद मिळणार.

Microsoft स्वामीत्वहक्क अतिक्रमणाच्या सूचनांना प्रतिसाद देण्यासाठी शीर्षक 17, संयुक्त संस्थाने संहिता, विभाग 512 मध्ये आखून दिलेल्या प्रक्रिया वापरते. योग्य परिस्थितींमध्ये, पुनरावृत्ती करणारे अतिक्रमणकर्ते असू शकणार्‍या Microsoft सेवांच्या वापरकर्त्यांची खाती Microsoft अक्षम करु शकेल किंवा संपुष्टातदेखील आणू शकेल.

जाहिरातींमधील बौद्धिक मालमत्ता चिंतांसंबंधी सूचना आणि प्रक्रिया. आमच्या जाहिरात नेटवर्कवरील बौद्धिक मालमत्ता चिंतांसंबंधी कृपया आमच्या बौद्धिक मालमत्ता मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करा.

स्वामीत्वहक्क आणि व्यापारचिन्ह सूचना. या सेवांचे स्वामीत्वहक्क © 2018 Microsoft Corporation आणि/किंवा त्यांचे पुरवठादार, One Microsoft Way, Redmond, WA 98052, U.S.A. यांच्याकडे आहेत. सर्व अधिकार आरक्षित. Microsoft आणि सर्व Microsoft उत्पादने, सॉफ्टवेअर आणि सेवा यांची नावे, लोगो आणि प्रतीके हे संयुक्त संस्थानांमधील आणि/किंवा इतर देशांमधील Microsoft ची व्यापारचिन्हे किंवा नोंदणीकृत व्यापारचिन्हे असू शकतील. प्रत्यक्ष कंपन्या आणि उत्पादने यांची नावे त्यांच्या संबंधित मालकांची व्यापारचिन्हे असू शकतील. या अटींमध्ये स्पष्टपणे न दिलेले कोणतेही अधिकार आरक्षित आहेत. काही Microsoft वेबसाईट सर्व्हरमध्ये वापरलेले काही सॉफ्टवेअर स्वतंत्र JPEG समूहाच्या कामावर आधारीत आहे. स्वामीत्वहक्क © 1991-1996 थॉमस जी. लेन. सर्व अधिकार आरक्षित. काही Microsoft वेबसाईट सर्व्हरमध्ये वापरलेल्या "gnuplot" सॉफ्टवेअरचे स्वामित्वहक्क © 1986‑1993 थॉमस विल्यम्स, कॉलिन केली यांच्याकडे आहेत. सर्व अधिकार आरक्षित.

वैद्यकिय सूचना. Microsoft वैद्यकिय किंवा इतर कोणताही आरोग्यनिगा सल्ला, निदान किंवा उपचार पुरवित नाही. वैद्यकिय स्थिती, आहार, तंदुरुस्ती किंवा तंदुरुस्ती कार्यक्रम यांविषयी आपल्याला असू शकणार्‍या कोणत्याही प्रश्नांसाठी नेहमी आपल्या फिजिशियनचा किंवा इतर पात्र आरोग्यनिगा प्रदात्याचा सल्ला घ्या. या सेवांवर किंवा द्वारे आपण प्रवेश केलेल्या माहितीच्या कारणास्तव कधीही व्यावसायिक वैद्यकिय सल्ल्याची उपेक्षा करु नका किंवा तो घेण्यात विलंब करु नका.

स्टॉक कोट आणि निर्देशांक डेटा (निर्देशांक मूल्यांसह). © 2013 Morningstar, Inc. सर्व अधिकार आरक्षित. यामध्ये दिलेली माहिती: (1) Morningstar आणि/किंवा त्याच्या सामग्री प्रदात्यांच्या खाजगी मालकीची आहे; (2) कॉपी किंअ वितरित केली जाऊ शकणार नाही; आणि (3) अचूक, संपूर्ण किंवा वक्तशीर असल्याची हमी नाही. Morningstar किंवा त्यांचे सामग्री प्रदाता या माहितीच्या कोणत्याही वापरातून निर्माण होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा तोट्यांसाठी जबाबदार नाहीत. भूतकाळातील कामगिरी ही भविष्यकाळातील परिणामांची कोणतीही हमी नाही.

Dow Jones सोबत वेगळा लेखी करार केल्याशिवाय कोणतीही आर्थिक साधने किंवा गुंतवणूक उत्पादने (उदा. डेरिव्हेटिव्ह्ज, स्ट्रक्चर्ड उत्पादने, गुंतवणूक निधी, एक्स्चेंज-ट्रेडेड निधी, गुंतवणूक पोर्टफोलियो, इ., जेथे साधन किंवा गुंतवणूक उत्पादनाची किंमत, परतावा आणि/किंवा कामगिरी कोणतेही निर्देशांक किंवा कोणत्याही निर्देशांकांची प्रॉक्सी यांच्यावर आधारीत आहे, त्यांच्याशी संबंधित आहे किंवा त्यांचा माग ठेवण्याच्या हेतूने आहे) यांचे जारीकरण, निर्मिती, प्रायोजकत्व, व्यापार, विपणन किंवा प्रचार यांच्या संबंधातील कोणतेही Dow Jones निर्देशांकSM, निर्देशांक डेटा किंवा Dow Jones चिन्हे वापरु शकणार नाही.

वित्तीय सूचना. Microsoft संयुक्त संस्थाने फेडरल सिक्युरिटीज कायदा किंवा इतर अधिकारक्षेत्रांचे सिक्युरिटीज कायदे यांच्या अंतर्गत ब्रोकर/डीलर किंवा नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार नाही आणि सिक्युरिटीज किंवा इतर वित्तीय उत्पादने किंवा सेवा यांमध्ये गुंतवणूक करणे, त्या खरेदी करणे किंवा विकणे यांच्याविषयी व्यक्तींना सल्ला देत नाही. या सेवांमध्ये असणारे काहीही हे कोणत्याही सिक्युरिटीची खरेदी किंवा विक्री करण्याची ऑफर किंवा सल्ला नाही. Microsoft किंवा स्टॉक कोट किंवा निर्देशांक डेटाचे त्यांचे परवानादाते कोणत्याही विशिष्ट वित्तीय उत्पादने किंवा सेवांचा पुरस्कार किंवा शिफारस करीत नाहीत. या सेवांमधील कशाचाही व्यावसायिक सल्ला असण्याचा, गुंतवणूक किंवा करसल्ला यांच्या समावेशासह पण मर्यादेशिवाय, हेतू नाही.

H.264/AVC, MPEG-4 दृश्य आणि VC-1 व्हिडियो मानकांविषयी सूचना. सॉफ्टवेअरमध्ये H.264/AVC, MPEG-4 दृश्य आणि/किंवा VC-1 कोडेक तंत्रज्ञान असू शकेल ज्याचा परवाना MPEG LA, L.L.C द्वारे दिलेला असू शकेल. हे तंत्रज्ञान व्हिडियो माहितीच्या डेटा आकुंचनाचे एक स्वरुपण आहे. MPEG LA, L.L.C. ला या सूचनेशी आवश्यकता आहे:

या उत्पादनास H.264/AVC, MPEG-4 दृश्य आणि VC-1 पेटंट पोर्टफोलियो परवान्याखाली (A) मानकांचे पालन करुन व्हिडियो एन्कोड करणे ("व्हिडियो मानके") आणि/किंवा (B) H.264/AVC, MPEG-4 दृश्य आणि VC-1 व्हिडियो डीकोड करणे जो वैयक्तिक आणि अव्यावसायिक क्रियाकलापामध्ये गुंतलेल्या ग्राहकाद्वारे एन्कोड केला होता आणि/किंवा असा व्हिडियो पुरविण्याचा परवाना असलेल्या व्हिडियो प्रदात्याकडून मिळविला होता यांसाठी ग्राहकाच्या वैयक्तिक आणि अव्यावसायिक वापरासाठी परवाना दिलेला आहे. कोणतेही परवाने इतर कोणत्याही उत्पादनास विस्तारित होत नाहीत, असे उत्पादन या सॉफ्टवेअरमध्ये एकाच कलमामध्ये असले तरीही. इतर कोणत्याही वापरासाठी कोणताही परवाना दिलेला नाही किंवा अभिप्रेत केला जाणार नाही. अतिरिक्त माहिती MPEG LA, L.L.C कडून मिळविली जाऊ शकते. MPEG LA वेबसाईट पहा.

केवळ स्पष्टीकरणाच्या हेतूसाठी, ही सूचना या अटींतर्गत पुरविलेल्या सॉफ्टवेअरच्या वापरास सामान्य व्यवसाय वापरासाठी, जे त्या व्यवसायासाठी वैयक्तिक आहेत ज्यामध्ये यांचा समावेश नाही (i) तृतीय पक्षाला सॉफ्टवेअरचे पुनर्वितरण किंवा (ii) तृतीय पक्षाला वितरित करण्यासाठी व्हिडियो मानकांचे पालन करणार्‍या तंत्रज्ञानांसोबत साहित्याची निर्मिती करणे मर्यादा घालत नाही किंवा मनाई करत नाही.

पूर्ण मजकूर
प्रमाणित अनुप्रयोग परवाना अटीप्रमाणित अनुप्रयोग परवाना अटीSTANDARDAPPLICATIONLICENSETERMS
सारांश

प्रमाणित अनुप्रयोग परवाना अटी

MICROSOFT STORE, WINDOWS STORE, आणि XBOX STORE

या अटी आपण आणि अनुप्रयोग प्रकाशकामधील करार आहे. कृपया त्या वाचा. त्या आपण Microsoft Store, Windows Store किंवा Xbox Store (ज्यांपैकी प्रत्येक या परवाना अटींमध्ये "Store" म्हणून निर्देशित केले आहे) वरून डाउन केलेल्या सॉफ्टवेअर अनुप्रयोगांना लागू होतात, ज्यामध्ये, अनुप्रयोग वेगळ्या अटींसोबत येत नसल्यास, अनुप्रयोगासाठी कोणतीही अद्यतने किंवा पुरवण्यांचा समावेश होतो, ज्या बाबतीत त्या अटी लागू होतात.

अनुप्रयोग डाउनलोड करुन किंवा वापरुन किंवा यांपैकी काहीही करण्याचा प्रयत्न करुन आपण या अटी स्वीकारता. जर आपण त्यांना स्वीकारत नसाल तर आपल्याला अनुप्रयोग डाउनलोड करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार नाही आणि आपण असे करु नये.

Store मध्ये ओळखल्या गेल्यानुसार, अनुप्रयोग प्रकाशक म्हणजे आपल्याला अनुप्रयोगाचा परवाना देणारे अस्तित्व.

आपण या परवाना अटींचे पालन केल्यास आपल्याला खालील अधिकार असतील.

 • 1. स्थापना आणि वापर अधिकार; मुदतबाह्यता. आपण Microsoft च्या वापर नियम मध्ये वर्णन केल्याप्रमाणे Windows साधनांवर किंवा Xbox कॉन्सोलवर अनुप्रयोग स्थापित करू आणि वापरू शकता. Microsoft च्या वापर नियम मध्ये कधीही फेरबदल करण्याचा अधिकार Microsoft राखून ठेवते.
 • 2. इंटरनेट-आधारीत सेवा.
  • a. इंटरनेट-आधारीत किंवा बिनतारी सेवांसाठी संमती. जर अनुप्रयोग संगणक प्रणालींना इंटरनेटवरुन जोडत असेल, ज्यामध्ये बिनतारी नेटवर्क मार्गाचा समावेश असू शकेल, तर अनुप्रयोग वापरणे हे इंटरनेट-आधारीत किंवा बिनतारी सेवांसाठी प्रमाणित उपकरण माहितीच्या प्रसारणास (आपले उपकरण, प्रणाली आणि अनुप्रयोग सॉफ्टवेअर आणि परिघीय उपकरणे यांविषयी तांत्रिक माहितीच्या समावेशासह पण त्यापुरतेच मर्यादित नाही) आपली संमती म्हणून संचालित होते. अनुप्रयोग वापरुन प्रवेशलेल्या सेवांच्या आपल्या वापराशी संबंधित जर इतर अटी सादर केलेल्या असतील तर त्या अटीदेखील लागू होतात.
  • b. इंटरनेट-आधारीत सेवांचा गैरवापर. आपण कोणतीही इंटरनेट-आधारीत सेवा, तिला हानी पोहोचेल किंवा इतर कोणाचेही तिच्या किंवा बिनतारी नेटवर्कच्या वापराचे नुकसान होईल अशा कोणत्याही प्रकारे वापरु शकणार नाही. आपण ही सेवा कोणत्याही प्रकारे कोणतीही सेवा, डेटा, खाते किंवा नेटवर्क यांच्याकडे अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करण्यासाठी वापरु शकणार नाही.
 • 3. परवान्याची व्याप्ती. अनुप्रयोगाचा परवाना दिलेला आहे, ते विकलेले नाही. हा करार आपल्याला केवळ अनुप्रयोग वापरण्याचे काही अधिकार देतो. जर Microsoft सोबतच्या कराराच्या अनुरोधाने आपल्या उपकरणांवर अनुप्रयोग वापरण्याची क्षमता Microsoft ने अक्षम केली तर संबंधित परवाना अधिकार संपुष्टात येतील. इतर सर्व अधिकार अनुप्रयोग प्रकाशक राखून ठेवतो. या मर्यादा असूनही जर लागू कायदा आपल्याला अधिक अधिकार देत नसेल तर केवळ या करारामध्ये स्पष्टपणे परवानगी दिल्याप्रमाणेच आपण अनुप्रयोग वापरु शकता. असे करताना आपल्याला अनुप्रयोगातील कोणत्याही तांत्रिक मर्यादांचे पालन करावे लागेल ज्या आपल्याला ते केवळ काही प्रकारेच वापरु देतात. आपण हे करु शकणार नाही:
  • a. अनुप्रयोगातील कोणत्याही तांत्रिक मर्यांदावर मात करणे.
  • b. अनुप्रयोगास उर्ध्व अभियांत्रिकीत, असंकलित करणे किंवा त्याचे भाग सुटे करणे, अपवाद आणि केवळ ही मर्यादा असूनही लागू कायदा स्पष्टपणे परवानगी देत असलेल्या मर्यादेपर्यंतच.
  • c. ही मर्यादा असूनही, या करारामध्ये विशेषत्वाने म्हटले किंवा लागू कायद्याने परवानगी दिली असेल त्यापेक्षा अनुप्रयोगाच्या अधिक प्रती बनविणे.
  • d. अनुप्रयोग प्रकाशित करणे किंवा इतर प्रकारे इतरांनी प्रती बनविण्यासाठी उपलब्ध करणे.
  • e. अनुप्रयोग भाड्याने, लीजवर किंवा उधार देणे.
  • f. अनुप्रयोग किंवा हा करार कोणत्याही तृतीय पक्षाकडे हस्तांतरित करणे.
 • 4. दस्तावेजीकरण. जर अनुप्रयोगासोबत दस्तावेज पुरविण्यात आलेले असतील तर आपण वैयक्तिक संदर्भ हेतूसाठी दस्तावेजांच्या प्रती बनवू शकता किंवा वापरु शकता.
 • 5. तंत्रज्ञान आणि निर्यात निर्बंध. अनुप्रयोग संयुक्त संस्थाने किंवा आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान नियंत्रण किंवा निर्यात कायदे आणि नियमनांच्या अधीन असू शकतो. अनुप्रयोगाद्वारे वापरलेल्या किंवा समर्थित केलेल्या तंत्रज्ञानास लागू होणार्‍या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय निर्यात कायदे आणि नियमने यांचे पालन आपण केले पाहिजे. या कायद्यांमध्ये गंतव्यस्थाने, अंतिम वापरकर्ते आणि अंतिम वापर यांवरील निर्बंधांचा समावेश आहे. Microsoft ब्रॅंडच्या उत्पादनांविषयी माहितीसाठी Microsoft निर्यात वेबसाईट ला जा.
 • 6. पाठबळ सेवा. कोणत्या पाठबळ सेवा उपलब्ध आहेत हे ठरविण्यासाठी अनुप्रयोग प्रकाशकाशी संपर्क साधा. Microsoft, आपला हार्डवेअर उत्पादक आणि आणि आपला बिनतारी वाहक (जर त्यांपैकी एकजण अनुप्रयोग प्रकाशक नसेल तर) अनुप्रयोगासाठी पाठबळ सेवा पुरविण्यास जबाबदार नाहीत.
 • 7. संपूर्ण करार. हा करार, कोणतेही लागू गुप्तता धोरण, अनुप्रयोगासोबत असलेल्या कोणत्याही अतिरिक्त अटी आणि पुरवण्या आणि अद्यतनांसाठीच्या अटी हा आपण आणि अनुप्रयोग प्रकाशकामधील अनुप्रयोगासाठीचा संपूर्ण परवाना करार आहे.
 • 8. लागू कायदा.
  • a. संयुक्त संस्थाने आणि कॅनडा. आपण अनुप्रयोग युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडामध्ये संपादन केला असल्यास, आपण जेथे राहता (किंवा, व्यवसाय असल्यास, जेथे आपल्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण स्थित आहे), त्या राज्याचा किंवा प्रांताचा कायदा या कराराचा अन्वयार्थ शासित करतो आणि त्याच्या उल्लंघनाच्या दाव्यांना आणि इतर सर्व दाव्यांना (उपभोक्ता संरक्षण, अन्याय्य स्पर्धा आणि अपकृत्य दावे यांच्या समावेशासह) लागू होतो, कायदे तत्त्वांच्या संघर्षाच्या अपरोक्ष.
  • b. संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांच्याबाहेर. जर आपण अनुप्रयोग इतर कोणत्याही देशामध्ये संपादित केला असेल तर त्या देशाचे कायदे लागू होतात.
 • 9. कायदेशीर प्रभाव. हा करार काही कायदेशीर अधिकारांचे वर्णन करतो. आपल्याला आपले राज्य किंवा देशाच्या कायद्यांतर्गत इतर अधिकार असू शकतील. हा करार आपल्या राज्य किंवा देशाच्या कायद्यांतर्गत असणारे आपले अधिकार बदलत नाही, जर आपल्या राज्य किंवा देशाचे कायदे तसे करण्यास परवानगी देत नसतील तर.
 • 10. वॉरंटीची अस्वीकृती. अनुप्रयोगाचा परवाना “जसे-आहे-तसे”, “सर्व दोषांसह” आणि “जसे उपलब्ध आहे तसे” तत्वावर दिलेला आहे. तो वापरण्याची सर्व जोखीम आपण उचलता. अनुप्रयोग प्रकाशक, त्यांच्या स्वतःच्या, Microsoft (जर Microsoft अनुप्रयोग प्रकाशक नसेल तर) यांच्या, ज्यांच्या नेटवर्कवरुन अनुप्रयोग पुरविलेला आहे त्या बिनतारी वाहकांच्या आणि आमचे संबंधित सहयोगी, विक्रेते, एजंट आणि पुरवठादार (“व्यापलेले पक्ष”) यांच्या प्रत्येकाच्या वतीने अनुप्रयोगाच्या संबंधात कोणत्याही स्पष्ट वॉरंट्या, हमी किंवा स्थिती देत नाही. अनुप्रयोगाची गुणवत्ता, सोय, सुरक्षा आणि कामगिरी याबद्दलची सर्व जोखीम आपल्यासोबत आहे. अनुप्रयोग सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास आवश्यक सर्व्हिसिंग किंवा दुरुस्तीचा संपूर्ण खर्च आपण स्वीकारता. आपल्याला आपल्या स्थानिक कायद्यांतर्गत अतिरिक्त ग्राहक अधिकार असू शकतात जे हा करार बदलू शकत नाही. आपल्या स्थानिक कायद्यांतर्गत परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, व्यापारक्षमता, एखाद्या विशिष्ट हेतूसाठी तंदुरुस्ती, सोय, सुरक्षा आणि अ-उल्लंघन यांसाठीच्या अभिप्रेत वॉरंट्या किंवा स्थितींसह कोणत्याही अभिप्रेत वॉरंट्या किंवा स्थिती व्यापलेले पक्ष अपवर्जित करतात.
 • 11. तोडगे आणि नुकसानीवरील मर्यादा आणि अपवर्जने. कायद्याने निषिद्ध नसल्याच्या मर्यादेपर्यंत, जर आपल्याकडे नुकसानाची पुनर्प्राप्ती करण्याचा कोणताही आधार असेल तर आपण अनुप्रयोगासाठी अदा केलेल्या रकमेपर्यंत किंवा USD$1.00 पर्यंत, जी मोठी असेल ती, केवळ थेट नुकसानांची अनुप्रयोग प्रकाशकाकडून पुनर्प्राप्ती करु शकता. आपण अनुप्रयोग प्रकाशकाकडून परिणामतः, गमावलेला नफा, विशेष, अप्रत्यक्ष किंवा प्रसंगात्मक नुकसान यांच्या समावेशासह इतर कोणत्याही नुकसानाची पुनर्प्राप्ती मिळवू पाहणार नाही आणि पाहण्याचा अधिकार सोडून देता. जर आपले स्थानिक कायदे वॉरंटी, हमी किंवा स्थिती लादत असतील, जरी या अटी तसे करत नसतील तरीही, तर त्याचा कालावधी आपण अनुप्रयोग डाउनलोड केल्यापासून 90 दिवसांपर्यंत मर्यादित असेल.

ही मर्यादा यांना लागू होते:

 • अनुप्रयोगाशी किंवा अनुप्रयोगाद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या सेवांशी संबंधित काहीही; आणि
 • करार, वॉरंटी, हमी किंवा स्थितीचा भंग यांसाठीचे दावे; कठोर उत्तरदायित्व, दुर्लक्ष किंवा इतर अपकृत्य; परिनियम किंवा नियमनाचे उल्लंघन; अन्याय्य समृद्धीकरण; किंवा कोणत्याही सिद्धांतांतर्गत; सर्व काही लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत.

ती यांवेळीदेखील लागू होते जेव्हा:

 • हा तोडगा आपल्याला कोणत्याही हानीसाठी पूर्ण नुकसानभरपाई देत नसेल; किंवा
 • अनुप्रयोग प्रकाशकाला नुकसानाच्या शक्यतेविषयी माहिती होते किंवा असायला हवे होते.
पूर्ण मजकूर
व्यापलेल्या सेवाव्यापलेल्या सेवाserviceslist
सारांश

पुढील उप्तादने, ॲप्स आणि सेवा Microsoft सेवा कराराद्वारे व्यापलेल्या आहेत पण त्या आपल्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध नसू शकतात.

 • Account.microsoft.com
 • Advertising.microsoft.com
 • Bing App for Android
 • Bing Apps
 • Bing Bots
 • Bing Business Bot
 • Bing Desktop
 • Bing Dictionary
 • Bing for Business
 • Bing Image and News (iOS)
 • Bing in the Classroom
 • Bing Maps
 • Bing Search APIs/SDKs
 • Bing Search app
 • Bing Sportscaster
 • Bing Toolbar
 • Bing Translator
 • Bing Webmaster
 • Bing Wikipedia Browser
 • Bing.com
 • Bing
 • Bingplaces.com
 • Citizen Next
 • Cortana skills by Microsoft
 • Cortana
 • Default Homepage and New Tab Page on Microsoft Edge
 • Dev Center App
 • Device Health App
 • Dictate
 • Docs.com
 • education.minecraft.net
 • Face Swap
 • Feedback Intake Tool for Azure Maps (aka “Azure Maps Feedback”)
 • Forms.microsoft.com
 • forzamotorsport.net
 • Groove Music Pass
 • Groove
 • GroupMe
 • HealthVault
 • LineBack
 • Maps App
 • Microsoft Academic
 • Microsoft Add-Ins for Skype
 • Microsoft Bots
 • Microsoft Educator Community
 • Microsoft Family
 • Microsoft Health
 • Microsoft Pay
 • Microsoft Research Interactive Science
 • Microsoft Research Open Data
 • Microsoft Soundscape
 • Microsoft Translator
 • Microsoft Wallpaper
 • Microsoft XiaoIce
 • Microsoft खाते
 • Microsoft चित्रपट आणि टिव्ही
 • Microsoft द्वारे प्रकाशित Windows गेम, अ‍ॅप्स आणि वेबसाइट
 • Mixer
 • MSN Dial Up
 • MSN Explorer
 • MSN Food & Drink
 • MSN Health & Fitness
 • MSN Money
 • MSN News
 • MSN Premium
 • MSN Sports
 • MSN Travel
 • MSN Weather
 • MSN.com
 • Next Lock Screen
 • Office 365 Consumer
 • Office 365 Home
 • Office 365 Personal
 • Office 365 Pro Plus optional connected experiences
 • Office 365 University
 • Office 365 साठी Microsoft समर्थन आणि रिकव्हरी सहाय्यक
 • Office Online
 • Office Store
 • Office Sway
 • Office.com
 • OneDrive.com
 • OneDrive
 • OneNote.com
 • Outlook.com
 • Paint 3D
 • Picturesque Lock Screen
 • Presentation Translator
 • Remix 3D
 • Rinna
 • rise4fun
 • Ruuh
 • Seeing AI
 • Send
 • Skype in the Classroom
 • Skype Interviews
 • Skype Manager
 • Skype Qik
 • Skype.com
 • Skype
 • Smart Search
 • Snip Insights
 • Spreadsheet Keyboard
 • Sprinkles
 • Sway.com
 • to-do.microsoft.com
 • Translator for Microsoft Edge
 • Translator Live
 • UrWeather
 • Video Breakdown
 • Visio Online
 • Web Translator
 • Who’s In
 • Windows Live Mail
 • Windows Live Writer
 • Windows Movie Maker
 • Windows Photo Gallery
 • Windows संग्रह
 • Xbox Game Pass
 • Xbox Game Studios गेम, अ‍ॅप्स आणि वेबसाइट
 • Xbox Live Gold
 • Xbox Live
 • Xbox Music
 • Xbox Store
 • संग्रह
पूर्ण मजकूर
1 मार्च 20180