मानक अनुप्रयोग परवाना अटी
MICROSOFT STORE, WINDOWS STORE आणि XBOX STORE
अद्यतनित केले- ऑक्टोबर 2017

या परवाना अटी आपण आणि अनुप्रयोग प्रकाशक यांच्यामधील करारनामा आहे. कृपया त्या वाचा. त्या आपण Microsoft Store, Windows Store किंवा Xbox Store (ज्यांपैकी प्रत्येकाचा या परवाना अटींमध्ये “Store” असा निर्देश केला आहे) वरून डाउनलोड केलेल्या सॉफ्टवेअर अनुप्रयोगांना लागू होतात, ज्यांमध्ये अनुप्रयोगासाठीची कोणतीही अद्यतने किंवा पुरवण्या यांचा समावेश आहे, मात्र अनुप्रयोग वेगळ्या अटींसोबत येत असल्यास, त्या बाबतीत त्या अटी लागू होतात.

अनुप्रयोग डाउनलोड करून किंवा वापरून किंवा यांपैकी काहीही करण्याचा प्रयत्न करून, आपण या अटी स्वीकारता. आपण त्या स्वीकारत नसल्यास, आपल्याला अनुप्रयोग डाउनलोड करण्याचा किंवा वापरण्याचा अधिकार नाही आणि आपण तसे करू शकत नाही.

Store कडून ओळखल्या गेल्यानुसार, अनुप्रयोग प्रकाशक म्हणजे आपल्याला अनुप्रयोगाचा परवाना देणारे अस्तित्व.

आपण या परवाना अटींचे पालन करत असल्यास, आपल्याला खालील अधिकार आहेत.
1. स्थापना आणि वापर अधिकार; मुदत समाप्ती. आपण आमच्या वापर नियमां मध्ये वर्णन केल्यानुसार Windows डिव्हाइसेस किंवा Xbox कन्सोल्सवर अनुप्रयोग स्थापित करू शकता आणि वापरू शकता. Microsoft कधीही आमचे वापर नियम बदलण्याचा अधिकार राखून ठेवते.
2. इंटरनेट-आधारित सेवा.

a. इंटरनेट-आधारित किंवा वायरलेस सेवांसाठी संमती. अनुप्रयोग संगणक प्रणालींशी इंटरनेटवरून, ज्यामध्ये वायरलेस नेटवर्कद्वारे कनेक्ट होणे समाविष्ट असू शकते, कनेक्ट होत असल्यास, अनुप्रयोग वापरणे हे इंटरनेट-आधारित किंवा वायरलेस सेवेसाठी मानक डिव्हाइस माहितीच्या (आपले डिव्हाइस, प्रणाली आणि अनुप्रयोग सॉफ्टवेअर यांविषयी तांत्रिक माहितीच्या समावेशासह, पण त्यापुरते मर्यादित नाही) प्रक्षेपणाला आपली संमती असल्याप्रमाणे काम करते. अनुप्रयोग वापरून प्रवेश केलेल्या सेवांच्या आपल्या वापराच्या संबंधात इतर अटी सादर केल्या गेल्यास, त्या अटीदेखील लागू होतात.

b. इंटरनेट-आधारित सेवांचा गैरवापर. आपण कोणतीही इंटरनेट-आधारित सेवा तिला इजा पोहोचेल किंवा तिच्या किंवा वायरलेस सेवेच्या इतर कोणी करत असलेल्या वापरात बाधा येऊ शकेल अशा कोणत्याही प्रकारे वापरू शकत नाही. आपण कोणतीही सेवा, डेटा, खाते किंवा नेटवर्क यांवर कोणत्याही मार्गांनी अनधिकृत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सेवा वापरू शकत नाही.

3. परवान्याची व्याप्ती. अनुप्रयोगाचा परवाना दिलेला आहे, तो विकलेला नाही. हा करारनामा आपल्याला केवळ अनुप्रयोग वापरण्याचे काही अधिकार देतो. आपल्या Microsoft सोबतच्या करारनाम्याच्या अनुरोधाने Microsoft ने आपल्या डिव्हाइसेसवर अनुप्रयोग वापरण्याची क्षमता अक्षम केल्यास, कोणतेही संबद्ध परवाना अधिकार समाप्त होतील. अनुप्रयोग प्रकाशक इतर सर्व अधिकार राखून ठेवतो. ही मर्यादा असतानाही लागू कायदा आपल्याला अधिक अधिकार देत नसल्यास, आपण अनुप्रयोग केवळ या करारनाम्यात स्पष्टपणे परवानगी दिल्यानुसारच वापरू शकता. तसे करताना, आपण अनुप्रयोगातील आपल्याला तो केवळ काही प्रकारे वापरण्याची अनुमती देणार्‍या कोणत्याही तांत्रिक मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण हे करू शकत नाही:

a. अनुप्रयोगातील कोणत्याही तांत्रिक मर्यादांमधून मार्ग काढणे.

b. ही मर्यादा असतानाही लागू कायदा स्पष्टपणे परवानगी देत असणे वगळता आणि केवळ त्या मर्यादेपर्यंत अनुप्रयोग ऊर्ध्व अभियांत्रिकित, विघटित किंवा विलग करणे.

c. अनुप्रयोगाच्या या करारनाम्यात निर्दिष्ट केल्यापेक्षा किंवा ही मर्यादा असतानाही लागू कायद्याद्वारे अनुमती दिल्यापेक्षा अधिक प्रती तयार करणे.

d. अनुप्रयोग प्रकाशित करणे किंवा तो इतरांना कॉपी करण्यासाठी अन्यथा उपलब्ध करून देणे.

e. अनुप्रयोग भाड्याने, भाडेतत्त्वाने किंवा कर्जाऊ देणे.

f. अनुप्रयोग किंवा हा करारनामा कोणत्याही तृतीय पक्षाला हस्तांतरित करणे.
4. दस्तऐवज. अनुप्रयोगासोबत दस्तऐवज पुरवलेले असल्यास, आपण वैयक्तिक संदर्भासाठी आणि उद्देशांसाठी दस्तऐवज कॉपी करू शकता आणि वापरू शकता.
5. तंत्रज्ञान आणि निर्यात निर्बंध. अनुप्रयोग युनायटेड स्टेट्स किंवा आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान नियंत्रण किंवा निर्यात कायदे आणि नियमांच्या अधीन असू शकतो. आपण अनुप्रयोगाद्वारे वापरल्या गेलेल्या किंवा सपोर्ट असलेल्या तंत्रज्ञानाला लागू होणार्‍या सर्व स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय निर्यात कायदे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या कायद्यांमध्ये गंतव्यस्थाने, अंतिम वापरकर्ते आणि अंतिम वापर यांचा समावेश आहे. Microsoft ब्रँडेड उत्पादनांविषयी अधिक माहितीसाठी, Microsoft निर्यात वेबसाइटवर जा (http://go.microsoft.com/fwlink/?LinkId=242130).
6. साहाय्य सेवा. कोणत्याही साहाय्य सेवा उपलब्ध आहेत का हे निर्धारित करण्यासाठी अनुप्रयोग प्रकाशकाशी संपर्क साधा. Microsoft, आपला हार्डवेअर उत्पादक आणि आपला वायरलेस वाहक (यांपैकी एक अनुप्रयोग प्रकाशक नसल्यास) अनुप्रयोगासाठी साहाय्य सेवा पुरवण्यासाठी जबाबदार नाहीत.
7. संपूर्ण करारनामा. हा करारनामा, कोणतेही लागू गोपनीयता धोरण, अनुप्रयोगासोबतच्या कोणत्याही अतिरिक्त अटी आणि पुरवण्या आणि अद्यतनांसाठीच्या अटी अनुप्रयोगासाठी आपण आणि अनुप्रयोग प्रकाशक यांच्यामधील संपूर्ण परवाना करारनामा आहेत.
8. लागू कायदा.

a. युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा. आपण अनुप्रयोग युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडामध्ये मिळवला असल्यास, आपण जेथे राहता त्या राज्याचे किंवा प्रांताचे (किंवा, व्यवसाय असल्यास, जेथे आपले व्यवसायाचे प्रमुख ठिकाण स्थित आहे तेथील) कायदे या अटींचा अर्थ, त्यांच्या उल्लंघनाचे दावे आणि इतर सर्व दावे (उपभोक्ता संरक्षण, अनुचित स्पर्धा आणि नुकसानभरपाईचे दावे यांसह), कायद्याच्या तत्त्वांचा संघर्ष विचारात न घेता, शासित करतात.

b. युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा यांच्या बाहेर. आपण अनुप्रयोग इतर कोणत्याही देशात मिळवला असल्यास, त्या देशाचे कायदे लागू होतात.
9. कायदेशीर प्रभाव. हा करारनामा काही कायदेशीर अधिकारांचे वर्णन करतो. आपल्या राज्याच्या किंवा देशांच्या कायद्यांतर्गत आपल्याला इतर अधिकार असू शकतात. आपल्या राज्याचे किंवा देशाचे कायदे तसे करण्यास परवानगी देत नसल्यास, हा करारनामा आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या कायद्यांतर्गत असलेले आपले अधिकार बदलत नाही.
10. वॉरंटीचे अस्वीकरण. या अनुप्रयोगाचा परवाना “जसा आहे”, “सर्व दोषांसह” आणि “जसा उपलब्ध आहे” तत्त्वावर दिला आहे. आपण तो वापरण्याची सर्व जोखीम पत्करता. अनुप्रयोग प्रकाशक, त्याच्या स्वतःच्या, Microsoft च्या (Microsoft अनुप्रयोग प्रकाशक नसल्यास), ज्याच्या नेटवर्कवरून अनुप्रयोग पुरवला आहे त्या वायरलेस वाहकाच्या आणि आमचे प्रत्येक संबंधित सहयोगी कंपन्या, विक्रेते, एजंट आणि पुरवठादार (“व्यापलेले पक्ष”) यांच्या वतीने अनुप्रयोगाच्या संबंधात कोणत्याही स्पष्ट वॉरंट्या, हमी किंवा शर्ती देत नाही. अनुप्रयोगाची गुणवत्ता, सुरक्षितता, सोय आणि कामगिरी यांची संपूर्ण जोखीम आपल्याकडे आहे. अनुप्रयोग सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास, आपण सर्व आवश्यक सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीचा संपूर्ण खर्च वहन करता. आपल्या स्थानिक कायद्यांतर्गत आपल्याला हा करारनामा बदलू शकत नसलेले अतिरिक्त उपभोक्ता अधिकार असू शकतात. आपल्या स्थानिक कायद्यांतर्गत परवानगी दिली असण्याच्या मर्यादेपर्यंत, व्यापलेले पक्ष कोणत्याही ध्वनित वॉरंट्या किंवा शर्ती वगळतात, ज्यांमध्ये व्यापारक्षमता, विशिष्ट उद्देशासाठी योग्यता, सुरक्षितता, सोय आणि ना-उल्लंघन यांसाठी असलेल्या वॉरंट्या किंवा शर्ती समाविष्ट आहेत.
11. उपाय आणि नुकसानभरपाई यांवरील मर्यादा आणि त्यांचे वगळणे. लागू कायद्याने प्रतिबंधित केले नसल्याच्या मर्यादेपर्यंत, आपल्याकडे नुकसानभरपाई मिळवण्यासाठी कोणताही आधार असल्यास, आपण अनुप्रयोग प्रकाशकाकडून आपण अनुप्रयोगासाठी दिलेल्या रकमेपर्यंत किंवा USD$1.00 यांपैकी जी अधिक रक्कम असेल ती केवळ थेट नुकसानभरपाई म्हणून मिळवू शकता. आपण अनुप्रयोग प्रकाशकाकडून परिणामस्वरूप, नफ्यातील नुकसान, विशेष, अप्रत्यक्ष किंवा प्रासंगिक नुकसानभरपाई यांसह इतर कोणतीही नुकसानभरपाई मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्यावरील अधिकार सोडून द्याल. आपले स्थानिक कायदे, या अटी तसे करत नसतानादेखील, एखादी वॉरंटी, हमी किंवा शर्त लागू करत असल्यास, त्याचा कालावधी आपण अनुप्रयोग डाउनलोड केल्यापासून 90 दिवसांपर्यंत मर्यादित असेल.

ही मर्यादा पुढील गोष्टींना लागू होते:
अनुप्रयोगामधून उपलब्ध करून दिलेल्या अनुप्रयोगाशी किंवा सेवांशी संबंधित कोणतीही गोष्ट; आणि
करारनामा, वॉरंटी, हमी किंवा शर्त यांचे उल्लंघन; सक्त उत्तरदायित्व, निष्काळजीपणा किंवा इतर नुकसानभरपाईचे दावे; अधिनियम किंवा नियमांचे उल्लंघन; अन्याय्य संपन्नता; किंवा इतर कोणत्याही सिद्धातांतर्गत असलेले दावे; सर्व लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत.

ते असे असल्यासदेखील लागू होते:
हा उपाय कोणत्याही नुकसानांसाठी आपली संपूर्ण भरपाई करत नसल्यास; किंवा
अनुप्रयोग प्रकाशकाला नुकसानभरपाईच्या शक्यतेविषयी माहीत होते किंवा माहीत असणे आवश्यक होते.