MICROSOFT विक्रीच्याअटी
फेब्रुवारी 2017 मध्ये अद्यतनित केले
Microsoft च्या ऑनलाईन आणि रिटेल Stores मध्ये स्वागत. "Store" म्हणजे आमची ऑनलाईन आणि रिटेल स्थळे जी आपल्याला साधने, खेळ कॉन्सोल, डिजिटल सामग्री, अनुप्रयोग, खेळ, सेवा आणि अधिकच्या समावेशासह उत्पादने आणि सेवा ब्राऊज करू, पाहू, मिळवू, खरेदी करू देतात आणि त्यांचे गुणांकन आणि पुनरावलोकन करू देतात. या विक्रीच्या अटी ("विक्रीच्या अटी") Microsoft Store, Office Store, Xbox Store, Windows Store आणि इतर Microsoft सेवा व्यापतात ज्या या विक्रीच्या अटींना संदर्भित करतात (एकत्रितपणे "Store"). Store द्वारे Microsoft विविध प्रकारच्या संसाधनांवर प्रवेश पुरवते, ज्यांमध्ये डाउनलोड क्षेत्रे, सॉफ्टवेअर, साधने आणि सॉफ्टवेअर, सेवा आणि इतर वाणिज्य वस्तूंची माहिती यांचा समावेश होतो. (एकत्रितपणे "सेवा" आणि Store सह "Store"). Store देऊ करत असलेली अनेक उत्पादने, सेवा आणि सामग्री Microsoft व्यतिरिक्त अस्तित्वांनी देऊ केलेली तृतीय-पक्ष उत्पादने आहेत. Store वापरून, किंवा Store मधूनउत्पादनेआणिसेवाखरेदीकरून, आपणयाविक्रीच्याअटींशी, Microsoft च्यागोपनीयताविधानाशी (खालीलवैयक्तिकमाहितीचीगोपनीयताआणिसंरक्षणविभागपहा), आणि Store मध्येसापडणार्याकिंवायाविक्रीच्याअटींमध्येसंदर्भितझालेल्यालागूअटीआणिशर्तीं, धोरणेकिंवाअस्वीकृतींशी (एकत्रितपणे"Store धोरणे") सहमतहोता. Store धोरणे काळजीपूर्वक वाचण्यासाठी आम्ही आपल्याला प्रोत्साहन देतो. आपण STORE धोरणांशी सहमत नसल्यास आपण STORE किंवा सेवा वापरू नयेत.
आमचे Microsoft Retail Store आपल्या देशात किंवा प्रदेशात स्थित असल्यास, त्याची वेगळी किंवा अतिरिक्त धोरणे असू शकतील. Microsoft पूर्वसूचनेशिवाय कोणतीही धोरणे कोणत्याही वेळी अद्यतनित किंवा दुरुस्त करू शकते.
आपल्या Store च्यावापराशीसंबंधितअटी
1. सदस्य खाते. Store साठी आपण खाते उघडण्याची आवश्यकता असल्यास, आपण आम्हाला लागू नोंदणी अर्जास आवश्यक असलेली वर्तमान, संपूर्ण आणि अचूक माहिती पुरवून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. खाते उघडण्यासाठी शर्त म्हणून आपल्याला सेवा करार किंवा वेगळ्या वापरण्यासाठीच्या अटी स्वीकारणे आवश्यक असू शकते. आपण Store वर प्रवेशण्यासाठी केलेला खात्याचा वापर आणि आपण Store वरून मिळवलेल्या सामग्रीचा वापर Microsoft खाते शासित करणार्या सर्व अटींच्या अधीन आहे. अधिक माहितीसाठी, कृपया सेवा करार पहा. आपल्या खात्याची माहिती आणि पासवर्ड गोपनीय ठेवण्यासाठी आपण जबाबदार आहात आणि आपल्या खात्याअंतर्गत घडणार्या सर्व क्रियाकलापांसाठी जबाबदार आहात.
2. बेकायदेशीर किंवा निषिद्ध वापर नाही. आपल्या Store आणि सेवांच्या वापराची शर्त म्हणून, आपण आम्हाला हमी देता की आपण कोणत्याही बेकायदेशीर किंवा या विक्रीच्या अटी, Store धोरणे किंवा Store च्या आपल्या वापराला लागू असलेल्या इतर कोणत्याही अटी यांद्वारे निषिद्ध हेतूंसाठी Store चा वापर करणार नाही. कोणतेही Microsoft सर्व्हर किंवा कोणत्याही Microsoft सर्व्हरशी जोडलेल्या नेटवर्कची हानी होईल, ते अक्षम होईल, त्यावर अतिरिक्त भार येईल किंवा त्याला अपाय होईल अशा कोणत्याही प्रकारे आपण Store चा वापर करू नये किंवा इतर कोणत्याही पक्षाचा Store चा वापर आणि आनंद यांच्यात हस्तक्षेप करू नये. आपण हॅकिंग, पासवर्ड माइनिंग किंवा इतर कोणत्याही मार्गाने Store, इतर खाती, कोणत्याही Microsoft सर्व्हरशी किंवा Store शी जोडलेली संगणक प्रणाली किंवा नेटवर्क यांवर अनधिकृत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करू नये. Store द्वारे हेतूपूर्वक उपलब्ध करून न दिलेल्या कोणत्याही मार्गाने आपण कोणतेही साहित्य किंवा माहिती मिळवू नये किंवा मिळवण्याचा प्रयत्न करू नये. तृतीय पक्षांच्या अधिकारांचे उल्लंघन होईल, ज्यात Microsoft सह एखाद्या व्यक्तीला किंवा अस्तित्वाला अपाय करणे समाविष्ट आहे, अशा प्रकारे आपण Store वापरू नये. Store मधून मिळवलेली कोणतीही उत्पादने, माहिती किंवा सेवा आपण व्यावसायिकरित्या वितरित करू नये, प्रकाशित करू नये, परवाना देऊ नये किंवा विक्री करू नये.
3. आपण Microsoft ला पुरवत असलेले किंवा Store वर पोस्ट करत असलेले साहित्य. आपण Microsoft ला पुरवत असलेले (अभिप्राय, रेटिंग, पुनरावलोकने आणि सूचना यांसह) किंवा इतरांद्वारे पुनरावलोकनासाठी Store किंवा संबंधित Microsoft सेवांवर पोस्ट, अपलोड, इनपुट किंवा सादर (प्रत्येक "सादरीकरण" आणि एकत्रितपणे "सादरीकरणे") करत असलेल्या साहित्यावर Microsoft मालकीचा दावा करत नाही. तथापि, आपण Microsoft ला आपले सादरीकरण, आपल्या नावासह, वापरण्याचा, फेरबदल करण्याचा, रूपांतरित करण्याचा, पुनरुत्पादित करण्याचा, त्यापासून अनुजात कृती तयार करण्याचा, भाषांतरित करण्याचा, संपादित करण्याचा, सादर करण्याचा, वितरित करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा रॉयल्टी-मुक्त, शाश्वत, अरद्दबातलक्षम, जागतिक, ना-अनन्य आणि उपपरवानायोग्य अधिकार प्रदान करता. जेथे ते निर्बंधांशिवाय विस्तृतपणे ऑनलाइन उपलब्ध असेल अशा Store च्या क्षेत्रांमध्ये आपण आपले सादरीकरण प्रकाशित केल्यास, आपले सादरीकरण Store आणि/किंवा Store देऊ करत असलेली उत्पादने, सेवा आणि सामग्री यांचा प्रचार करणारी प्रदर्शने किंवा साहित्यामध्ये दिसू शकेल. आपण हमी देता आणि प्रतिनिधित्व करता की आपण पुरवत असलेले कोणतेही सादरीकरण करण्याचे सर्व आवश्यक अधिकार आपल्याकडे आहेत (आणि असतील) आणि आपण ते अधिकार Microsoft ला प्रदान कराल.
आपले सादरीकरण वापरण्याच्या संदर्भात कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. Microsoft वर कोणतेही सादरीकरण पोस्ट करण्याचे किंवा वापरण्याचे बंधन नाही आणि Microsoft कोणतेही सादरीकरण कोणत्याही वेळी आपल्या स्वतःच्या विवेकबुद्धीने काढून टाकू शकते. आपल्या सादरीकरणासाठी किंवा इतरांनी पोस्ट, अपलोड, इनपुट किंवा सादर केलेल्या साहित्याची Microsoft जबाबदारी घेत नाही किंवा उत्तरदायित्व गृहित धरत नाही.
आपण Store मधील अनुप्रयोगाचे गुणांकन किंवा पुनरावलोकन केल्यास, आपल्याला Microsoft कडून अनुप्रयोगाच्या प्रकाशकाकडील सामग्री असणारा ईमेल प्राप्त होऊ शकतो.
4. तृतीय-पक्ष वेबसाईटच्या लिंक. Store मध्ये आपल्याला Store सोडून जाऊ देणार्या तृतीय-पक्ष वेबसाईटच्या लिंकचा समावेश असू शकतो. या लिंक केलेल्या साईट Microsoft च्या नियंत्रणात नाहीत आणि Microsoft कोणत्याही लिंक केलल्या सामग्रीसाठी किंवा लिंक केलेल्या साईटमधील कोणत्याही लिंकसाठी जबाबदार नाही. Microsoft या लिंक आपल्याला केवळ सोय म्हणून पुरवते आणि कोणत्याही लिंकचा समावेश Microsoft द्वारे साईटला मान्यता असल्याचे ध्वनित करत नाही. तृतीय-पक्ष वेबसाईटचा आपला वापर तृतीय पक्षाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन असू शकतो.
उत्पादनेआणिसेवायांच्याआपल्यालाकेल्याजाणार्याविक्रीशीसंबंधितअटी
5. भौगोलिक उपलब्धता. उपलब्ध उत्पादने आणि सेवा आपला प्रदेश किंवा साधन यांपरत्वे बदलू शकतात. या व्यतिरिक्त, आम्ही शिपिंग धोरणांमध्ये दर्शवल्याप्रमाणे उत्पादने कुठे शिप करू शकतो यावर मर्यादा असू शकतात. आपली खरेदी पूर्ण करण्यासाठी, आपण जेथे खरेदी करत आहात त्या Store च्या देशातील किंवा प्रदेशातील वैध देयक आणि शिपिंग पत्ता आपल्याकडे असणे आवश्यक असू शकेल.
6. केवळ अंतिम वापरकर्ते. Store मधून उत्पादने आणि सेवा खरेदी करण्यासाठी आपण अंतिम वापरकर्ता असणे आवश्यक आहे. पुनर्विक्रेते खरेदी करण्यास पात्र नाहीत.
7. निर्यात मर्यादा. Store मधून खरेदी केलेली उत्पादने आणि सेवा सीमाशुल्क आणि निर्यात नियंत्रण कायद्यांच्या आणि नियमांच्या अधीन असू शकतात. आपण सर्व लागू आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कायद्यांचे आणि नियमांचे पालन करण्यास सहमत होता.
8. देयक. Microsoft ला भरणा पद्धत पुरवून, आपण: (i) प्रतिनिधित्व करता की आपण पुरवलेली भरणा पद्धत वापरण्यासाठी आपण अधिकृत आहात आणि आपण पुरवत असलेली कोणतीही भरणा माहिती सत्य आणि अचूक आहे; (ii) आपली भरणा पद्धत वापरून खरेदी केलेली कोणतीही उत्पादने, सेवा किंवा उपलब्ध सामग्री यांसाठी आपल्याकडून आकारणी करण्यासाठी Microsoft ला अधिकृत करता; आणि (iii) आपण साइन अप करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी निवडलेल्या Store च्या कोणत्याही सशुल्क वैशिष्ट्यासाठी आपल्याकडून आकारणी करण्यासाठी Microsoft ला अधिकृत करता. आपण आपले खाते आणि इतर माहिती, आपला ईमेल पत्ता आणि क्रेडिट कार्ड क्रमांक आणि कालबाह्य होण्याचे दिनांक यांसह, त्वरित अद्यतनित करण्यास सहमत होता, जेणेकरून आम्ही आपले व्यवहार पूर्ण करू शकू आणि आपल्या व्यवहारांसंबंधात आवश्यक असेल तेव्हा आपल्याशी संपर्क साधू शकू. आम्ही आपल्याकडून देयक आकारू शकतो (a) अग्रिम; (b) खरेदीच्या वेळी; (c) खरेदीनंतर थोड्या वेळात; किंवा (d) सदस्यत्वांसाठी आवर्ती पद्धतीच्या आधारे. तसेच, आम्ही आपल्याकडून आपण मान्यता दिलेल्या रकमेपर्यंत आकारणी करू शकतो आणि आपल्या सदस्यत्वाच्या अटींनुसार आवर्ती सदस्यत्वांसाठी आकारण्यात येणार्या रकमेमधील कोणत्याही बदलाविषयी आम्ही आपल्याला अग्रिम सूचना देऊ. आपल्या एकाहून अधिक पूर्व देयक कालावधींसाठी आधी प्रक्रिया न केल्या गेलेल्या रकमांसाठी आम्ही आपल्याकडून एकाच वेळी देयक आकारू शकतो. खालील स्वयंचलित नुतनीकरण विभाग पहा.
आपण कोणत्याही चाचणी-कालावधी ऑफरमध्ये भाग घेत असल्यास, आम्ही आपल्याला अन्यथा सूचित करत नसल्यास, आपण नवीन खर्चाची आकारणी टाळण्यासाठी चाचणी कालावधीच्या शेवटी सेवा रद्द करणे आवश्यक आहे. आपण चाचणी कालावधीच्या शेवटी सेवा रद्द न केल्यास, आपण उत्पादन किंवा सेवेसाठी आपल्या भरणा पद्धतीकडून आकारणी करण्यास आम्हाला अधिकृत करता.
9. आवर्ती भरणा. आपण सदस्यत्वाच्या आधारे (उदा., साप्ताहिक, मासिक, दर 3 महिन्यांनी, किंवा वार्षिक (लागू होईल तसे)) उत्पादने, सेवा किंवा सामग्री खरेदी करता तेव्हा, आपण नोंद घेता आणि सहमत होता की आपल्याद्वारे किंवा Microsoft द्वारे किंवा अटींनुसार अन्यथा सदस्यत्व समाप्त केले जाईपर्यंत आपण आवर्ती भरणा अधिकृत करता आणि आपण निवडलेल्या पद्धतीद्वारे आपण निवडलेल्या आवर्ती मध्यांतरांनी Microsoft ला भरणा केला जाईल. आवर्ती भरणा अधिकृत करून, आपण Microsoft ला अशा भरण्यावर इलेक्ट्रॉनिक डेबिट किंवा फंड ट्रान्सफर किंवा आपल्या नियोजित खात्यामधील इलेक्ट्रॉनिक ड्राफ्ट (ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस किंवा त्यासारखा भरणा यांच्या बाबतीत) किंवा आपल्या नियोजित खात्यामधून आकारणी (क्रेडिट कार्ड आणि त्यासारखा भरणा यांच्या बाबतीत) म्हणून प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत करता (एकत्रितपणे, "इलेक्ट्रॉनिक भरणा"). सदस्यता शुल्काची देयक आकारणी किंवा आकारणी सामान्यपणे लागू सदस्यत्व कालावधीच्या आधी केली जाते. कोणताही भरणा आकारणीशिवाय परत गेल्यास किंवा कोणतेही क्रेडिट कार्ड किंवा त्यासारखा व्यवहार नाकारला गेल्यास किंवा अमान्य ठरल्यास, Microsoft किंवा तिचे सेवा प्रदाते लागू कायद्याने परवानगी दिल्यानुसार कोणतीही लागू परतावा वस्तू, नकार किंवा इतर शुल्क आकारण्याचा अधिकार राखून ठेवतात.
10. उत्पादन उपलब्धता आणि संख्या आणि मागणीच्या मर्यादा. उत्पादनांच्या किंमती आणि उपलब्धता कोणत्याही वेळी सूचनेशिवाय बदलू शकतात. प्रति मागणी, प्रति खाते, प्रति क्रेडिट कार्ड, प्रति व्यक्ती किंवा प्रति परिवार होऊ शकणार्या खरेदीच्या संख्यांवर Microsoft मर्यादा घालू शकते. आपण मागणी केलेली उत्पादने किंवा सेवा अनुपलब्ध असल्यास, पर्यायी उत्पादन देऊ करण्यासाठी आम्ही आपल्याशी संपर्क साधू शकतो. आपण पर्यायी उत्पादन खरेदी करणे न निवडल्यास, आम्ही आपली मागणी रद्द करू.
Microsoft कोणत्याही वेळी कोणतीही मागणी आपण मागणीसाठी भरणा केलेली कोणतीही रक्कम परत करून नाकारू शकते, ज्यामध्ये, पण जे यांपुरतेच मर्यादित नाही, आपण मागणीच्या वेळी विनिर्दिष्ट केलेल्या शर्तींची पूर्तता केली नाही, आपल्या भरण्यावर प्रक्रिया करता आली नाही, मागणी केलेली उत्पादने किंवा सेवा उपलब्ध नसल्यास किंवा किंमत किंवा इतर त्रुटी या कारणांचा समावेश होतो. किंअत किंवा इतर त्रुटींच्या प्रसंगी, आम्ही आमच्या विवेकबुद्धीनुसार, (a) आपली मागणी किंवा खरेदी करण्याचा किंवा (b) निर्देशांसाठी आपल्याशी संपर्क साधण्याचा अधिकार राखून ठेवतो. रद्द करण्याच्या प्रसंगी, आपला संबंधित सामग्रीवरील प्रवेश अक्षम केला जाईल.
आपल्या खात्याशी संबंधित सामग्रीवरील प्रवेश आम्ही कोणत्याही कारणासाठी अक्षम करू शकतो. Store च्या किंवा संभाव्य परिणाम होणार्या पक्षांच्या संरक्षणासाठी आम्ही खेळ, अनुप्रयोग, सामग्री किंवा सेवा काढूदेखील शकतो. काही सामग्री आणि अनुप्रयोग वेळोवेळी अनुपलब्ध असू शकतात किंवा मर्यादित काळासाठी देऊ केले जाऊ शकतात. उपलब्धतेवर प्रदेशाद्वारे परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे, आपण आपले खाते किंवा साधन दुसर्या प्रदेशात बदलल्यास, आपण सामग्री किंवा अनुप्रयोग री-डाउनलोड करू शकणार नाही किंवा आपण खरेदी केलेली विशिष्ट सामग्री री-स्ट्रीम करू शकणार नाही; आपण आपल्या आधीच्या प्रदेशात ज्यासाठी भरणा केलेला आहे ती सामग्री किंवा अनुप्रयोग आपल्याला पुन्हा खरेदी करण्याची आवश्यकता असू शकते. लागू कायद्याने आवश्यक मर्यादेचा अपवाद वगळता, आपण खरेदी केलेली कोणतीही सामग्री किंवा अनुप्रयोग यांचे री-डाउनलोड किंवा बदली पुरविण्याचे आमच्यावर बंधन नाही.
11. अद्यतने. लागू असल्यास, Microsoft स्वयंचलितपणे आपल्या अनुप्रयोगांसाठी अद्यतने तपासेल आणि ती डाउनलोड करेल, आपण संबंधित Store मध्ये साइन इन नसलात तरीही. Store अनुप्रयोगांसाठी स्वयंचलित अद्यतने प्राप्त करण्यास आपले प्राधान्य नसल्यास, आपण आपली सेटिंग्ज बदलू शकता. तथापि, पूर्णतः किंवा अंशतः ऑनलाईन होस्ट केलेले काही Office Store अनुप्रयोग कोणत्याही वेळी अनुप्रयोग विकासकाद्वारे अद्यतनित केले जाऊ शकतात आणि ते अद्यतनित करण्यासाठी आपल्या परवानगीची आवश्यकता नसू शकते.
12. सॉफ्टवेअर परवाने आणि वापर अधिकार. Store द्वारे उपलब्ध करून दिलेल्या सॉफ्टवेअर आणि इतर डिजिटल सामग्रीचा आपल्याला परवाना दिला आहे, ती विकलेली नाही. अनुप्रयोगासोबत वेगळ्या परवाना अटी पुरवलेल्या नसल्यास, Store मधून थेट डाउनलोड केलेले अनुप्रयोग [https://go.microsoft.com/fwlink/p/?linkid=838610&clcid=0x044e] येथे उपलब्ध असलेल्या प्रमाणित अनुप्रयोग परवाना अटींच्या ("SALT") अधीन आहेत. (Office Store मधून डाउनलोड केलेले अनुप्रयोग SALT द्वारे शासित नाहीत आणि त्यांसाठी वेगळ्या परवाना अटी आहेत.) Store मधून मिळवलेले अनुप्रयोग, खेळ आणि इतर डिजिटल सामग्री येथे स्थित वापर नियमांच्या अधीन आहेत https://go.microsoft.com/fwlink/p/?LinkId=723143. आपण हे समजता आणि याची पोच देता की या डिजिटल मालाशी संबंधित आपले अधिकार या विक्रीच्या अटी, स्वामित्वहक्क कायदा आणि वर संदर्भित वापर नियम यांच्याद्वारे मर्यादित आहेत. Microsoft Retail Store मधून खरेदी केलेले सॉफ्टवेअर परवाने सॉफ्टवेअरसोबत असणार्या परवाना कराराच्या अधीन आहेत आणि आपण सॉफ्टवेअर स्थापित करतेवेळी परवाना कराराशी सहमत होण्याची आवश्यकता असेल. संबंधित परवाना अटी, वापर नियम आणि लागू कायदा यांच्या अनुसार नसणारे सॉफ्टवेअरचे किंवा व्यापार वस्तूचे कोणतेही पुनरुत्पादन किंवा पुनर्वितरण स्पष्टपणे निषिद्ध आहे आणि त्याचा परिणाम कठोर दिवाणी आणि फौजदारी दंडांमध्ये होऊ शकतो. उल्लंघनकर्ते कायद्याच्या कमाल मर्यादेपर्यंत न्यायालयीन कारवाईची जोखीम पत्करतात.
आपण कोणतेही सॉफ्टवेअर पॅकेजिंग उघडण्याआधी आपल्याला बॉक्स्ड सॉफ्टवेअरसाठी लागू कायद्याची विनामूल्य प्रत हवी असल्यास कृपया MICROSOFT RETAIL STORE शी संपर्क साधा (खालील अधिसूचना आणि संवाद विभागात वर्णन केल्याप्रमाणे).
इतर अटी आणि शर्ती. सॉफ्टवेअर आणि इतर डाउनलोड करता येणार्या उत्पादनांव्यतिरिक्त, Store मध्ये खरेदी किंवा चाचणीसाठी उपलब्ध इतर उत्पादने आणि सेवा देखील आपल्याला वेगळ्या अंतिम वापरकर्ता परवाना करार, वापर अटी, सेवा अटी आणि इतर अटी आणि शर्तींच्या अधीन देऊ केल्या जाऊ शकतात. आपण ती उत्पादने खरेदी केल्यास किंवा वापरल्यास, खरेदी, स्थापना किंवा वापरण्याची शर्त म्हणून आपल्याला त्या वापर अटी स्वीकारणे देखील आवश्यक असू शकते.
आपल्या सोयीसाठी, STORE किंवा सेवेचा भाग म्हणून किंवा तिच्या सॉफ्टवेअर किंवा व्यापार वस्तूमध्ये विकलेल्या उत्पादनाचा किंवा सेवेचा भाग नसलेल्या वापरण्यासाठी आणि/किंवा डाउनलोडसाठी साधने आणि उपयोगी वस्तू MICROSOFT उपलब्ध करून देऊ शकते. लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, अशा कोणत्याही साधनांकडून किंवा उपयुक्त वस्तूंकडून मिळणार्या परिणामांच्या किंवा निष्पत्तीच्या अचूकतेच्या संदर्भात MICROSOFT कोणतीही प्रतिनिधित्वे, वॉरंट्या किंवा हमी देत नाही.
कृपया Store मधून किंवा सॉफ्टवेअर किंवा व्यापार वस्तूमधून उपलब्ध करून दिलेली साधने आणि उपयुक्त वस्तू वापरताना इतरांच्या बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांचा आदर करा.
13. सॉफ्टवेअरसाठी कोड आणि सामग्री डाउनलोड. काही सॉफ्टवेअर आणि सामग्री आपल्या खरेदीशी संबंधित Microsoft खात्यामध्ये डाउनलोड लिंक उपलब्ध करून देऊन आपल्याला वितरित केले जातात. खालील परिच्छेदाच्या अधीन, आम्ही या खरेदीसाठी सहसा डाउनलोड लिंक आणि संबंधित डिजिटल की आपल्या Microsoft खात्यामध्ये खरेदी दिनांकानंतरची 3 वर्षे संचयित करतो, पण कोणत्याही विशिष्ट लांबीच्या काळासाठी त्या संचयित करण्याचे वचन देत नाही. डाउनलोड लिंक पुरवून वितरित केल्या जाणार्या सदस्यत्व उत्पादनांसाठी वेगळ्या अटी आणि संचय अधिकार लागू होऊ शकतात, ज्यांचे आपण आपल्या सदस्यत्वाच्या वेळी पुनरावलोकन करून त्यांच्याशी सहमत होऊ शकता.
आपण सहमत होता की आम्ही आमचा डिजिटल की संचय प्रोग्राम कोणत्याही वेळी रद्द करू शकतो किंवा बदलू शकतो. आपण याच्याशी देखील सहमत होता की आम्ही एक किंवा अधिक उत्पादनांसाठी कींचा संचय कोणत्याही वेळी आणि कोणत्याही कारणाने समर्थित करणे थांबवू शकतो, उदाहरण म्हणून, उत्पादन समर्थन जीवन चक्राच्या शेवटी, ज्यानंतर आपल्याला डाउनलोड लोंक किंवा डिजिटल कीवर प्रवेश नसण्याच्या समावेशासह. आम्ही आमचा प्रोग्राम रद्द केल्यास किंवा बदलल्यास, जेणेकरून आपल्याला आपल्या खात्यामधील डाउनलोड लिंक किंवा डिजिटल कीवर प्रवेश नसेल, आम्ही आपल्याला संबंधित Microsoft खात्यासाठीची संपर्क माहिती वापरून किमान 90 दिवसांची पूर्वसूचना देऊ.
14. किंमत. आमचे Microsoft Retail Store आपल्या देशात किंवा प्रदेशात असल्यास, तेथे देऊ केल्या जाणार्या किंमती, उत्पादन निवड आणि प्रचार ऑनलाईन Store वर असलेल्यापेक्षा वेगळे असू शकते. लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, ऑनलाईन देऊ केलेल्या किंमती, उत्पादने किंवा प्रचार Microsoft Retail Store वर देखील उपलब्ध असतील याची किंवा याउलट असण्याची Microsoft हमी देत नाही.
Store किंमत जुळण्याची हमी देत नाही. समान वस्तूसाठी इतर रिटेलरनी जाहिरातींद्वारे देऊ केलेली किंमत आम्ही जुळवणार नाही.
आम्ही काही उत्पादनांसाठी त्यांच्या उपलब्धता तारखेआधी पूर्व-मागणीचा पर्याय देऊ करू शकतो. आमच्या पूर्व-मागणी धोरणांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमचे पूर्व-मागणी पृष्ठ https://go.microsoft.com/fwlink/p/?linkid=834935&clcid=0x044e पहा.
अन्यथा म्हटलेले नसल्यास, Store मध्ये दर्शवलेल्या किंमती आपल्या खरेदीला लागू होऊ शकणार्या कर आणि शुल्क ("कर") यांव्यतिरिक्त आहेत. Store मध्ये दर्शवलेल्या किंमती वितरण शुल्काव्यतिरिक्त देखील आहेत. कर आणि वितरण शुल्क (लागू होईल तसे) आपल्या खरेदीच्या रकमेत जोडले जातील आणि चेक-आउट पृष्ठावर दर्शवले जातील. अशा करांच्या आणि शुल्कांच्या भरण्यासाठी आपण एकटे जबाबदार आहात.
आपल्या स्थानावर अवलंबून, काही व्यवहारांना परदेशी चलन रूपांतरणाची किंवा दुसर्या देशात प्रक्रिया केली जाण्याची आवश्यकता असू शकते. आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास आपली बँक आपल्याला त्या सेवांसाठी अतिरिक्त शुल्क आकारू शकते. कृपया तपशीलांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
15. स्वयंचलित नूतनीकरण विभाग. स्वयंचलित नूतनीकरणांस आपल्या देशात, प्रदेशात, प्रांतात/क्षेत्रात किंवा राज्यात परवानगी असल्यास, आपण निश्चित सेवा कालावधीच्या शेवटी उत्पादन किंवा सेवांसाठी स्वयंचलित नूतनीकरण निवडू शकता. आपण स्वयंचलितपणे उत्पादनांचे किंवा सेवांचे नूतनीकरण करणे निवडल्यास, आम्ही सद्य सेवा कालावधीच्या शेवटी आपल्या उत्पादनांचे किंवा सेवांचे स्वयंचलितपणे नूतनीकरण करू शकतो आणि आपण खाली वर्णन केल्याप्रमाणे उत्पादन किंवा सेवा रद्द करण्याचे निवडले नसल्यास, आपल्याला नूतनीकरण सत्राचे त्यावेळेचे सद्य शुल्क आकारू शकतो. आम्ही आपल्याला आपल्या पसंतीच्या भरणा पद्धतीला नूतनीकरणासाठी देयक आकारणी करू, ते नूतनीकरणाच्या तारखेला फाईलवर असले किंवा नंतर पुरवलेले असले तरीही. आपण नूतनीकरण तारखेआधी उत्पादन किंवा सेवा रद्द करू शकता. नूतनीकरणासाठी देयक आकारणी टाळण्यासाठी आपल्याला नूतनीकरण तारखेआधी सेवा रद्द करणे आवश्यक आहे.
16. परतावा धोरण. खरेदी किंवा डाउनलोड तारखेपासून 14 दिवसांपर्यंत आम्ही पात्र वस्तूंसाठी परतावा आणि बदली स्वीकारू, लागू होईल तसे. फक्त पात्र उत्पादन नवीन स्थितीत असल्यासारखे आणि त्याच्या मूळ पॅकेजिंगमध्ये, आरंभी समाविष्ट असलेले सर्व भाग, घटक, निर्देश पुस्तिका आणि दस्तावेज यांसह परत करा. हे परतावा धोरण आपल्या खरेदीला लागू होऊ शकणार्या कोणत्याही वैधानिक अधिकारांवर प्रभाव टाकत नाही.
पॅकेज केलेले सॉफ्टवेअर आणि खेळ त्यांचे सील अखंड ठेवून परत करणे आवश्यक आहे आणि त्यांमध्ये सर्व मीडिया आणि उत्पादन की समाविष्ट असणे आवश्यक आहे. मर्यादित अपवाद म्हणून, आपण परवाना कराराशी सहमत नसल्यास, मात्र केवळ आपण कोणत्याही प्रतींचा वापर केलेला नसल्यास, उघडलेले सॉफ्टवेअर आणि खेळ पॅकेज त्यांच्या परतावा कालावधीच्या आत परत केले जाऊ शकतात.
काही वस्तू परताव्यासाठी पात्र नाहीत; कायद्यात इतर प्रकारे तरतूद नसल्यास किंवा विशेष उत्पादन ऑफर नसल्यास, या प्रकारच्या उत्पादनांच्या सर्व खरेद्या अंतिम आणि अ-परतावाक्षम आहेत:
डिजिटल अनुप्रयोग, खेळ, अनुप्रयोगांतर्गत सामग्री आणि सदस्यत्वे, संगीत, चित्रपट, टीव्ही शो आणि संबंधित सामग्री;
भेट कार्ड आणि सेवा/सदस्यत्व कार्ड (उदा., Skype, Xbox Live, Groove Music Pass);
वैयक्तीकृत किंवा सानुकूल केलेली उत्पादने;
विशेष मागणी उत्पादने, Store प्रचारात्मक ऑफरिंगचा भाग नसल्यास;
रँडम अॅक्सेस मेमरी ("RAM") उत्पादने;
सादर केलेल्या किंवा उपभोगलेल्या सेवा; आणि
क्लिअरन्स वस्तू किंवा "अंतिम विक्री" किंवा "अ-परतावाक्षम" निर्देशासह चिन्हांकित केलेल्या वस्तू.
आपण पात्र परतावा करता त्या वेळी, मूळ शिपिंग आणि हाताळणी शुल्क (काही असल्यास) वजा करून आम्ही पूर्ण रक्कम क्रेडिट करू आणि आपण सामान्यपणे 3-5 व्यवसाय दिवसांत आपल्या रकमेचा परतावा मिळवाल. कोणतेही रकमेचे परतावे एकाच खात्याला, आणि मागणी नोंदवताना वापरलेली समान भरणा पद्धत वापरून, लागू केले जातील (आपण परताव्याच्या रकमेमध्ये Store क्रेडिट न निवडल्यास).
पात्र उत्पादनांचा परतावा कसा करावा याच्या संपूर्ण तपशीलांसाठी, आमचे परतावे आणि रकम परतावे पृष्ठ https://go.microsoft.com/fwlink/p/?linkid=723276&clcid=0x044e पहा.
आपण तैवान येथे राहत असल्यास, कृपया नोंद घ्या की तैवानचा ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याच्या संबंधित नियमनांनुसार, अभौतिक रूपाद्वारे आणि/किंवा ऑनलाईन सेवांद्वारे पुरविलेल्या डिजिटल सामग्रीविषयीच्या सर्व खरेद्या अंतिम आहेत आणि अशी सामग्री किंवा सेवा ऑनलाईन पुरविली असताना अ-परतावाक्षम आहेत. आपल्याला कोणत्याही कूलिंग ऑफ कालावधीचा किंवा कोणत्याही परताव्याचा अधिकार नाही.
17. आपल्यालाकेलेलाभरणा. आम्ही आपल्याला भरणा देऊ लागत असल्यास, आपण हा भरणा आपल्याला करण्यासाठी आम्हाला आवश्यक असणारी कोणतीही माहिती वक्तशीरपणे आणि अचूकपणे पुरवण्यास सहमत होता. आपल्याला केलेल्या या भरण्याच्या परिणामी आपल्याला कोणत्याही करांसाठी आणि शुल्कांसाठी आपल्याला लागू शकणार्या खर्चासाठी आपण जबाबदार आहात. लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, आपल्या कोणत्याही भरण्याच्या अधिकारावर आम्ही लावत असलेल्या इतर कोणत्याही शर्तींचे आपण पालन करणे आवश्यक आहे. आपण चुकीने भरणा प्राप्त केल्यास, आम्हाला तो भरणा उलट करण्याची किंवा परत मागण्याची आवश्यकता असू शकते. असे करण्याच्या आमच्या प्रयत्नात आम्हाला मदत करण्यास आपण सहमत होता. आधीचा कोणताही अतिरिक्त भरणा समायोजित करण्यासाठी आम्ही आपल्याला केला जाणारा भरणा सूचनेशिवाय कमी करू शकतो.
18. भेट कार्ड. Microsoft Retail Store मधून खरेदी केलेली भेट कार्ड येथे स्थित रिटेल भेट कार्ड कराराने शासित आहेत https://www.microsoftstore.com/store/msusa/html/pbPage.Help_Retail_Stores#GiftCards.
Skype भेट कार्डांवरील माहिती Skype च्या मदत पृष्ठावर उपलब्ध आहे (https://support.skype.com/en/faq/FA12197/what-is-a-skype-gift-card-and-where-can-i-buy-one).
इतर Microsoft भेट कार्डांचे प्रतिदान आणि वापर Microsoft भेट कार्ड अटी आणि शर्तींनी शासित आहे (https://commerce.microsoft.com/PaymentHub/Help/Show/toc_link_no_62).
19. ग्राहक सेवा. ग्राहक सेवा पर्यायांविषयी अधिक माहितीसाठी कृपया आमच्या विक्री आणि सहाय्य पृष्ठाला https://go.microsoft.com/fwlink/p/?linkid=824761&clcid=0x044e भेट द्या.
सर्वसाधारणअटी
20. अटी बदलणे. Microsoft विक्रीच्या अटी कोणत्याही वेळी आणि आपल्याला सूचना न देता बदलू शकते. आपण मागणी नोंदवते वेळी लागू असलेल्या विक्रीच्या अटी आपली खरेदी शासित करतील आणि आपल्यामध्ये खरेदी करार म्हणून काम करतील. आपल्या पुढील खरेदीआधी, Microsoft ने आपल्याला सूचना न देता विक्रीच्या अटी बदललेल्या असू शकतात. आपण Store ला प्रत्येक वेळी भेट देताना कृपया विक्रीच्या अटींचे पुनरावलोकन करा. आम्ही अशी शिफारस करतो की आपण खरेदी करता तेव्हा आपण भविष्यातील संदर्भासाठी विक्रीच्या अटींची प्रत जतन किंवा प्रिंट करावी.
21. वयोमर्यादा. आपल्या Store च्या वापराला, खरेदीसह, वयोमर्यादा लागू होऊ शकतात.
22. वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि संरक्षण. आपली गुप्तता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही आपल्याकडून संकलित केलेली काही माहिती Store चे संचालन करण्यासाठी आणि ते पुरवण्यासाठी वापरतो. कृपया Microsoft गोपनीयता विधान वाचा कारण ते आम्ही आपल्याकडून आणि आपल्या साधनांमधून जमा करतो त्या डेटाच्या प्रकाराचे ("डेटा") आणि आम्ही आपला डेटा कसा वापरतो याचे वर्णन करते. गोपनीयता विधान Microsoft आपला इतरांसोबतचा संवाद कसा वापरते; Store मार्गे Microsoft ला आपण सादर केलेल्या पोस्ट किंवा अभिप्राय; आणि आपण आपल्या साधनावर किंवा Store आपण अपलोड, संचय किंवा शेअर करत असलेल्या फाईली, फोटो, दस्तावेज, ऑडियो, डिजिटल कामे आणि व्हिडियो ("आपली सामग्री") यांचे देखील वर्णन करते. Store वापरून, आपण Microsoft ला गोपनीयता विधानामध्ये वर्णन केल्याप्रमाणे आपली सामग्री आणि डेटा जमा करण्यास, वापरण्यास आणि उघड करण्यास स्पष्टपणे संमती देता.
23. उत्पादन प्रदर्शन आणि रंग. Microsoft रंग आणि प्रतिमा अचूकपणे प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करते पण आपण साधनाच्या स्क्रीनवर किंवा मॉनिटरवर पहात असलेला रंग उत्पादनाच्या रंगाशी तंतोतंत जुळेल याची आम्ही हमी देऊ शकत नाही.
24. Store सादरीकरणातील त्रुटी. माहिती अचूकपणे प्रकाशित करण्यासाठी, Store नियमितपणे अद्यतनित करण्यासाठी आणि त्रुटी आढळल्यावर त्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतो. तथापि, Store मधील सामग्रीपैकी कोणतीही कोणत्याही वेळी चुकीची किंवा कालबाह्य असू शकते. Store मध्ये कोणत्याही वेळी बदल करण्याचे अधिकार आम्ही राखून ठेवतो, ज्यांमध्ये किंमती, विवरण, ऑफर आणि उपलब्धता समाविष्ट आहेत.
25. वापर किंवा प्रवेशाची समाप्ती. Microsoft आपले खाते किंवा Store चा वापर कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणाने समाप्त करू शकते, ज्यामध्ये, मर्यादेशिवाय, आपल्याद्वारे या विक्रीच्या अटींचे किंवा Store धोरणांचे उल्लंघन होण्याचा किंवा Microsoft यापुढे Store चे संचालन करत नसण्याचा समावेश होतो. Store वापरून, अशा समाप्तीआधी आपण नोंदवत असलेल्या कोणत्याही मागण्यांसाठी किंवा आपल्याला येणार्या कोणत्याही खर्चासाठी आपण जबाबदार (या अटींनुसार) राहण्यास आपण सहमत होता. Microsoft कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणाने आणि आपल्याला पूर्वसूचना न देता Store बदलू, थांबवू किंवा अन्यथा निलंबित करू शकते.
26. वॉरंट्या आणि उपायांच्या मर्यादा. आपल्या स्थानिक कायद्याअंतर्गत परवानगी असल्याच्या मर्यादेपर्यंत, MICROSOFT आणि तिचे पुरवठादार, वितरक, पुनर्विक्रेते आणि सामग्री प्रदाते व्यापारक्षमता, समाधानकारक गुणवत्ता, एखाद्या विशिष्ट हेतूसाठी तंदुरुस्ती, कौशल्यपूर्ण प्रयत्न, शीर्षक किंवा ना-उल्लंघन यांच्या समावेशासह कोणत्याही स्पष्ट किंवा अभिप्रेत वॉरंट्या, हमी किंवा शर्ती देत नाहीत. PSTORE मध्ये विक्री केली जाणारी किंवा उपलब्ध असलेली उत्पादने किंवा सेवा वॉरंटीसह, तसे असल्यास, केवळ परवाना करार किंवा त्यासह असलेल्या उत्पादकाच्या वॉरंटीअंतर्गत आहेत. सोबतचा परवाना करार किंवा उत्पादकाच्या वॉरंटी यांअंतर्गत तरतूद असणे आणि आपल्या वैधानिक अधिकारांच्या अधीन असणे वगळता:
आपली खरेदी आणि वापर आपल्या स्वतःच्या जोखमीवर आहे;
आम्ही उत्पादने आणि सेवा "जसे आहे, " "सर्व दोषांसह, " आणि "जसे उपलब्ध आहे" पुरवतो;
आपण त्यांच्या गुणवत्तेविषयी आणि कार्याविषयी जोखीम गृहित धरता; आणि
आपण सर्व आवश्यक सेवा आणि दुरुस्तीचा संपूर्ण खर्च गृहित धरता.
STORE किंवा सेवेमध्ये उपलब्ध माहितीचा वक्तशीरपणा आणि अचूकता यांची MICROSOFT हमी देत नाही. आपण पोच देता की संगणक आणि दूरसंचार प्रणाली दोष-मुक्त नाहीत आणि नैमित्तिक बिघाड होतो. STORE किंवा सेवा यांवरील प्रवेश विनाव्यत्यय, वक्तशीर, सुरक्षित किंवा त्रुटीमुक्त असेल किंवा सामग्री हानी होणार नाही याची आम्ही हमी देत नाही.
जर, याविक्रीच्याअटींव्यतिरिक्त, Store, सेवाकिंवादेऊकेलेल्याकोणत्याहीउत्पादनाच्याकिंवासेवेच्यासंदर्भातउद्भवणारीक्षतिपूर्तीपुनर्प्राप्तकरण्यासाठीआपल्याकडेकाहीआधारअसल्यास, लागूकायद्याच्यामर्यादेपर्यंत, Microsoft किंवा ITS पुरवठादार, पुनर्विक्रेते, वितरकआणिसामग्रीप्रदातेयांच्याकडून (1) कोणतीहीसेवा, सदस्यत्वयांचीकिंमतकिंवाएकमहिन्याचेशुल्ककिंवायासारखेशुल्क (यामध्येहार्डवेअर, सॉफ्टवेअर, समर्थनकिंवाविस्तारितवॉरंट्यायांच्याखरेदीकिंमतीचासमावेशनाही) किंवा (2) सेवा, सदस्यत्वकिंवायासारखेशुल्कनसल्यास US $100.00 पर्यंतएकूणक्षतिपूर्तीथेटपुनर्प्राप्तकरणेहाआपलाअनन्यउपायआहे.
आपल्या स्थानिक कायद्यांअंतर्गत आपल्याला काही अधिकार असू शकतात. ते लागू असल्यास, या करारातील कशाचाही त्या अधिकारांवर प्रभाव करण्याचा हेतू नाही.
न्यूझिलंडमध्येराहणार्याउपभोक्त्यांसाठी, न्यूझिलंडउपभोक्ताहमीकायद्याअंतर्गतआपल्यालावैधानिकअधिकारअसूशकतात, याविक्रीअटींमधीलकशाचाहीत्याअधिकारांवरप्रभावकरण्याचाहेतूनाही.
27. दायित्वाची मर्यादा. कायद्याने परवानगी दिल्याच्या मर्यादेपर्यंत, आपण सहमत होता की आपण इतर कोणतीही क्षतिपूर्ती किंवा हानी, परिणामस्वरूप, विशेष, अप्रत्यक्ष, प्रासंगिक किंवा दंडात्मक क्षतिपूर्ती किंवा गमावलेला फायदा यांच्या समावेशासह, पुनर्प्राप्त करू शकत नाही. जरी आपल्याला नुकसान झाले आणि जरी आम्हाला नुकसानाच्या शक्यतेची माहिती होती किंवा असायला हवी होती तरी विभाग 26 आणि 27 मधील मर्यादा आणि अपवर्जने लागू होतात. काही राज्ये किंवा प्रांत/क्षेत्रे प्रासंगिक किंवा परिणामस्वरूप नुकसानाच्या अपवर्जनाची किंवा मर्यादेची परवानगी देत नाहीत, म्हणून वरील मर्यादा किंवा अपवर्जने कदाचित आपल्याला लागू होणार नाहीत.
लागू कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, Store, सेवा, किंवा देऊ केलेले कोणतेही उत्पादन किंवा सेवा यांच्याशी संबंधित या विक्रीच्या अटी, सामग्री गमावणे, Store किंवा सेवा किंवा Store मधून प्राप्त केलेले कोणतेही उत्पादन किंवा सेवा यांच्या आपल्या वापरावर प्रभाव करणारा कोणताही व्हायरस किंवा मालवेअर; आणि ट्रान्समिशन किंवा व्यवहार आरंभ करण्यास किंवा पूर्ण करण्यास झालेला उशीर किंवा अपयश यांच्या समावेशासह, या मर्यादा आणि अपवर्जने सर्व दाव्यांना, कोणत्याही कायदेशीर सिद्धांताअंतर्गत, लागू होतात.
28. याअटींचाअन्वयार्थलावणे. या विक्रीच्या अटींचे सर्व भाग संबंधित कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत लागू होतात; आपल्या निवासक्षेत्राच्या (किंवा, व्यवसाय असल्यास, आपली व्यवसायाच्या प्रमुख ठिकाणच्या) न्यायाधिकार क्षेत्रात आपल्याला अधिक जास्त अधिकार असू शकतात. आम्ही या विक्रीच्या अटींमध्ये लिहिल्याप्रमाणे एखाद्या भागाची अंमलबजावणी करू शकत नाही असे निर्धारित झाल्यास, आम्ही त्या अटींच्या जागी संबंधित कायद्यांतर्गत अंमलबजावणीक्षम मर्यादेपर्यंत त्यांसारख्या अटी बदली करू, परंतु या विक्रीच्या अटींचा उर्वरित भाग बदलणार नाही. या विक्रीच्या अटी केवळ आपल्या आणि आमच्या फायद्यासाठी आहेत; त्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या फायद्यासाठी नाहीत, Microsoft चे उत्तराधिकारी आणि वारस वगळता. आपण इतर Microsoft वेबसाईटवरून उत्पादने किंवा सेवा खरेदी केल्यास वेगळ्या अटी लागू होऊ शकतात.
29. नियुक्ती. लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, या विक्रीच्या अटींअंतर्गत आम्ही कोणत्याही वेळी, आपल्याला सूचना न देता, आमचे अधिकार आणि दायित्वे नियुक्त, हस्तांतरित करू शकतो किंवा अन्यथा संपूर्णतः किंवा अंशतः संपवू शकतो. या विक्रीच्या अटींअंतर्गत आपण कोणतेही अधिकार नियुक्त किंवा हस्तांतरित करू शकत नाही.
30. सूचनाआणिसंवाद. ग्राहक सहाय्य चौकशीसाठी, कृपया आमच्या Store मधील विक्री आणि सहाय्य पृष्ठाला भेट द्या. विवादांसाठी, या विभागातील सूचना पद्धतीचे अनुसरण करा.
31. कंत्राटकरणारेअस्तित्व, कायद्याचीनिवडआणिविवादसोडवण्यासाठीचेस्थान.
a. युनायटेडस्टेट्सआणिकॅनडायांच्याबाहेरीलउत्तरकिंवादक्षिणअमेरिका. आपण युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा यांच्या बाहेरील उत्तर किंवा दक्षिण अमेरिकेत राहात असल्यास (किंवा, व्यवसाय असल्यास, आपले व्यवसायाचे प्रमुख ठिकाण), आपण Microsoft Corporation, One Microsoft Way, Redmond, WA 98052, U.S.A. यांच्याशी करार करत आहात. वॉशिंग्टन राज्याचा कायदा या विक्रीच्या अटींचा अन्वयार्थ आणि त्यांच्या उल्लंघनाचे दावे शासित करतो, कायद्याच्या निवडीच्या तत्त्वांच्या अपरोक्ष. आम्ही Store आणि सेवाज्या देशाकडे निर्देशित करतो त्या देशाचे कायदे इतर सर्व दाव्यांचे शासन करतात (ग्राहक संरक्षण, अन्याय्य स्पर्धा आणि अपकृत्य दावे यांच्या समावेशासह).
b. मध्यपूर्वकिंवाआफ्रिका. आपण मध्य पूर्व किंवा आफ्रिकेत राहात असल्यास (किंवा, व्यवसाय असल्यास, आपले व्यवसायाचे प्रमुख ठिकाण), आपण Microsoft Ireland Operations Limited, The Atrium Building, Block B, Carmanhall Road, Sandyford Industrial Estate, Dublin 18, Ireland यांच्याशी करार करत आहात. आयर्लंडचे कायदे या विक्रीच्या अटींच्या अन्वयार्थाचे आणि त्यांच्या उल्लंघनांच्या दाव्यांचे शासन करतात, कायदे तत्त्वांच्या संघर्षाच्या अपरोक्ष. आम्ही Store आणि सेवा ज्या देशाकडे निर्देशित करतो त्या देशाचे कायदे इतर सर्व दाव्यांचे शासन करतात (ग्राहक संरक्षण, अन्याय्य स्पर्धा आणि अपकृत्य दावे यांच्या समावेशासह). या विक्रीच्या अटी किंवा Store यांमधून उद्भवणार्या किंवा त्यांच्याशी संबंधित सर्व विवादांसाठी आपण आणि आम्ही आयर्लंडचे अनन्य न्यायाधिकार क्षेत्र आणि स्थानाशी अपरिवर्तनीयपणे सहमत होतो.
c. आशियाकिंवादक्षिणप्रशांत, खालीनामोल्लेखअसलेलेदेशवगळून. आपण आशियात (चीन, जपान, कोरियन प्रजासत्ताक किंवा तैवान वगळता) राहात असल्यास (किंवा, व्यवसाय असल्यास, आपले व्यवसायाचे प्रमुख ठिकाण), आपण Microsoft Regional Sales Corporation, a corporation organized under the laws of the State of Nevada, U.S.A., यांच्याशी करार करत आहात, सिंगापूर आणि हाँगकाँग येथे असणार्या शाखांसह, ज्यांचे व्यवसायाचे प्रमुख ठिकाण 438B Alexandra Road, #04-09/12, Block B, Alexandra Technopark, Singapore, 119968 येथे आहे. वॉशिंग्टन राज्याचा कायदा या विक्रीच्या अटींचा अन्वयार्थ आणि त्यांच्या उल्लंघनाचे दावे शासित करतो, कायद्याच्या निवडीच्या तत्त्वांच्या अपरोक्ष. आम्ही Store ज्या देशाकडे निर्देशित करतो त्या देशाचे कायदे इतर सर्व दाव्यांचे शासन करतात (ग्राहक संरक्षण, अन्याय्य स्पर्धा आणि अपकृत्य दावे यांच्या समावेशासह). या विक्रीच्या अटी किंवा Store यांमधून उद्भवणारा किंवा त्यांच्याशी संबंधित कोणताही विवाद, त्यांचे अस्तित्व, वैधता किंवा समाप्ती यांच्या संदर्भातील कोणत्याही प्रश्नांसह, Singapore International Arbitration Center (SIAC) च्या लवाद नियमांनुसार, जे नियम या कलमामध्ये संदर्भाद्वारे समाविष्ट केल्याचे समजले जाते, सिंगापूरमधील लवादाकडे संदर्भित केला जाईल आणि अंतिमतः सोडवला जाईल. न्यायाधिकरण SIAC च्या अध्यक्षाद्वारे नियुक्त केल्या जाणार्या एका लवादाने बनलेले असेल. लवादाची भाषा इंग्रजी असेल. लवादाचा निर्णय अंतिम, बंधनकारक आणि अखंडनीय असेल आणि तो कोणत्याही देश किंवा प्रदेशामधील निवाड्यासाठी आधार म्हणून वापरला जाऊ शकेल.
d. जपान. आपण जपानमध्ये राहात असल्यास (किंवा, व्यवसाय असल्यास, आपले व्यवसायाचे प्रमुख ठिकाण), आपण Microsoft Japan Co., Ltd (MSKK), Shinagawa Grand Central Tower, 2-16-3 Konan Minato-ku, Tokyo 108-0075 यांच्याशी करार करत आहात. जपानचे कायदे या विक्रीच्या अटींचे आणि Store मधून उद्भवणार्या किंवा त्याच्याशी संबंधित सर्व बाबींचे शासन करतात.
e. Rकोरियनप्रजासत्ताक. आपण कोरियन प्रजासत्ताकमध्ये राहात असल्यास (किंवा, व्यवसाय असल्यास, आपले व्यवसायाचे प्रमुख ठिकाण), आपण Microsoft Korea, Inc., 11th Floor, Tower A, K-Twin Tower, Jongro 1 gil 50, Jongro-gu, Seoul, Republic of Korea, 110-150 यांच्याशी करार करत आहात. कोरियन प्रजासत्ताकचे कायदे या विक्रीच्या अटींचे आणि Store मधून उद्भवणार्या किंवा त्याच्याशी संबंधित सर्व बाबींचे शासन करतात.
f. तैवान. आपण तैवानमध्ये राहात असल्यास (किंवा, व्यवसाय असल्यास, आपले व्यवसायाचे प्रमुख ठिकाण), आपण Microsoft Taiwan Corporation, 18F, No. 68, Sec. 5, Zhongxiao E. Rd., Xinyi District, Taipei 11065, Taiwan यांच्याशी करार करत आहात. तैवानचे कायदे या विक्रीच्या अटींचे आणि Store मधून उद्भवणार्या किंवा त्याच्याशी संबंधित सर्व बाबींचे शासन करतात. Microsoft Taiwan Corporation विषयी अधिक तपशीलांसाठी, कृपया Ministry of Economic Affairs R.O.C. यांनी पुरवलेली वेबसाईट पहा. (https://gcis.nat.gov.tw/main/index.jsp). आपण आणि आम्ही तैवान तैपे जिल्हा न्यायालयाला या विक्रीच्या अटी किंवा Store मधून उद्भवणार्या किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही विवादांवर न्यायाधिकार असलेले प्रथम घटना न्यायालय म्हणून अपरिवर्तनीयपणे नियुक्त करतो, तैवान कायद्यांद्वारे परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत.
32. सूचना.
a. बौद्धिकमालमत्तेच्याउल्लंघनाचेदावेकरण्यासाठीसूचनाआणिपद्धती. Microsoft तृतीय पक्षांच्या बौद्धिक मालमत्ता अधिकारांचा आदर करते. आपण बौद्धिक मालमत्ता अधिकारांच्या, स्वामित्वहक्क उल्लंघनासह, उल्लंघनाची सूचना पाठवू इच्छित असल्यास, कृपया आमच्या उल्लंघनाच्या सूचना सादर करण्याच्या पद्धती वापरा (https://www.microsoft.com/info/cpyrtInfrg.aspx). या पद्धतीशी सुसंगत नसलेल्या सर्व चौकशांना प्रतिसाद मिळणार नाही.
Microsoft स्वामित्वहक्क उल्लंघनाच्या सूचनांना प्रतिसाद देण्यासाठी Title 17, United States Code, Section 512 मध्ये निर्दिष्ट केलेल्या प्रक्रिया वापरते. उचित प्रसंगी, Microsoft उल्लंघनांची पुनरावृत्ती करणार्या Microsoft सेवांच्या वापरकर्त्यांची खाती अक्षम किंवा समाप्त देखील करू शकते.
b. स्वामित्वहक्कआणिट्रेडमार्कसूचना.
Store आणि सेवांची सर्व सामग्री Microsoft Corporation आणि/किंवा तिचे पुरवठादार आणि तृतीय पक्ष प्रदाते यांचे स्वामित्वहक्क ©2016 आहे, One Microsoft Way, Redmond, WA 98052, USA. सर्व अधिकार राखीव. Store, सेवा आणि सामग्रीमधील शीर्षक, स्वामित्वहक्क आणि इतर बौद्धिक मालमत्ता अधिकार यांची मालकी आम्ही किंवा आमचे पुरवठादार आणि इतर तृतीय पक्ष यांच्याकडे आहे. Microsoft आणि Microsoft उत्पादने आणि सेवांची नावे, लोगो आणि चिन्हे युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि/किंवा इतर देशांमधील मध्ये Microsoft चे ट्रेडमार्क किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्क असू शकतात.
Microsoft ट्रेडमार्कची सूची येथे सापडू शकेल: https://www.microsoft.com/trademarks. प्रत्यक्ष कंपन्यांची आणि उत्पादनांची नावे त्यांच्या संबंधित मालकांचे ट्रेडमार्क असू शकतात. या विक्रीच्या अटींमध्ये स्पष्टपणे न दिलेले कोणतेही अधिकार राखीव आहेत.
33. सुरक्षाइशारा. संभाव्य इजा, अस्वस्थता किंवा डोळ्यांवरील ताण टाळण्यासाठी आपण खेळांच्या किंवा इतर अनुप्रयोगांच्या वापरापासून नियत विराम घ्यावा, विशेषतः आपल्याला वापरामुळे कोणतीही वेदना किंवा थकवा जाणवत असल्यास. आपल्याला अस्वस्थता जाणवल्यास विराम घ्या. मळमळ वाटणे, गतीमुळे गरगरणे, भोवळ, हरवलेपण, डोकेदुखी, थकवा, डोळ्यांवरील ताण, डोळ्यांचा कोरडेपणा यांचा अस्वस्थतेत समावेश असू शकतो. अनुप्रयोग वापरणे आपले लक्ष विचलित करू शकते आणि आपल्याला भवतालापासून विलग करू शकते. अडखळण्याच्या धोकादायक जागा, ठेंगणी छते, ज्यांची हानी होऊ शकेल अशा नाजुक किंवा मौल्यवान वस्तू टाळा. अनुप्रयोगांमध्ये दिसू शकणार्या चमकत्या प्रकाश किंवा आकृतीबंधांसारख्या काही दृश्य प्रतिमांना अनावृत्त झाल्यावर खूप कमी टक्केवारीत लोकांना फेफर्यांचा अनुभव येऊ शकतो. अगदी फेफर्यांचा इतिहास नसलेल्या लोकांनाही निदान न केलेली स्थिती असू शकते ज्यामुळे हे फेफरे येऊ शकतात. लक्षणांमध्ये डोके हलके होणे, दृष्टीबदल, डोळे फडफडणे, हातपायास झटके येणे किंवा हलणे, स्थितीभान हरपणे, गोंधळणे, शुद्ध हरपणे किंवा आचके यांचा समावेश असू शकेल. आपल्याला यांपैकी कोणतीही लक्शणे अनुभवास आल्यास ताबडतोब वापर थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आपल्याला कधीही फेफर्यांशी जोडलेल्या लक्षणांचा त्रास झालेला असल्यास अनुप्रयोग वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षणांच्या चिन्हांसाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या अनुप्रयोगाच्या वापराचे पर्यवेक्षण करावे.