bhasha inidan logo
Picture of Gateway of India in Mumbai

सर्वांसाठी उत्पादकता, सर्व भाषा आणि अॅप्समध्ये

देशाला प्रत्यक्षात डिजिटल बनवण्यासाठी तंत्रज्ञान सर्वांसाठी प्राप्य आणि उत्पादनक्षम असले पाहिजे, मग त्यामध्ये बोलल्या किंवा लिहल्या जाणाऱ्या भाषेचा अडसर यायला नको. आपल्या देशामध्ये 22 अधिकृत भाषा आहेत. ज्यातील 6 भाषा लोकसंख्येनुसार जगातील 20 सर्वात वरच्या भाषांमध्ये येतात, हे लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये अधिक सोपे उत्पादने आणि अॅप्स बनवण्यासाठी अविरत परिश्रम करीत आहे.

मायक्रोसॉफ्ट वर्ष 2000 पासून भारतीय भाषांकरिता स्थानिक युनिकोड समर्थन प्रदान करण्यात अग्रणी आहे. भाषेचा अडसर दूर सारण्यासाठी आम्ही दोन दशकांपूर्वीच भारतीय भाषांवर काम करणे सुरू केले होते आणि भारतीय भाषांमध्ये गणनेला वेग प्रदान करण्यास 1998 मध्ये भाषा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर आम्ही बराच मोठा पल्ला गाठला आहे – आमच्या सर्व उत्पादनांमध्ये आम्ही राज्यघटनेद्वारे अधिकृत अशा 22 भाषांसाठी मजकूर लिहण्याला समर्थन प्रदान करीत आहे आणि विंडोज इंटरफेस 12 भाषांना समर्थन देत आहे. Bhashaindia.com हे आमचे भाषा सामुदायिक पोर्टल, भारतीय मजकूर आणि साधनांसाठी महत्वाचे भांडार आहे.

भारतात स्थानिक भाषेत इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सतत वाढतच आहे. यामुळे लोकांना सक्षम बनवण्यास डिजिटल समावेशन ही एक मोठी संधी असल्याचे अधोरेखित होते. प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये अधिकाधिक अॅप विकसित होत असल्याने लाखो वापरकर्ते शिक्षण, आरोग्यसेवा, बँकिंग, संवाद, ईकॉमर्स, मनोरंजन, शेती, ई-गव्हर्नन्स आणि पर्यटन सारख्या क्षेत्रांमधील संसाधनांचा वापर करीत आहेत. मायक्रोसॉफ्ट उत्पादने भारतीय भाषांसोबत कसे कार्य करीत आहे हे खाली दाखवलेले आहे:

विंडोज 10

भारतीय भाषांसमवेत काम करण्याच्या बाबतीत नवीन विंडोज प्रणाली ही सर्वात शक्तिशाली आणि सुविधांनी परिपूर्ण अशी संचालन प्रणाली आहे. आपण फक्त मजकूरच सहजसोप्या पद्धतीने लिहू शकत नाही तर आपण विंडोज युझर इंटरफेसला आपल्या आवडीच्या भाषेमध्येही रूपांतरित करू शकता. आपण युनिकोड स्टँडर्डला सपोर्ट करणारे विविध फाँट वापरू शकता आणि युनिकोडला सपोर्ट करणाऱ्या अक्षरक्ष कोणत्याही अॅप्लिकेशनवर काम करू शकता. भारतीय भाषांमध्ये काम करणारे बरेच विंडोज अॅप्स आहेत, जसे की मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटर आणि मॅप्स. थोडक्यात सांगायचे म्हणजे विंडोज 10 भारतीय भाषांच्या वापरकर्त्यांना ओळखीच्या अशा सुविधाजनक वातावरणात काम करण्याचा अनुभव प्रदान करीत आहे.

ऑफिस 365

ऑफिस सुईट सर्व भौगोलिक प्रदेशांतील वापरकर्त्यांना विविध प्लॅटफॉर्म हाताळण्याची व त्यांच्या स्थानिक भाषेत मजकूर निर्मिती व हाताळणी करण्याची सुविधा प्रदान करीत आहे. ऑफिस अॅप्स सर्व भारतीय भाषांमध्ये काम करतात आणि विंडोज 7 किंवा त्यानंतरच्या आवृत्तीवर चालतात. ग्राहक आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय संवाद साधणे सुलभ होण्यास ऑफिस अॅप्स विंडोज, अँड्रॉईड आणि आयओएस वर उपलब्ध आहेत.

मायक्रोसॉफ्ट लँग्वेज अक्सेसरी पॅक्स

मोफत डाउनलोड करता येणाऱ्या मायक्रोसॉफ्ट लँग्वेज अक्सेसरी पॅक्सचा वापर करून मायक्रोसॉफ्ट हे विंडोज आणि ऑफिसमध्ये भारतीय भाषांना सपोर्ट प्रदान करीत आहे. लँग्वेज अक्सेसरी पॅक्स मध्ये विंडोजसाठी 3,00,000 शब्दांचे आणि ऑफिससाठी 6,00,000 शब्दांचे भाषांतर उपलब्ध आहे. लँग्वेज अक्सेसरी पॅक्स युझर इंटरफेसला अपेक्षित भाषेमध्ये रूपांतरित करतात आणि स्थानिक भाषेमध्ये सूचना व डायलॉग बॉक्स प्रदान करतात.

इनपुट मेथड एडिटर्स

स्टँडर्ड इंडिक कीबोर्डसाठी विंडोज मध्ये बिल्ट-इन सपोर्ट आहेच, मात्र काही वापरकर्त्यांना ट्रांसलिटरेशनसारख्या पर्यायी पद्धती वापरून मजकूर लिहायचा असतो. मायक्रोसॉफ्टने Bhashaindia.com वर अशा वापरकर्त्यांसाठी विविध इनपुट मेथड एडिटर्स (IMEs) उपलब्ध करून दिलेले आहेत.

बिंग

हे सर्च टूल नऊ भारतीय भाषांना सपोर्ट करते. भारतीय भाषेचा अनुभव डेस्कटॉप व सोबतच मोबाईल डिव्हाइसवरही उपलब्ध आहे. बिंग ट्रांसलेटरसुद्धा बऱ्याच भारतीय भाषांसोबत काम करते.

स्काईप लाईट

आमच्या स्काईप फॉर अँड्रॉईडची जलद व वेगवान आवृत्ती भारतीय लोकांना एकमेकांशी त्वरित संवाद साधण्यास विकसित केली आहे, जी आव्हानात्मक नेटवर्क परिस्थितींमध्ये उच्च कार्यप्रदर्शन प्रदान करते. अॅप 11 भारतीय स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे: इंग्लिश सोबतच बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगु आणि उर्दू.

कैझाला अॅप

कैझाला हे एक मोबाईल अॅप आहे जे मोठ्या समूह संवादाकरिता आणि कार्य व्यवस्थापनाकरिता डिझाइन केले आहे व सुदूर ठिकाणांमध्ये 2G नेटवर्कद्वारे वापरण्यासाठी वृद्धिंगत करण्यात आले आहे. अॅप स्थानिकीकरण करून त्याला हिंदी, बंगाली व तेलगु भाषांमध्ये अँड्रॉईड व आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

स्विफ्टकी

अँड्रॉईड व आयओएस वापरकर्त्यांसाठी असलेला कीबोर्ड ज्याला AI द्वारे सामर्थ्य प्रदान केले आहे. हे जवळपास 24 भारतीय भाषा व मारवाडी, बोडो, संथाली व खासी सारख्या बोलीभाषांमध्ये मजकूर लिखाण करण्याची सुविधा देत आहे. कीपॅड मध्ये AI सादर केल्याने जलद, सूचक लिखाण करण्यास मदत मिळते. यामुळे वापरकर्त्याला मिश्र भाषेत टाइप करण्यासही मदत मिळते.

भाषेचा अनुवाद

भारतीय भाषांकरिता तात्काळ भाषांतर सुधारण्यास कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डीप न्युरल नेटवर्क्स (DNN) चा फायदा घेत आहे. यामुळे वापरकर्त्यांना विंडोज ब्राउजर्स, बिंग सर्च व तसेच मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 उत्पादनांवर कोणत्याही वेबसाइटवर इंटरनेट सर्फ करतांना भारतीय भाषेचे भाषांतर करण्यास मदत मिळते. विंडोज व अँड्रॉईडवर मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटर अॅप मध्ये भारतीय भाषांचे भाषांतर करण्यास AI व DNN चा वापर केला जातो.

स्वे (Sway)

मल्टीमीडिया कंटेंटच्या मदतीने स्थानिक भाषेमध्ये नवीन कल्पना, गोष्टी आणि अहवाल सादर करण्यासाठी स्वे हे अॅप आहे. डिझाईन व लेआउटची चिंता न करता सादरीकरण तयार करण्यास सुसंगत चित्रे, व्हिडिओ, ट्विट्स आणि इतर सामग्री शोधण्यास हे अॅप स्थानिक भाषेमध्ये वापरकर्त्याला शोधांची सूचना देते.

वननोट

वननोट हे एक डिजिटल नोटबुक आहे जे कामाची यादी, व्याख्यान आणि मीटिंगच्या नोट्स, सुट्टीचा कार्यक्रम किंवा आपल्याला जे काही नियोजन किंवा लक्षात ठेवायचे आहे त्या सर्वांचे व्यवस्थापन करते. वापरकर्ते स्थानिक भाषेत लिहू किंवा खरडू शकतात, रेकॉर्ड व शेअर करू शकतात. वननोट हे संगणक, मॅक, विंडोज फोन, आयफोन, आयपॅड, अॅपल वॉच, अँड्रॉईड व अँड्रॉईड विअर डिव्हाइसवर मोफत उपलब्ध आहे.

भारतीय ईमेल पत्ते

मायक्रोसॉफ्ट अँड्रॉईड व आयओएस वर आपल्या आउटलुक अॅप्ससहित सर्व ईमेल अॅप्स व सेवांमध्ये 15 भारतीय भाषांमध्ये ईमेल पत्ते सपोर्ट करीत आहे. हा सपोर्ट फ्यूचर रेडी आहे, म्हणजेच जेव्हा केव्हा अतिरिक्त भारतीय भाषांमध्ये डोमेन नेम उपलब्ध होतील तेव्हा आम्ही आपोआप त्या भाषांमध्ये सुद्धा ईमेल पत्त्यांना सपोर्ट प्रदान करू.

यात काहीच शंका नाही की भारतासारख्या देशामध्ये, स्थानिकीकरण समाजातील मोठ्या वर्गाला तंत्रज्ञानाचा अॅक्सेस प्रदान करून संगणकाच्या आगामी क्रांतीला चालना देत आहे व त्याद्वारे सध्याचे भाषेचे अडथळे दूर सारण्यास मदत करीत आहे.