Xbox साठी डेटा संकलन सारांश
महत्वाचे
Xbox कन्सोल्स जलद, शक्तिशाली हार्डवेअर, Xbox समुदायातील लक्षावधी गेमर्स शी कनेक्ट करण्याची क्षमता, आणि गेम्स आणि करमणुकीतील सर्वोत्तम मूल्य प्रदान करतात. हा सारांश Xbox च्या One जनरेशन कन्सोल्सना तसेच Xbox Series X आण िSeries S कन्सोल्सना लागू होतो.
आवश्यक आणि पर्यायी डेटाचे परिदर्शन
Microsoft आमच्या ग्राहकांशी पारदर्शक होण्यासाठी आणि त्यांच्या डेटावर त्यांना अधिक नियंत्रण देण्यासाठी समर्पित आहे. या कामाचा भाग म्हणून, आम्हीआमची महत्त्वाची उत्पादने आणि सेवा एका मॉडेलवर हलवले आहेत जेथे ग्राहकांकडून ते आपले डिव्हाइसेस वापरत असताना आम्ही संकलित करतो तो वैयक्तिक डेटा आवश्यक किंवा वैकल्पिक अशा प्रकारांमध्ये वर्गीकृत केला जातो. हे आमच्या ग्राहकांना आम्ही संकलित केलेल्या डेटाविषयी आणि आम्ही तो कसा वापरतो याविषयी माहिती शोधणे आणि त्यांच्या गोपनीयतेविषयी ज्ञात निवडी करणे सोपे बनवते.
हा लेख आवश्यक आणि वैकल्पिक प्रकारच्या डेटाचा, Xbox कन्सोलद्वारे संकलित केलेल्या वैयक्तिक डेटाच्या विशिष्ट श्रेण्यांचा आणि Microsoft सोबत आमचे ग्राहक सामायिक करत असलेला डेटा सानुकूलित करण्यासाठी ते त्यांच्या गोपनीयता सेटिंग्ज कशा बदलू शकतात याबद्दलचा आढावा देतो.
आवश्यक डेटा
आवश्यक असलेल्या श्रेणीतील डेटा आमच्या उत्पादनांना अद्ययावत, सुरक्षित, संरक्षित, अद्ययावत आणि अपेक्षेनुसार कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असतो. आवश्यक डेटामध्ये समाविष्ट गोष्टी जशा:
- Xbox सेवांना गेम्स आणि अनुप्रयोग सक्षम करण्यापासून प्रतिबंधित करू शकणाऱ्या त्रुटींचे तपशील
- कन्सोल वापरण्यापासून आपल्याला परावृत्त करू शकतील अश्या समस्यांचे निदान करण्यासाठी Xbox कन्सोल सेटअप यश आणि बिघाड यांचा तपशील
- Xbox मोबाइल अनुप्रयोग अद्यतन यश आणि बिघाड, तसेच इतर त्रुटी यांचा तपशील
काही प्रकरणांमध्ये, ग्राहक आवश्यक डेटावर अवलंबून असलेली उत्पादन वैशिष्ट्ये किंवा फंक्शन्स वापरायची की नाही हे ठरवून आवश्यक डेटा संकलित केला आहे किंवा नाही हे नियंत्रित करू शकतो. उदाहणार्थ, जर आपण कन्सोल वर डिजिटल गेम खरेदी करण्यासाठी Xbox Store वापरत असाल, तर आम्ही ती खरेदी यशस्वीपणे ट्रॅक करण्यासाठी आवश्यक डायग्नोस्टीक डेटा संकलित करू. याऐवेजी आपण Xbox Store खरेदी विषयी आवश्यक डायग्नोस्टीक डेटा संकलित न होणे पसंत करत असाल तर आपण एखाद्या किरकोळ विक्रेत्याकडून डिस्क खरेदी करणे निवडू शकता.
आवश्यक असलेला डायग्नोस्टिक डेटा
| डेटा श्रेणी | वर्णन | उदाहरणात समाविष्ट आहेत |
| डिव्हाइस कनेक्टीव्हिटी आणि कन्फिगरेशन | या प्रकारच्या आवश्यक डायग्नोस्टीक डेटा मध्ये कन्सोल, त्याचे कॉन्फिगरेशन आणि कनेक्टिव्हिटी क्षमतांचे तपशील समाविष्ट असतात. |
|
| उत्पादन आणि सेवा कार्यप्रदर्शन | या प्रकारच्या आवश्यक डायग्नोस्टीक डेटा यामध्ये कन्सोल आरोग्य आणि कार्यप्रदर्शन याचे तपशील समाविष्ट आहेत. |
|
| सॉफ्टवेअर सेटप आणि इंव्हेंटरी | या प्रकारच्या आवश्यक डायग्नोस्टीक डेटा यामध्ये कन्सोलवरील सॉफ्टवेअर स्थापना आणि अद्ययावत करण्याची माहिती समाविष्ट असते. |
|
| उत्पादन आणि सेवा वापर | या प्रकारच्या आवश्यक डायग्नोस्टीक डेटा यामध्ये कन्सोल, गेम्स आणि ॲप्लिकेशन्सच्या वापराविषयी तपशील समाविष्ट असतात. |
|
आवश्यक सेवा डेटा
Xbox मध्ये आपल्याला सोलो व मल्टीप्लेअर गेम्स शोधण्यास, खरेदी करण्यास व खेळण्यास आणि सामाजिक अनुभव Xbox नेटवर्कवर सामायिक करण्यास सक्षम करण्यासाठी क्लायंट सॉफ्टवेअर अनुप्रयोग आणि कनेक्ट केलेले अनुभव समाविष्ट असतात. आपण Xbox नेटवर्क वापरत असताना, डेटा Microsoft द्वारे पाठवला आणि प्रक्रियीत केला जातो. हे कनेक्ट केलेले अनुभव वितरित करण्याच्या आमच्या क्षमतेसाठी हा डेटा आवश्यक आहे.
आवश्यक सेवा डेटा विशिष्ट डेटा प्रकार किंवा श्रेणी नाही . त्याऐवजी, Xbox नेटवर्कशी परस्परसंवाद साधताना प्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या सर्व डेटासाठी हे एक सामान्य वर्णन आहे. आवश्यक सेवा डेटामध्ये आपले नाव, वय, गेमरटॅग, देश यांसारख्या गोष्टी आणि कनेक्ट केलेले अनुभव प्रदान करण्यासाठी आणि अंतर्निहित सेवा सुरक्षित, अद्ययावत आणि अपेक्षेप्रमाणे कार्य करणाऱ्या ठेवण्यासाठी आवश्यक इतर माहिती समाविष्ट असते. आवश्यक सेवा डेटामध्ये त्याचे कार्य करण्यासाठी कनेक्ट केलेल्या अनुभवाद्वारे आवश्यक असलेली माहिती देखील समाविष्ट असू शकते, जसे की मल्टीप्लेअर गेम्स सुरू करण्यासाठी आणि क्लाउड गेमिंग सक्षम करण्यासाठीचे परवाने.
वैकल्पिक डेटा
पर्यायी श्रेणी मधील डेटा उत्पादन किंवा सेवा अनुभवासाठी आवश्यक नाही आहे. वैकल्पिक म्हणजे वैशिष्ट्यांना किंवा आवश्यक आधाररेखा कार्यक्षमता संच प्रदान करण्याच्या पलीकडील विश्लेषणाला ऊर्जा देण्यासाठी ग्राहकांकडून संकलित केलेला डेटाचा विस्तृत संच. पर्यायी डेटा मध्ये समाविष्ट गोष्टी जशा:
- वर्धित त्रुटी रिपोर्टिंग (त्रुटी आणि क्रॅश निर्माण करणाऱ्या परिस्थितींचा तपशीलवार डायग्नोस्टीक डेटा)
- कन्सोल कार्यप्रदर्शन डेटा
आमची उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी पर्यायी डेटा आवश्यक नसल्यामुळे, आम्हाला या प्रकारचा डेटा एकत्रित करण्याची परवानगी द्यायची किंवा नाही हे ग्राहक ठरवू शकतात. आमच्या मुख्य उत्पादनांच्या आणि सेवांच्या प्रारंभिक सेट अप दरम्यान, किंवा नंतर, खाली नोंदविलेली गोपनीयता नियंत्रणे वापरून कस्टमर हा निर्णय घेऊ शकतात.
वैकल्पिक डेटा सामायिक करणे आवश्यक नसले तरी हा डेटा आमच्या ग्राहकांसाठी नवीन, समृद्ध आणि चांगले अनुभव विकसित करण्यासाठी मदत करतो. आमच्या ग्राहकानी हा डेटा आमच्या समवेत सामायिक करण्याची आकर्षक कारणे आहेत, परंतु त्यांनी काय ठरविले याची पर्वा न करता आमची उत्पादने आणि सेवा अपेक्षेनुसार पुढे कार्य करत राहतील. हा आमच्या ग्राहकांचा डेटा आहे आणि आम्ही त्यांच्या गोपनीयतेबद्दल त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
पर्यायी डायग्नोस्टिक डेटा
| डेटा श्रेणी | वर्णन | उदाहरणात समाविष्ट आहेत |
| डिव्हाइस कनेक्टीव्हिटी आणि कन्फिगरेशन | या प्रकारच्या पर्यायी डायग्नोस्टिक डेटा यामध्ये कन्सोल, त्याचे कॉन्फिगरेशन आणि कनेक्टिव्हिटी क्षमतांचे तपशील समाविष्ट असतात. |
|
| उत्पादन आणि सेवा कार्यप्रदर्शन | या प्रकारच्या पर्यायी डायग्नोस्टिक डेटा यामध्ये कन्सोल आरोग्य आणि कार्यप्रदर्शन याचे तपशील समाविष्ट आहेत. |
|
| उत्पादन आणि सेवा वापर | या प्रकारच्या पर्यायी डायग्नोस्टिक डेटा यामध्ये कन्सोल, गेम्स आणि ॲप्लिकेशन्सच्या वापराविषयी तपशील समाविष्ट असतात |
|
| सॉफ्टवेअर सेटअप आणि इंव्हेंटरी | या प्रकारच्या पर्यायी डायग्नोस्टिक डेटा यामध्ये कन्सोलवरील सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन आणि अद्ययावत माहिती समाविष्ट असते. |
|
| कन्सोल्सवरील ब्राउझर इतिहास | या प्रकारच्या पर्यायी डायग्नोस्टिक डेटा यामध्ये Xbox कन्सोलवरील Edge अनुप्रयोगामध्ये ब्राउझिंग इतिहास (भेट दिलेल्या वेबसाइट्स) समाविष्ट असतात. |
|
डायग्नोस्टीक डेटाबद्दल अतिरिक्त माहिती
अचूक प्रमाण प्रयोक्त्यानुसार जरी बदलत असले तरीही, सरासरी Xbox कन्सोल दररोज अंदाजे 8MB डेटा तयार करते. डेटा प्रयोक्त्याच्या डिव्हाइसवरील बफरमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केला जातो आणि Microsoft ला पाठविला जातो. डेटा धारक Microsoft Corporation आणि सहयोगी आहेत. जेव्हा आपण ऑनलाइन गेममध्ये (किंवा आपल्या एक्सबॉक्स कन्सोलद्वारे अनुप्रयोगामध्ये) व्यस्त असता, तेव्हा Microsoft गेमच्या किंवा अनुप्रयोगाच्या प्रकाशकासह समर्थनासाठी, वितरणासाठी किंवा गेम किंवा अनुप्रयोग सुधारण्यासाठी माहिती सामायिक करू शकते. गेम आणि अनुप्रयोगांसह डेटा सामायिकरण येथे अधिक जाणून घ्या. प्रयोक्ते Microsoft गोपनीयता संघाशी aka.ms/privacyresponseयेथे संपर्क साधू शकतात. प्रयोक्त्यांना संबंधित डेटा संरक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करण्याचा अधिकार आहे. Microsoft आमच्या गोपनीयता विधानात या अधिकारांचा वापर कसा करावा याबद्दल माहिती प्रदान करते. प्रयोक्ते Microsoft गोपनीयता डॅशबोर्ड आणि Xbox गोपनीयता सेटिंग्जद्वारे त्यांचा डेटा ऍक्सेस करू शकतात, हटवू शकतात आणि व्यवस्थापित करू शकतात.
गोपनियता माहिती आणि सेटिंग्ज
Microsoft तुमचा डेटा कशा प्रकारे संकलित केला जावा याविषयीचे पर्याय प्रदान करते. Microsoft द्वारे संकलित केला जाणारा डेटा आणि ग्राहकांसाठी’ उपलब्ध असणारी नियंत्रणे याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी खाली पहा.